नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
युद्ध सुरुच आहे
बापजाद्यांपासून
आता त्याची पाळी!
पण त्याचीही हालत तीच
अर्थाशिवाय अर्थ नाही
पण खेळावाच लागतो
नियतीचा हा डाव
सिमीत दारुगोळा, तुटपुंजे पाठबळ
घेवून अपुऱ्या सैन्यानीशी,
उतरतोय रणांगणात
दुष्काळाचे तोफगोळे, कर्जाचे बॉम्ब,
हवामानाच्या फैरी यांचा सामना करण्यास
आणि तोटकी त्याची अस्त्रशस्त्रे
मदतीची रसद पोहचविणारी
सरकारी यंत्रणाही होते शत्रुस फितूर
तरीही झुंज देवून
काढतोय मातीतून सोनं
तेव्हा इथल्या बाजारातही
मिळत नाही योग्य दाम
वेढा पडतो शत्रुसारखा व्यापाऱ्यांचा
आणि सुरू होतो त्याच्या लुटीचा बाजार
कोंडीतल्या योध्द्यापुढं
तहाशिवाय नसतो मार्ग
नको त्या अटी लादुन
व्यवस्था करते नामोहरम
अश्या ह्या जीवघेण्या खेळात पडतो तो धाराशाही
कदाचित ह्यालाच तर म्हणत नाही ना
शेतकऱ्याची आत्महत्या..
पण हि तर आहे व्यवस्थेने केलेली
एका शेतकरी योध्द्याची निःशृंस हत्या!
प्रतिक्रिया
योद्धा शेतकरी
वा!
शेतकरी आत्महत्या..
व्यवस्थेने केलेली एका शेतकरी योद्ध्याची निःशृंस हत्या!
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद
आभार तुमचे श!
योध्दा शेतकरी
छान कविता, आवडली!
सर,तुमच्या सर्वच कविता खुप
सर,तुमच्या सर्वच कविता खुप छान आहेत.
योद्धा शेतकरी
अप्रतिम कविता
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
योद्धा शेतकरी
अप्रतिम असे काव्य!
Pradip
धन्यवाद!
आभार प्रदीप थूल साहेब
खुप छान...
खुप छान...
एका शेतकरी योध्द्याची निःशृंस
एका शेतकरी योध्द्याची निःशृंस हत्या!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण