सातवे अ.भा.मराठी गझल संमेलन, आष्टगाव
गजल सागर प्रतिष्ठान तर्फे मोर्शी तालुक्यातील आष्टगाव (जि. अमरावती) येथे उभारलेल्या सुरेश भट गजलनगरीत दि. ९ आणि १० फेब्रुवारी २०१३ रोजी सातव्या अखिल भारतीय गजल संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आष्टगाव हे गझलनवाज श्री भिमराव पांचाळे जन्मगाव आहे. अखिल भारतीय मराठी गजल संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रल्हाद सोनेवाने तर उद्घाटक म्हणून गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे अध्यक्ष आणि दुबईच्या मिटकॉन इंटरनॅशनल चे संचालक डॉ.संदीप कडवे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी साहित्य संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके, उर्दूचे प्रख्यात शायर जनाब नसिम रिफअत ग्वालियरी, मुंबई येथील विक्रीकर सहआयुक्त सुभाष येंगडे तसेच औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मदन जोशी, आष्टगावच्या सरपंच कांताबाई इंगळे, आमदार ऍड. यशोमती ठाकूर, आमदार डॉ. अनिल बोंडे, गजलकार ए. के. शेख, सिद्धार्थ भगत, अमर हबीब, संमेलनाचे निमंत्रक गजलनवाज भीमराव पांचाळे व्यासपीठावर विराजमान होते.
|
सुरेश भट गजलनगरी |
यावेळी गजलनवाज भीमराव पांचाळे म्हणाले, आपण ज्या गावात वाढलो, ज्या डोंगरदर्यांमधून फिरलो, ज्या गावात आपल्याला आद्यस्वर गवसला, त्या गावात संमेलन व्हावे, अशी माझी इच्छा होती. जात्यावरचे आईचे गाणे हाच माझा आद्य स्वर होता. आईच्या मांडीवर डोके ठेवून गाणे ऐकताना मी झोपी जायचो. शिवरात्रीला सालबर्डीला जाणार्या भाविकांच्या ‘महादेवा जातो गा...’ या पहाडी स्वरांनी मनात घर केले. आपली पत्नी गोव्याची. मात्र तिला आपल्यापेक्षाही या गावाची ओढ अधिक. गावकरी, मित्र यांच्या सगळ्यांच्या आग्रहातून हा विचार समोर आला आणि हे संमेलन आज आष्टगावात होत असल्याचे भीमरावांनी सांगितले. ४२ वर्ष आपण गजल गात आहोत. हा प्रवास आज निर्णायक वळणावर आला असल्याचेही भीमराव पांचाळे यांनी स्पष्ट केले.
|
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सुरेश भटांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. |
न्यायाधीश मदन जोशी यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. प्रख्यात शायर नसीम रिफअत यांनी शेरोशायरी सादर केली. प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सुरेश भटांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्रास्ताविकातून गज़लनवाज भीमराव पांचाळे यांनी आपल्या गावच्या मातीची ओढ म्हणून आष्टगावात संमेलन घेण्याचा माझा मनोरथ या संमेलनानिमित्ताने पूर्ण होत असल्याची भावना व्यक्त केली. पहाडी रागातील "महादेवा जातो गाऽ' या ओळी गुणगुणून त्यांनी सभागृह आपल्या सुरेल स्वरांनी भारावून टाकले.
याप्रसंगी "गज़लसागर'च्या गज़लसंमेलन विशेषांकाचे तसेच "मराठी गज़ल : सुरेश भटांनंतर' या प्रातिनिधिक गजलसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. दुबईकरांच्या वतीने भीमराव पांचाळे यांचा संदीप कडवे यांच्या हस्ते; तर लाखनीवासींतर्फे संमेलनाध्यक्ष प्रल्हाद सोनेवाने यांचा प्राचार्य डॉ. संजय पोहरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
|
याप्रसंगी "गज़लसागर'च्या गज़लसंमेलन विशेषांकाचे तसेच "मराठी गज़ल : सुरेश भटांनंतर' या प्रातिनिधिक गजलसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. |
सातव्या अ. भा. मराठी गज़लसंमेलनाच्या उद्घाटकीय सोहळ्याच्या अध्यक्षस्थानाहून बोलताना वसंत आबाजी डाहाके यांनी आष्टगावसारख्या छोट्याशा खेड्यात अखिल भारतीय स्तरावरचे मराठी गज़लसंमेलन होणे हा अपूर्व योग असल्याचे म्हटले. गज़ल मराठीत आणण्याचे खरे श्रेय सुरेश भटांचेच, असे सांगून गज़ल हा रूपबंध जे मागतो, त्या दिशेकडे वळणे खरोखर कठीण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
खास दुबईहून गज़लसंमेलनाकरिता आलेले संदीप कडवे यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात बोलताना गज़लचे माहेर आखातात असल्याने पुढचे अखिल भारतीय मराठी गज़लसंमेलन आखातात झाल्यास गज़ल आपल्या माहेरी आल्यासारखे होईल, असे प्रतिपादन केले. आखातात मराठी गज़लसंमेलनाच्या आयोजनाच्या दृष्टीने आपले प्रयत्न आहेत, असे त्यांनी जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
गज़लचे शब्द विश्वशांती व राष्ट्रशांतीचे दूत व्हावेत; तसे ते क्रांतीची मशालही व्हावेत. आमची गज़ल ही वर्तमानातील प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी त्यांचा सूक्ष्मदृष्टीने विचार करण्यासाठी तत्पर असली पाहिजे. समाजातील दुःख, दैन्य व दारिद्य्र पाहून ती कळवळली पाहिजे, अन्याय पाहून ती चिडली पाहिजे, त्याविरोधात झुंजली पाहिजे व पेटून उठली पाहिजे, असे प्रतिपादन सातव्या अखिल भारतीय मराठी गज़लसंमेलनाचे अध्यक्ष प्रल्हाद सोनेवाने यांनी व्यक्त केला.
|
एक चिमुकली गझल सादर करताना |
गझल मुशायरा
|
गझलनवाज भिमराव दादा आणि जेष्ठ गझलकार ए.के.शेख यांच्यासोबत गझलकार सुप्रिया जाधव, प्राजक्ता पटवर्धन आणि गंगाधर मुटे |
------------------------------------------------------------------------------------------------------------
सातव्या अखिल भारतीय मराठी गज़ल संमेलनाच्या निमित्ताने मराठी गझल समेलन विशेषांक काढण्यात आला.
अंक वाचण्यासाठी अंकावर क्लिक करा.
पाने पलटण्यासाठी पानाच्या काठावर क्लिक करा.
------------------------------------------------------------------------------------------------------------
या संमेलनात संपन्न झालेल्या गझल मुशायर्यात मी ही हजल सादर केली होती. त्याची ही चित्रफ़ित.
----------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
सुन्दर............ पुस्तक
सुन्दर............
पुस्तक कुथे मिलेल क्रुपया कलवावे....
गझल हा सुरेश भटानंतर.... हा
गझल हा सुरेश भटानंतर....
हा प्रातिनिधीक गझलसंग्रह गझल सागर प्रतिष्ठान यांचेकडे मिळू शकेल.
ऑनलाईन विशेषांक मात्र पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून घ्यावा लागेल.
शेतकरी तितुका एक एक!