Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


अधिक माहितीसाठी 
http://yugatma.sharadjoshi.in/  
येथे भेट द्या.सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥

प्रकाशीत: 
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत  ॥३३॥
 
लख्खलख्ख लख्खलख्ख, तुंबडी का गाणा
तुंबडीवाला आला त्याची, तुंबडी भरून देणा ...!!
 
सांगतो मी एक बात, इकडं तुमी फ़िरा
आमच्यापाशी एक हाय, सचिन जैसा हिरा
भारला त्याने देश पुरा, जग येडेपिसे
शेनवार्नला स्वप्नामंधी, चौके-छक्के दिसे
कान द्या इकडं जरा, ऐकून तुम्ही घेणा
तुंबडीवाला आला त्याची, तुंबडी भरून देणा ...!!
 
दिसायला म्हणान तर, छोटी मूर्ती हाये
क्रिकेटचं सारं जग, त्येचा खौफ़ खाये
शतकांची गणती नाय, किती चौके-छक्के
अचंबित दुनियासारी, सारे हक्के-बक्के
देव्हार्‍यात पूजा त्याची, खांदी घ्यावा मेणा
तुंबडीवाला आला त्याची, तुंबडी भरून देणा ...!!
 
कधी ना खचला हिंमत, त्याचे नांव सचिन
माणूस व्हय का देव ह्यो, कांप्युटरी मशीन?
खेळापुढे कधी त्याने, मोजला नाही पैसा
भगवंताने द्यावा पुत्र, घरोघरी ऐसा
समद्यायच्या तोंडी नांव, सच्चिन-सच्चिन येणा
तुंबडीवाला आला त्याची, तुंबडी भरून देणा ...!!
 
उत्तरेचा हिमालय, दक्षिणेचा सागर
सच्चिनच सारं जणू, अमृताची घागर
जिथं झडे पायधूळ, बॅट याची धडके
तिथं-तिथं तिरंगा, गौरवाने फ़डके
मानू नका नुस्ता देव, थोडी अभय कला घ्याणा
तुंबडीवाला आला त्याची, तुंबडी भरून देणा ...!!
 
- गंगाधर मुटे 'अभय'
=÷=÷=÷=÷=
चोवीस/दोन/दोन हजार दहा 
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
Share

प्रतिक्रिया

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शनी, 27/08/2022 - 17:03. वाजता प्रकाशित केले.

  २४ फेब्रुवारी २०१० रोजी ग्वाल्हेर येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 'मास्टर ब्लास्टर'ने ५० षटकांच्या सामन्यात केवळ १४७ चेंडूंत पहिले एकदिवसीय द्विशतक झळकावले. त्यावेळी लिहिलेले तुंबडीगीत. तुंबडीगीत अगदी लहानपणी म्हणजे ४०-४५ वर्षापुर्वी ऐकले होते. तेंव्हापासून गीत किंवा चर्चा देखिल ऐकली नाही. फ़ारच दुर्मिळ प्रकार. वेगळीच ढब, वेगळाच बाज. गीताची शब्दरचना देखिल निराळीच, हिंदी-मराठी मिश्रीत. तुंबडी गीताचे खास वैशिष्ट्य म्हणजे वाद्यप्रयोग. भोपळ्यापासून तयार केलेले एक तंतू वाद्य ज्यामध्ये एका तंतुवर दुसरा तंतु घासून नाद निर्माण केला जातो (वाद्याचे नाव माहीत नाही). त्यासोबतीला एक खुळखुळा सदृश्य वाद्य ठसकेबाज पद्धतीने वाजविले जाते (वाद्याचे नाव माहीत नाही). कोणाला याविषयी अधिक माहीती असेल तर अवश्य सविस्तर लिहावे, वाचायला आवडेल.

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शनी, 27/08/2022 - 17:04. वाजता प्रकाशित केले.

  शेतकरी तितुका एक एक!