Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




नदी आणि झाड

लेखनविभाग: 
कथा

थोडं वेगळं..

~~ नदी आणि झाडं ~~
(रूपक कथा)

एकदा एक नदी पर्वतांच्या पायांशी वेल्हाळत , फेसाळत डोंगर दऱ्यातून आपल्याच मधुर धुंदीत हिरवाईच्या रस्त्याने एकटीच निघाली होती.जाता जाता ती माणसांच्या राज्यात पोहोचली.लोक तिच्याकडे येऊ लागले.कोणी पूजा करे ,कोणी आंघोळ करे ,कोणी उगाच पाण्यात पाय सोडून एखाद्या शिळेवर बसून राही. ती पोहोचलेल्या गावाच्या काठावर जवळच एक मंदिर होत त्यामुळे इथे लोकांची वर्दळ वाढली.आधी सुरुवातीला नदीला हे सगळं खूप आवडू लागलं. ती आनंदाने वाहू लागली..राहू लागली.

एक दिवस तिला काठावरच्या झाडानं विचारलं,

"काय गं नदीबाई तुला कसं वाटतंय..आमच्या या माणसांच्या गावात.. आवडलं का तुला गाव?."

नदी म्हणाली,

"हो रे झाडा, मला खूप आवडलं हे गाव,ही माणसं ! तिकडे जंगलात कसं‌ मी एकटीच आपापली वाहत असायचे इथे मात्र माणसांचा राबता असतो त्यामुळे मला करमतं. किती मानतात ही माणसं मला! माझी पूजा करतात.मला एकट सोडत नाहीत.लहान मुलांच्या खोड्या पाहून तर मज्जा येते मला.बरं‌ झालं त्या जंगलातून इथे आले ते!"

हे ऐकून झाड कुत्सीतपणे हसत म्हणाले,

"अगं, नदीबाई हा माणूस एवढा चांगला नाही गं‌...खूप स्वार्थी आणि संधीसाधू आहे.हळू हळू तू कधी नष्ट होशील तुझं तुलाही नाही कळणार.मला ही आधी तुझ्यासारखंच वाटायचं. मी सुद्धा या माणसांवर खूप प्रेम करायचो..लाड करायचो..ते सुद्धा मला कधी एकटं सोडायचे नाहीत.मी लहान असताना मला पाणी घालायचे.मी पण त्यांना फळं,सावली द्यायचो. माझ्या फांद्यांवर ते झोके बांधायचे खूप छान वाटायचं त्यांच्यासोबत मी ही झोके घ्यायचो... एवढा जिव्हाळा निर्माण झाला होता पण एक दिवस एका मुलाने चुकून माझी फांदी तोडली तर त्याच्या वडिलांनी आणखी चार फांद्या तोडून जळतनासाठी नेल्या तेव्हापासून प्रत्येक जन गरज पडेल तस माझ्या ओल्या फांद्या तोडून नेतात. मला कुऱ्हाडीने घायाळ करतात त्यामुळे जिवन्तपणी मी रोजचंच मरण अनुभवतो पण "मी सजीव आहे" हा विचार ही त्यांच्या मनात येत नाही."

अश्या प्रकारे आपलं दुःख नदीला सांगू लागला. अश्रू रूपात झाड स्वतःचं एक एक पान गाळत होतं. हे सगळं ऐकून नदी सुन्न झाली अंतर्मुख होऊन विचार करू लागली.झाड आणि नदीची घट्ट मैत्री झाली.नदीने 'जे होईल ते पाहू ' असा विचार स्वीकारला आणि संथपणे वाहत राहिली.

कालांतराने नदीला झाडाच्या बोलण्यातली सत्यता पटली.लोक नदीच्या प्रवाहात कचरा,घाण, नालीचे
पाणी सर्व आणून सोडू लागले. आपल्या शेतांसाठी मोठ्या मोठ्या मोटारी लावून नदीतील पाणी खेचून घेऊ लागले. आता तिला आपलं जंगलातलं अवखळ, स्वच्छ, निर्मळ रूप आठवलं..ते हळू हळू लोप पावत चाललं होतं आणि अवखळ , अल्लड युवती प्रमाणे दिसणारी ही नदी आता एखाद्या सुरकुतलेल्या वृद्धेप्रमाने दिसू लागली.

नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे तिचा जिवलग मित्र झाड ही तिच्या पासून दुरावला होता.एका संध्याकाळी असाच विचार करत असताना नदीवर एक वृद्ध महिला आली आणि एका दगडावर बसून रडू लागली. तिच्या मुलांनी तिला घराबाहेर काढले होते..आता तिला कोणीही वाली नव्हता..अंगात सामार्थ्य नव्हतं म्हणून ती इथे आली होती.रडता रडता ती दगडावरून उठली आणि नदीच्या पात्रात शिरली हळू हळू नदीनेही तिला आपल्या बाहुत सामावून घेतले. दोन समदुःखी मैत्रिणी एकरूप झाल्या.

©रोहिणी पांडे,नांदेड

Share

प्रतिक्रिया