पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
बांध शेताचा
नीधड्या छातीवर झेलतो खेळ ऊन पावसाचा, जानीतो कष्ट बळीराजाचे तो बांध माझ्या शेताचा.(1)
वाढला त्याच्या अंगाखांद्यावरी राबता बाप दादाचा, पीढ्यानपीढ्या तसाच खंबीर तो बांध माझ्या शेताचा.(2)
पोसीतो कुशीत वृक्षपोरींना बाप बनुन बोर-बाभळीचा, नीजवे थकलेल्या जीवास तो बांध माझ्या शेताचा.(3)
आहे साक्षीदार हा भुमीपुत्रांच्या घामाचा, पाहतो वाट कोंब फुटण्याची तो बांध माझ्या शेताचा.(4)
प्रज्ञा आपेगांवकर..
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!