नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अशीही उत्तरे-भाग-१
…. थोडक्यात उत्तरे लिहा ….
प्रश्न – भारतीय पुरुष कोणत्या क्षेत्रात पारंगत आहेत?
उत्तर – लोकसंख्या वाढविण्यात.
प्रश्न – पोलीस यंत्रणेचे मुख्य कार्य?
उत्तर – हप्तावसूली.
प्रश्न – हत्ती पाण्यात पडला तर काय होईल?
उत्तर – ओला होईल.
प्रश्न – अमिताभ आणि जया मंदिरात काय करतात?
उत्तर – अभिषेक.
प्रश्न – एका डोळ्याने दोन पक्षी दिसत असेल तर दोन डोळ्याने?
उत्तर – चार.
………………………………………………….
प्रश्न – अनुप्रास अलंकाराचे उदाहरण सांगा?
उत्तर – जो मूर्ख मूर्ख आहे तो मूर्ख, मूर्ख नसेल तर,
एका मूर्ख असलेल्या मुर्खाने, दुसऱ्या मूर्ख नसलेल्या
मुर्खाला, जर मूर्ख म्हटले ; तर त्या दोघाही मूर्खांना
मूर्ख ठरवणे, मूर्खपणाचे ठरते.
. …. अपूर्ण वाक्ये पूर्ण करा. ….
प्रश्न – पुरुष मोर्च्याचा नारा – हम सब ……………
उत्तर – नालायक है.
प्रश्न – महिला मोर्च्याचा नारा – हमारी मांगे …………
उत्तर – भरा करो.
१) महागाईची व्याख्या करा ….
उत्तर – ज्या गायी शरीराने महाकाय असून जास्त
चारा खावून कमी दुध देतात त्यांना
महागाई म्हणतात.
२) इंग्रजी अनुवाद करा.. वीज गेली तर गेलीच गेली.
उत्तर – इलेक्ट्रिक वेंट तर वेंटच वेंट.
- गंगाधर मुटे
.......................................................................
( प्रकाशित दैनिक “सकाळ” ४ मार्च २००५)
…………………………………………………
प्रतिक्रिया
हाहाहा!
मस्त!
मस्तच
मस्तच
रानवेडा सचिन
मस्त
रावसाहेब जाधव (चांदवड)
पाने