नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
झोपेत गाढ आम्हा, ठेवून चोरट्यांनी
नेले लुटून सारे, स्वप्नासहीत त्यांनी
होते न खुद कधीही, जे आपल्या मताचे
निवडून तेच आले, भरघोसल्या मतांनी
निवडून त्या ठिकाणी, गेले लुचाड सारे
केले लचांड आता, धोरण प्रयुक्त त्यांनी
बांधून फार मोठे, केले धरण उभे अन
पाण्यास ठेवलेया , रोखून धोरणांनी
मिळणार मज कधी ते, जल सांग ओलिताला
पाणावले मळेही, भिजलेत आसवांनी
कोणी न ध्यान केले, आबाळ धिर दशेवर
दुर्लक्षले कृषीला, साऱ्याच शासकांनी
वृत्त :~आनंदकन
लगावली :~गागाल गालगागा, गागाल गालगागा