नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*काव्यप्रकार - अष्टाक्षरी*
*शीर्षक - नको नको विकू राजा....*
*नको नको विकू राजा......*
नको नको विकू राजा
नको विकूस आईला
तिच्यामुळे आला घास
राजा आपल्या वाट्याला
तिला आंजारू गोंजारू
तिच्या कुशीवर लोळू
टिळा डोईवर तिचा
तिला अंगावर माळू
शेतकरी का तुजला
शेत कसण्याची लाज
उद्या सापडल पिक
जरी निसटलं आज
जरी हाती आलं पिक
भाव त्याला मातीमोल
फिरतील हेबी दिस
राख मनाचा तू तोल
व्यापाऱ्याच्या हातामधी
साऱ्या बाजाराच्या नाड्या
तुझ्या वाट्याला झोपडी
त्यांच्या मात्र वाड्या माड्या
आठवडी बाजारात
थेट विक्रीची रे आशा
तिथं सुध्दा व्यापारीच
नावापुर्ती तुझी भाषा
धीर सोडू नको राजा
नको मांडूस बाजार
नोटा जरी हाती आल्या
आशा होतील पसार
नको भुलू माझ्या बाळा
गाड्याघोड्या श्रीमंतीला
आज विकून जमीन
काय करशी उद्याला ?
पोशिंद्यानं या जगाच्या
आब आपला राखावा
मातीमध्ये राबूनिया
घास जगी भरवावा
सौ.उज्वला ढमढेरे (चिंचवड)
प्रतिक्रिया
खूप छान!
खूप छान!
मुक्तविहारी
खरेच... माती आपली आई आहे आणि
खरेच... माती आपली आई आहे आणि अशा आईला विकू नये... सुंदर कविता
पाने