नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांची ही कविता ही ग्रामीण जीवनावर प्रकाश टाकणारी कविता खरोखरच शेतकऱ्या विषयी मनामध्ये कणव निर्माण करते आपण जेव्हा ही कविता वाचतो तेव्हा अंतर्मनात हे शब्द डोकायला भाग पडायला लावतात
काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता
पहिल्याच ओळीत ग्रामीण जीवनाचे दर्शन होते कवी त्याच्या मित्राला सांगतोय की माझ्या गावाकडे चल परंतु रस्ता काट्याकुट्यांनी व्याप्त आहे.
कशी उन्हात तळतात माणसे
कशी मातीत मळतात माणसे माणसे
कशी खत जीवाला खस्ता
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता
शेतकऱ्यांना दिवसभर उन्हातानात काम करावं लागतं. दिवसभर ढेकळात अनवाणी पायाने फिरावं लागतं.खूप कष्ट करूनही त्याला सुख नाही तर चिंताच पदरी पडते.
काळ्या बापाचे हिरवे रान
काळ्या माईने पिकवलेल सोन
पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता
मायबापांनी खूप मेहनत केली मेहनत केली. काबाडकष्ट केले. लोकांकडून पैसे घेऊन शेतीला लावले, तरीही हमीभाव न मिळाल्यामुळे त्यांच्या पदरी निराशाच पडते.
इथे डब्यात तुला साखर लागते गोड
तिथे शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड
पण भाव ठरतो त्याला न पुसता
कवी त्याच्या मित्राला सांगतात रे तुला जी डब्यात साखर खायला मिळते ती गोड आहे परंतु, त्यासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या, विचुकाट्याचा विचार न करणाऱ्या माझ्या बापाच्या अंगाला फोड येतात, अंगाला जखमा होतात, शेतात राबताना.
तरीसुद्धा मालाचा भाव त्याला न विचारताच ठरवला जातो. आणि तोही त्याच्या अपेक्षेपेक्षा कमीच असतो अपेक्षेपेक्षा कमीच असतो
जेव्हा दुष्काळ घरट्या घाली
तेव्हा गावाला कुणी ना वाली
कशी घालतात सुजित गस्ता
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता
जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा सगळीकडे त्राहिमाम् त्राहिमाम् परिस्थिती होते. पण खरी झळ सोसावी लागते फक्त शेतकऱ्याला लागते फक्त शेतकऱ्याला, तेव्हा अशा परिस्थितीत सरकार ही ध्यान देत नाही; पण तेच राजकारणी अलबेल असताना अवश्य गावात चकरा मारतात मारतात गरज नसतानाही.
ह्या भूमीचा मूळ अधिकारी
बग झालाय आज भिकारी
आज गाव असून झाला फिरस्ता
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता
आणि योग्य हमीभाव न न हमीभाव न न मिळाल्यामुळे दुष्काळामुळे सरकारच्या जुलमी धोरणामुळे शेतकरी आकंठ कर्जाच्या खाईत बुडून गेला आहे त्यामुळे त्याला गाव असूनही तो फीरस्ता झालाय. त्याच एका ठिकाणी मन लागत नाहीये तो नेहमी चिंताग्रस्त राहतो. खूप अभ्यासपूर्ण माहिती कवि इंद्रजित भालेराव यांनी या कवितेत मांडलेली आहे.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
चल माझ्या दोस्ता
चल माझ्या दोस्ता
काट्याकुट्याचा
तुडवीत रस्ता
माझ्या गावाकडं
चल माझ्या दोस्ता
कशी उन्हात
तळतात माणसं
कशी मातीत
मळतात माणसं
कशी खातात
जीवाला खस्ता
माझ्या गावाकडं
चल माझ्या दोस्ता
काळ्या बापाचं
हिरवं रान
काळ्या माईनं
पिकवलं सोनं
त्यांच्या घामाचा
भाव लई सस्ता
माझ्या गावाकडं
चल माझ्या दोस्ता
इथं डब्यात तुला
साखर लागते गोडं
तिथं शेतात माझ्या
बापाच्या अंगाला फोडं
भाव ठरतो
त्याला न पुसता
माझ्या गावाकडं
चल माझ्या दोस्ता
जेव्हा दुष्काळ
घिरट्या घाली
तेव्हा गावाला
कुणी ना वाली
कशी घालतात
सुगीत गस्ता
माझ्या गावाकडं
चल माझ्या दोस्ता
ह्या भूमीचा
मूळ अधिकारी
बाप झालाय
आज भिकारी
गाव असून
झालाय फिरस्ता
माझ्या गावाकडं
चल माझ्या दोस्ता
कवी - इंद्रजीत भालेराव
संगीत - डॉ. अशोक जोंधळे
गायक - अजय जोंधळे
शेतकरी तितुका एक एक!
काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता
प्रा. इंद्रजित भालेराव यांची महाराष्ट्रभर गाजलेली शेतकरी कविता
काट्याकुट्याचा
तुडवीत रस्ता
माझ्या गावाकडं
चल माझ्या दोस्ता
आपण ऐका आणि इतरांना शेअर करा. शेतकऱ्यांचे आर्त सर्वत्र पोचण्यास हातभार लावा.
https://www.youtube.com/watch?v=ygDOpQOwzyw
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
=-=-=-=-=
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
मोबाईल अॅप