
|  नमस्कार !  बळीराजावर आपले स्वागत आहे. | 
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कष्टकरी तू
घामगाळी तू
विश्वाचा अन्नदाता
तूच बळीराजा
शेतकरी राजा
स्वाभिमान तू माझा (धृ)
मातीतून पिकवितो सोनं
अन्नधान्याची रे ही खाण
नाही त्याची कुणा रे जाण
तूच आहे या विश्वाची शान
गरीबाचा वाली,तूच बलधारी
नको टेकवूस माथा
तूच बळीराजा
शेतकरी राजा
स्वाभिमान तू माझा ..(१)
ठेव जगण्याची तू आस
नको घेवूस गळ्या फास
किती भोगतो रे वनवास
तूच नसल्याचा होतो भास
तुझ्याविना नाही,तूच सर्वकाही
कष्ट नाही तुझ्याविना हाता
तूच बळीराजा
शेतकरी राजा
स्वाभिमान तू माझा..(२)
एका दान्याचे केले हजार
नाही हक्काचा मिळे बाजार
इथे सारेच झाले मुजोर
भूमिपुत्रा केले कमजोर
नाही रडायचं,दादा लढायचं
नव्या उमेदिनं आता
तूच बळीराजा
शेतकरी राजा
स्वाभिमान तू माझा..(३)
             - रंगनाथ तालवटकर
                चिखली (कोरा)
                त.समुद्रपूर जि.वर्धा
 
      
    
      
प्रतिक्रिया
Dhirajkumar B Taksande
खुप छान गीतरचना सरजी
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
 
 
शेतकरी तितुका एक एक!
पाने