Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



गगनावरी तिरंगा - ॥२१॥

प्रकाशीत: 
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)

India! 

गगनावरी तिरंगा - ॥२१॥
 
गगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!
 
तू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका
संगे हिमालयाला येण्यास मार हाका
समवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!
 
साथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना
धारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना
कन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!
 
तारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी
ही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी
आता अभय मनाच्या धुंदीस या जपावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!
 
- गंगाधर मुटे 'अभय'
=÷=÷=÷=÷=
चौदा/आठ/दोन हजार दहा
(वृत्त : आनंदकंद)
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
=÷=÷=÷=÷=
Share

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 15/08/2011 - 00:41. वाजता प्रकाशित केले.

    भारतमाता की जय...!
    स्वातंत्र्यदिन चिरायू होवो...!
    बलसागर भारत होवो
    विश्वात शोभुनी राहो...

    शेतकरी तितुका एक एक!

  • Arvind's picture
    Arvind
    बुध, 14/08/2013 - 14:41. वाजता प्रकाशित केले.

    स्वातंत्र्यदिन चिरायू होवो...!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 21/08/2014 - 22:48. वाजता प्रकाशित केले.
    January 27, 2013 · 

    https://www.facebook.com/FanOfRajThakreThisIsNotOfficialPage/posts/52499...

    Vijay Tarawade and 28 others like this. 2 shares

    Janardan Keshav सन्माननीय राज ठाकरे साहेब, तुमच्या नावाचा, फोटोचा आणि लोकप्रियतेचा फायदा उचलून लोक चक्क "वाङ्मयचौर्य" करीत आहेत....
    साहेब दखल घ्या या गोष्टीची...


    Vishal Vijay Kulkarni एक तर मुळ कविची परवानगी घ्यायची नाही, वर त्याचा तखल्लुस/मक्ता असलेली ओळसुद्धा गायब करुन टाकायची... यावरुनच तुमच्या वृत्तीची कल्पना येतेय राव. राज साहेबांच्या नावाखाली तरी निदान असले चौर्याचे प्रकार करु नका.

    Raj Saheb Thakre Vishal Vijay आपण आपली अक्कल पाजळलीत त्या बद्दल धन्यवाद.…


    Vishal Vijay Kulkarni चोर ते चोर वर शिरजोर ! हीच अक्कल आधी दाखवली असतीत तर आम्हाला अक्कल पाजळायची गरजच नव्हती. मुस्कटात बसल्यावर सॉरी म्हणण्याला काय अर्थ आहे?

    प्रमोद देव ही कविता गंगाधर मुटे ह्या माझ्या कवी मित्राची आहे आणि ती मी चाल लावून दिनांक ३डिसेंबर २०१० रोजी गायलेली आहे.... खाली दुव्यावर आपण प्रत्यक्ष कविता वाचू आणि ऐकू शकता.
    http://majhigani.blogspot.in/2010/12/blog-post_7230.html...See More
    त्यांची कविता माझे गाणे.: गगनावरी तिरंगा... !
    majhigani.blogspot.com


    Raj Saheb Thakre प्रमोद देव आपले म्हणणे पटले कवीचे नाव मानाने टाकले आहे. आजकाल इंटरनेट जगतात कुठून कुठून काही येते याची कल्पना नसते पेज अद्मीन जे जे चांगले दिसते ते पोस्त करतात. तरी पण झालेली चूक सुधारून कवीचे नाव टाकले आहे.

    मी उद्या परत नीट पूर्ण कविता पोस्त सन्माने करिण झालेल्या चुकी बद्दल दिलगिरी

    Janardan Keshav Raj Saheb Thakre : हे राज ठाकरे यांचे अधिकृत पेज आहे असे गृहीत धरून...
    १) गंगाधर मुटे यांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखलात. तसेच त्यांची रचना सन्मानपूर्वक व्यवस्थित पोस्ट करण्याचा खुलासा केलात यासाठी धन्यवाद.

    २) आपण मला तसेच Vishal Vijay Kulkarni यांच्यासाठी वापरलेले "आपण आपली अक्कल पाजळलीत त्या बद्दल धन्यवाद.…" हे वाक्य अशोभनीय आहे. आपण असे वाक्य वापरायला नको होते.

    ३) पोस्टवर प्रथमदर्शनी जे दिसले त्यावरूनच प्रतिक्रिया नोंदवली होती. तेव्हा गैरसमज नसावा.

    ४) हे प्रकार सोशल साईटवर सर्रासपणे घडत असल्याचा अनेकांना अनुभव आहे.

    ५) राज ठाकरे या नावाने अनेक पेज फेसबुकवर आहेत. त्यामुळे थेट त्यांनाच उद्देशून प्रतिक्रिया नोंदवली.

    ६) राज ठाकरे स्वत: उत्तम कलावंत तसेच कलाप्रेमी आहेत. त्यांच्या कुटुंबाला कलेची व साहित्याची मोठी परंपरा आहे. या पेजच्या Admin कडून कोणत्याही कलावंताचा, लेखकाचा, कवीचा अथवा कुणाही ज्येष्ठ व्यक्तीचा असा अपमान होणे ही बाब स्वत: राज ठाकरे यांनाही आवडणार नाही.

    ७) आपण कवीच्या मूळ कवितेची योग्य दखल घेतली यासाठी पुन्हा आभार.

    ८) या पेजवरून सुयोग्य प्रबोधन तसेच अनेक चांगल्या गोष्टी घडाव्यात यासाठी शुभेच्छा.

    ता.क : पेज लाईक करून या पेजच्या सदस्यांमध्ये सहभागी होत आहे. सलोखा असू द्यावा. कविता असो वा कोणतेही साहित्य.. त्यातून माणसे जोडली गेली पाहिजेत.

    Gangadhar Mute ही कविता माझी आहे.
    कवितेखाली कवीचे नाव घालायला हवे होते. पण कविचे नाव टाळण्यासाठी आपण
    शेवटच्या कडव्यातील अभय हा मक्ता असलेली ओळच गायब करून टाकली! काय म्हणावे राव?...See More
    Like · Reply · 4 · August 19 at 3:06pm


    Raj Saheb Thakre आजकाल इंटरनेट जगतात कुठून कुठून काही येते याची कल्पना नसते पेज अद्मीन जे जे चांगले दिसते ते पोस्त करतात. तरी पण झालेली चूक सुधारून कवीचे नाव टाकले आहे. सन्माने उद्या परत आपली कविता पोस्ट करू झालेल्या चुकी बद्दल दिलगिरी


    Vijay Tarawade कवितेची अशी चोरी करणे बरे नव्हे

    Raj Saheb Thakre Bar bhavana pohchalya!!

    Gangadhar Mute मूळ कविता
    http://www.baliraja.com/node/140
    येथे आहे.

    Gangadhar Mute @Raj Saheb Thakre, चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद आणि आभार.
    आजकाल आजकाल इंटरनेट जगतात वाङ्मयचौर्य व उचलेगिरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. कदाचित तुम्हाला कल्पना नसेल पण एकाच कवितेवर ही कविता माझीच आहे म्हणून तीनतीन चारचार व्यक्ती पुराव्यानिशी दावा करायला लागले आहेत. त्यामुळे या प्रकाराविषयी कवी/लेखक यांच्या भावना तिव्र झाल्या आहेत. त्यामूळेच तिखट व कडवे प्रतिसाद येतात.
    आपणही ह्या प्रकाराला आळा बसावा म्हणून सहकार्य करावे. यापुढे निनावी लेख/कविता टाकताना "या कवितेचा लेख/कवी माहित नाही" एवढी तरी तळटीप द्यावी म्हणजे तुमच्या सच्चाईबद्दल कोणी शंकाच घेणार नाही.
    परत एकदा धन्यवाद!

    Vallaree Chawathey Bhalchandra Hanchate Shri mute n shri dev yanna anumodan

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 15/08/2015 - 19:50. वाजता प्रकाशित केले.

    भारतमाता की जय...!
    स्वातंत्र्यदिन चिरायू होवो...!
    बलसागर भारत होवो
    विश्वात शोभुनी राहो...
    ------------------------

    शेतकरी तितुका एक एक!

  • Dr. Ravipal Bharshankar's picture
    Dr. Ravipal Bha...
    मंगळ, 07/08/2018 - 12:14. वाजता प्रकाशित केले.

    ओलांडून नकाशे.. क्या बात! १ नं.

    Dr. Ravipal Bharshankar

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 09/08/2018 - 10:08. वाजता प्रकाशित केले.

    प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 05/08/2022 - 16:10. वाजता प्रकाशित केले.

    शेतकरी तितुका एक एक!