नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गांधीजी ! तुम्ही म्हटल खेड्याकडे चला,
पण इथे रचली जात आहेत स्मार्ट शहरं,
या शहरासारख स्मार्ट,
कधी होईल माझ वावर.........
गाजावाजा करुन आखल जातय,
डिजीटल इंडीयाच धोरण,
पण या देशात थांबेल कधी,
शेतकऱ्यांच मरण......
नवनविन धोरण आखुन,
शहर करताय स्मार्ट,
शेतीच्या विकासाच धोरण,
होईल कधी स्टार्ट.....
डिजीटल होईल सगळं ,
करता एक क्लिक,
एका क्लिकवर खरच,
येईल का आमच पिक........
स्मार्ट शहर डिजीटल इंडीया,
हे सगळं झगमगासाठी ,
काय केल जातय,
या देशाच्या पोशिंद्यासाठी...
गांधीजी नाव तुमच,
पण विचारांचा दिला बळी,
फक्त चित्रपटातच गुणी ठरते,
गांधीगिरी नावाची गोळी.......
श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी जि. वर्धा
प्रतिक्रिया
डिजिटल ..... वावर
श्रीकांत दादा ,
अगदी मोजक्या आणि मार्मिक शब्दात तुम्ही आपणा सर्वांचीच वेदना मांडली, बर वाटलं, कुठतरी बीज आन्कूरतेय , त्याच संगोपन करालच अशी अश्या बाळगतो.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! :Congrats: :Congrats:
शेतकरी तितुका एक एक!
पाने