पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
जागण्या तैयार नाही झोपले सरकार सोंग आहे झोपण्याचे आपले सरकार
शेत्कऱ्यांची आर्त नाही ऐकता येणार मारतांना धोरणातच गावले सरकार
आज कळले मानती का ते असे आभार चोरट्यांना साथ देण्या धावले सरकार
बुजवणे सोडून येथे पाडती हे भोक या जहाजा बुडवणारे भासले सरकार
शर्यतीला धावण्याच्या आजही लाचार पाच वर्षांचे तरीही रांगले सरकार
जाप केला 'धिर' तरी ना भेटले जिवदान पाहुनी धन धनपतींना पावले सरकार
वृत्त :~आस्त्रवीणी लगावली :~गालगागा गालगागा गालगागा गाल
सोंग आहे झोपण्याचे आपले सरकार! आस्त्रवीणी वृत्तात तुम्ही आणखी एका अप्रतिम गझलेची भर घातली. अभिनंदन!!
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
अप्रतिम धिरज भाऊ!
सोंग आहे झोपण्याचे आपले सरकार!
आस्त्रवीणी वृत्तात तुम्ही आणखी एका अप्रतिम गझलेची भर घातली. अभिनंदन!!
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

शेतकरी तितुका एक एक!