नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७
लेखनाचा विषय : शेतकरी आत्महत्त्या
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
विभाग : अ) पद्यकविता
(२) बळीराजा
हवालदील तो बळीराजा, देई कुणी ना थारा
आत्महत्या करी राजा, कुटुंबा नयनी धारा ॥
मातीत राबे हयात सारी
तरी सदा तो कर्जबाजारी
निसर्गावरी अवलंबून तो, त्रस्त करी दुष्काळ – गारा
आत्महत्या करी राजा, कुटुंबा नयनी धारा ॥१॥
काळी आई सोने पिकवी
श्रमप्रतिष्ठा लोका शिकवी
पण भाव मिळेना माला, कमाई ना येई दारा
आत्महत्या करी राजा, कुटुंबा नयनी धारा ॥२॥
कर्ज विळखा सावकारी
घर चालविण्या कठीण भारी
बोजा बोजा वाढत जाई, वाजे त्याचे बारा
आत्महत्या करी राजा, कुटुंबा नयनी धारा ॥ ३॥
लग्नाच्या त्या पोरी बाळी
सदैव आपला घाम गाळी
बाप होता स्वर्गवासी, कोण तयांना सहारा ?
आत्महत्या करी राजा, कुटुंबा नयनी धारा ॥ ४॥
पालन पोषण रखडत जाई
शिक्षण तयांचे पुरे ना होई
खपण्यासाठी नशिबी माती, सदैव झेली ऊन वारा
आत्महत्या करी राजा, कुटुंबा नयनी धारा ॥ ५॥
के. एन. साळुंके
१७, साईकृपा सोसायटी,
विद्यावर्धिनी कॉलेजमागे,
साक्री रोड, धुळे - ४२४००१
महाराष्ट्र
मोबाईल नंबर – ९८५०६१२७६०
Email: knsalunke2013@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
मस्त
मस्त कविता
Dr. Ravipal Bharshankar
छान कविता
छान कविता. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
शेतकरी तितुका एक एक!
पाने