नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
"गझल"
शीर्षक :- गर्भार कास्तकारी
मातीत घालते जर, सरकार कास्तकारी..!
तक्रार मग कुणाला, करणार कास्तकारी..?
संत्ताध श्वापदांच्या, पाहून धोरणाला,
ही आज ना उद्याला, मरणार कास्तकारी..!
प्रत्यक्ष कर्जमाफी, देतो म्हणून नुसता,
करतोय भाषणांनी, गर्भार कास्तकारी...!
आश्वासनांस खोट्या, आता विराम द्यावा,
थापांमुळे खरे ही, बुडणार कास्तकारी..!
मालास भाव नाही, बेभाव बी बियाणे,
सांगा किती अजुनी, छळणार कास्तकारी..?
शासकिय धोरणांचा, करुनी निषेध यंदा,
उचलेल त्याविरोधी, हत्त्यार कास्तकारी..!
_रमेश अरुण बुरबुरे
मु. निंबर्डा, पो.शिरोली
ता.घाटंजी, जी.यवतमाळ
पिन कोड क्र.४४५३०१
मोबाईल क्र.९७६७७०५१७०
ईमेल आयडी : burbureramesh@gmail.com
प्रतिक्रिया
बढीया
छान गझल, रमेश!
Dr. Ravipal Bharshankar
सर जी.....मनस्वी आभार
खर तर गझल लिहिण्याची गोडी आवड आपण निर्माण केली..... जीवनातली १२,१३ वी गझल असेल याचे श्रेय आपणास जाते.......thanks for being with me..!
R.A.Burbure
Best
Khup Sundar
धन्यवाद नम्रता
खूप खूप आभार
R.A.Burbure
Dhirajkumar B Taksande
जबरदस्त गझल भाऊ!
मनस्वी धन्यवाद सर...!
डॉक्टर साहेबाची प्रेरणा आहे गझलसाठी....
R.A.Burbure
रमेश भाऊ जबरदस्त
अतिशय छान
Pradip
आदरणीय थुल सर मनपूर्वक आभार
आपला अभिप्राय बहुमूल्य आणि लेखणीला नव निर्मितीसाठी ऊर्जा देणारा आहे सर....मनस्वी धन्यवाद
R.A.Burbure
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
खूप छान रचना रमेश .
खूप छान रचना रमेश .
गझल
अप्रतिम सर गर्भार कास्तकारी
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
=-=-=-=-=
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
मोबाईल अॅप