Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***औंदाची शेती - २०१५

Krishijagat: 
लेख

औंदाची शेती - २०१५

               १९-०६-२०१५
भल्याभल्यांचे, थोरामोरांचे सारे अंदाज वावटळीत उडवून यंदा पावसाने शेतीस योग्य अशी दमदार सुरुवात केली आहे. धोंड्याचे वर्ष (अधिकमासाचे) शेतीसाठी अनुकूल असते असा पारंपारिकपणे शेतकर्‍यांनी बाळगलेला समज खरा ठरावा, अशी आशादायक स्थिती आजच्या दिवसापर्यंत तरी खरी ठरली आहे.
.

औंदाची शेती

झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी

 *****************************************
 

औंदाची शेतीकपाशीची लागवड करण्याचा दिवस उजाडला आणि आपल्या लहानसान मुलाबाळासह शेतकरी आपल्या कर्तव्याला तत्पर झाला. 

 बालमजुरी कायद्याचं आमच्या लेकराबाळांना संरक्षणही नाही.
आणि
शेतकर्‍याची लहान लेकरं शेतावर राबली तरी शेतकर्‍यांचं काही वाकडं करण्याची ऐपतही कायद्यात नाही. 
 (त्यांना स्वस्तात शेतमाल पाहिजे ना? मग शेतकर्‍याची मुलं शेतात फ़ुकटात काम करत असेल तर ते सार्‍यांना हवेहवेसेच आहे.) 
*****************************************
 

औंदाची शेती 

 पेरते व्हा!
पेरते व्हा! 
*****************************************
 

औंदाची शेती 

 याला आमचेकडे फ़साटी म्हणतात. 
तुमच्याकडे काय म्हणतात. 
शेतकी पुस्तकात याला काय पर्यायी शब्द आहे? 
*****************************************
Share

प्रतिक्रिया

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  सोम, 22/06/2015 - 19:39. वाजता प्रकाशित केले.

  २२/०६/२०१५
  यंदा मोसमाच्या सुरुवातीलाच मजेदार निसर्गखेळ बघायला मिळत आहे. "थांब रे बाबा पावसा" असे म्हणायची वेळ आली आहे.
  १० जूनला पहिला पाऊस झाला तेव्हापासून तो दररोज नित्यनेमाने येत आहे. एकही दिवस विश्रांती घ्यायला तयार नाही. सक्तीची विश्रांती देण्याचा पर्यायही उपलब्ध नाही.
  मात्र रोज येतो पण नेमका येतो. फ़क्त जमीन चिंबओली करून जातो. जमीनीच्या बाहेर पाणी वाहून जायची वेळ आली की स्वत:हूनच थांबून जातो. एक थेंब पाणी तो वाया घालवत नाही आहे. वरूणराजाच्या दरबारी प्रशासकिय बदल्या होऊन नवे व्यवस्थापन आले की काय, असे वाटत आहे.
  त्यामुळे कपाशीची लागवड तर मस्त आणि सरसकट शेतकर्‍यांची जमलीय पण जमीनीला वाफ़सा येत नसल्याने सोयाबिन पेरण्यांच्या विचका झालाय.
  पाण्याचा निचरा न होणार्‍या पानबदान शेत्या यावर्षी पेरणीअभावी पडीत राहतात की काय अशी याक्षणीची परिस्थिती आहे. मात्र सोयाबीन पेरणीसाठी अजून भरपूर कालावधी शिल्लक आहे त्यामुळे आशा जिवंत आहे.
  ******************

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शुक्र, 26/06/2015 - 17:46. वाजता प्रकाशित केले.

  २४-०६-२०१५
  कालपासून पावसाने विश्रांती घेताच जरा पेरणीयोग्य स्थिती तयार व्हायला लागली. पूरेपूर वाफ़सा येण्याची वाट न पाहताच सोयाबिन पेरणीला सुरुवात केली.
  ("वाफ़सा आल्यावरच पेरणी करावी" हे वाक्य फ़क्त पुस्तकातच शोभून दिसते. प्रत्यक्षात वेळ बघूनच शेतीमध्ये निर्णय घ्यावे लागतात, हे समजून घेणे पुस्तकांच्या डोक्याबाहेरचे काम आहे.)
  ******************

  S0wing

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शुक्र, 26/06/2015 - 17:49. वाजता प्रकाशित केले.

  २५-०६-२०१५
  आम्ही शेतकरी झाडे लावतो आणि झाडे तोडतो सुद्धा!
  कारण आम्ही कृतीशील कर्मयोगी आहोत. नुसते तोंडाने वाफ़ उडवणारे बोलघेवडे पर्यावरण वादी/तज्ज्ञ/प्रेमी नाहीत.
  तोंडाची वाफ़ दवडल्याने कुठे निसर्गाच्या आगगाडीचे इंजिन चालत असते?
  ******************

  पर्यावरण

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शुक्र, 26/06/2015 - 17:55. वाजता प्रकाशित केले.

  २६/०६/२०१५
  बर्‍याच दिवसानंतर आज तिफ़ण हातात घेतली.
  [अर्थात फ़ोटो काढण्यापुरतीच Wink ]

  तिफ़ण

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शुक्र, 26/06/2015 - 17:58. वाजता प्रकाशित केले.

  २६/०६/२०१५
  ही तिफ़ण चांगली आहे. काही जुजबी बदल केले तर चांगली पेरणी होऊ शकते.
  मला आवडली आपणही वापरून पहा. सहा मजुरांचा खर्च वाचतो.

  saurabh

  पोरगा बी. एससी (कृषि) करतोय. म्हटलं बापू पुस्तकातील भेंड्या विद्यापिठातच विकजो.
  ही शेती आहे म्हणजे रियल लाईफ़ आहे.
  जरा हातात रुम्नं धर.
  आणि शीक...
  शेती कशाला म्हणतात ते......! Bigsmile

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  रवी, 28/06/2015 - 09:05. वाजता प्रकाशित केले.

  २७-०६-२०१५
  काल काही मित्रांनी या स्वयंचलित पेरणीयंत्राविषयी अधिक माहिती विचारली होती.
  किंमत मला आता नक्की आठवत नाही. मी घेतल्याल्या तीनेक वर्ष झालीत.
  यापूर्वी गरज पडली नव्हती म्हणून वापरली नव्हती. यावर्षी वापरली. जमीनीचा पोत भुसभुशीत नसल्याने चाक फ़िरत नव्हते, उसळत होते म्हणून मी त्याला पाईपच्या सहाय्याने अतिरिक्त वजनाचे टेन्शन दिले. मग अती टणक पृष्ठभाग असलेल्या शेतातही व्यवस्थित पेरणी झाली.
  आता कुठे उपलब्ध आहे चौकशी करावी लागेल. फ़ोटोत दिलेल्या फ़ोन नंबरवर चौकशी करायला हरकत नाही.

  Tifan

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  सोम, 29/06/2015 - 20:42. वाजता प्रकाशित केले.

  औदाची शेती - २०१५

  आंतरपीक म्हणून सोयाबिनमध्ये तूर पेरली. बियाणे अंकूरायचीच वाट की रानडुकरांनी तूरीच्या ओळी अलगदपणे शोधल्या आणि उकरून-उकरून अंकूरलेले तूरीचे बियाणे फ़स्त केले. आता बोंबला...!

  मी आजपर्यंत अस्मानी आणि सुलतानी अशी संकटांची दोनच प्रकारात विभागणी करायचो. आता तीन प्रकारात करावे की काय, असा पेच पडलाय.
  १) निसर्गाचे संकट २) जंगली श्वापदांचे संकट ३) सभ्य माणसांचे सरकारी संकट

  इथे एक बाब नमूद करण्यासारखी अशी की,
  रान डुकरांना संरक्षण देणारे अमाप इंडियन कायदे आहेत.
  पण
  शेतकर्‍यांना संरक्षण देणारा या देशात एकही इंडियन कायदा नाही.

  - गंगाधर मुटे
  ************************************
  suar

  शेतकरी तितुका एक एक!