नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
हिरवी मखमली शाल
सार्या रानात पेरली
हसू पिकात मावेना
ऊब मायेची लाभली
ऊब मायेची लाभली
गोंजारलं पोरावानी
व्यथा सांगतो गं माय
डोळा आणू नको पाणी
डोळा आणू नको पाणी
उद्या मीही गेल्यावर
जप पोरास्नीबी माझ्या
येवो नाही अशी वेळ
येवो नाही अशी वेळ
फेर्या घरी सावकारी
गोळाबेरीज घासाची
गेला करून माघारी
गेला करून माघारी
मोल तुझे माझे माय
पांग फेडू तरी कसे
सांग करू तरी काय
सांग करू तरी काय
गळा बांधूनिया शेला
सांगू नको गं पोराला
बाप कर्जापायी गेला
श्रीधर अंभुरे
मो. 9767860338
मु. पो. चांदज ता. जिंतूर जि. परभणी
प्रतिक्रिया
कवितेबद्दल काहीही हरकत असेल
कवितेबद्दल काहीही हरकत असेल तर कृपया संपर्क साधावा
Shridhar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने