नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे
भुकेचा प्रश्न सुटणारा नाही, तुझ्या भाषणाने, पण;
तू वाचाळ नाहीस अशी, खात्री तर पटली पाहिजे!
राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
तुझी शक्ती मनगटात तू, पूर्ण एकवटली पाहिजे
रावणांच्या राज्यात पुन्हा, सीता एकाकी पडलीय
भूमीच्या मुक्तीसाठी, तुझी काया झटली पाहिजे
देच तुतारी फुंकून तू, इथेच, याच स्थळी, अशी की;
क्रिया येथे आणि प्रतिक्रिया, दिल्लीत उमटली पाहिजे
मामला तीन पद भूमीचा, तुझ्या सिंगावर घेच तू
त्या बटू वामनाची सत्ता, "अभय" पालटली पाहिजे
- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
मुटे सर, श्रमिकांच्या,
मुटे सर, श्रमिकांच्या, कष्टकर्यांच्या, शेतकर्यांच्या बाजूने इतकी स्पष्ट वैचारिक भूमिका - जी अनेकांना गद्द्य लेखनातही घेता येत नाही - आपण कवितेतून घेतली,
हा शेतकर्याचा नवा आसूड आहे.
अभिनंदन . सलाम !!!!!!!!!!!!
फेसबूकवरील प्रतिक्रिया
आवडली.
अगदी बरोबर.
भन्नाट.
भन्नाट.
अद्वितीय
अद्वितीय.
फेसबूकवरील प्रतिसाद
Yogita Patil, Suryakant Dolase, Shivaji Sawant and 16 others like this.
Sudhakar Kadam
Prabhakar Patki
Prashant Panwelkar
Renu Khatavkar
क्रिया येथे आणि प्रतिक्रिया, दिल्लीत उमटली पाहिजे
मामला तीन पद भूमीचा, तुझ्या सिंगावर घेच तू
त्या बटू वामनाची सत्ता, "अभय" पालटली पाहिजे.... kya bat hai!
Jayant Patwardhan
Kalpi Shyam Joshi
भूमीच्या मुक्तीसाठी, तुझी काया झटली पाहिजे....................वाह
Kalpi Shyam Joshi
क्रिया येथे आणि प्रतिक्रिया, दिल्लीत उमटली पाहिजे.........तडका
Shivaji Sawant
Suryakant Dolase
Prakash Redgaonkar
Yogita Patil
फेसबूक लिंक - २२/१२/२०१४
फेसबूक लिंक - २२/१२/२०१४
https://www.facebook.com/gangadharmute/posts/936360563055299
शेतकरी तितुका एक एक!
Apratim... Pn yaach
Apratim... Pn yaach shetkaryansathi ladhayla Wamanrao Chatap aale aahe... Jyanche Katy adarniy shared Joshi saranmule fault aahe... Jay jaw an jay kisan
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण