Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




कवी संमेलन/गझल मुशायरा २०१७ : अटी आणि शर्थी

तिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन  
दिनांक : २५ व २६ फेब्रुवारी २०१७
स्थळ : संस्कृती सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली

प्रतिनिधी नोंदणी

नमस्कार,

           तिसर्‍या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनामध्ये "शेती आणि शेतकरी" या विषयावरील रचना सादर करण्यासाठी कवीसंमेलन आणि गझल मुशायरा असे दोन स्वतंत्र सत्र ठेवण्यात आलेले आहे. या कवीसंमेलन किंवा गझल मुशायर्‍यात सहभागी होऊ इच्छीणार्‍या कवी आणि गझलकारांनी प्रतिनिधी नोंदणी करणे आवश्यक आहे. जे संमेलनाला रसिक म्हणून उपस्थित राहण्यासाठी प्रतिनिधी नोंदणी करतील त्या प्रतिनिधींपैकीच कवी आणि गझलकारांची निवड करण्यात येणार आहे.

नियम, अटी आणि सूचना :

  1. 'काही' साहित्यिकांच्या मते ते प्रतिनिधी नोंदणी करणार नाहीत. ते सन्माननीय व्यक्तिमत्व असल्याने त्यांना सन्मानाने निमंत्रित करावे. साहित्य चळवळीला हा मुद्दा मान्य आहे. पण विना नोंदणी सभागृहात प्रवेश मिळणार नाही मग निमंत्रित सन्माननीय साहित्यिक त्यांची कलाकृती कुठे सादर करतील? रोडवर उभे राहून कि समोरच्या ग्राउंड मध्ये बसून कि दारासमोर उभे राहून? याचे उत्तर साहित्य चळवळ शोधत आहे. उत्तर गवसले कि योग्य निर्णय घेण्यात येईल.
  2. आम्ही सारस्वत आहोत, आम्हाला सन्मानाने निमंत्रित करा, आम्हाला पालखी पाठवा, जाण्यायेण्याचा खर्च द्या, मानधन द्या. अशी 'काही' साहित्यिकांची अपेक्षा असते. स्वेच्छेने संमेलनास येणे म्हणजे अनेकांना प्रचंड अपमानास्पद वाटते. प्रतिनिधी नोंदणी करणे म्हणजे भिकाऱ्यासारखे हातात कटोरे घेऊन उभे राहिल्याचा अनेकांना आभास होतो. स्वतःला अतिप्रतिभाशाली समजणाऱ्या प्रतिभावंतांना तर चक्क त्यांच्या प्रतिष्ठेवर अरिष्ट आल्यासारखे वाटते. अर्थात अशी भावना 'काही' साहित्यिकांची असेल तर ते गैर आहे असेही आम्ही मानत नाही. पण आपण सन्मान कुणाला मागतो आहोत, याचे भान किंवा इतके छोटेसे व्यावहारिक ज्ञान सारस्वतांना का असू नये? शेतकरी चळवळ म्हणजे साहित्यिकांच्या पालखीचा भोई नव्हे की त्यांनी या साहित्य चळवळीकडून पालखीची अपेक्षा धरावी. उलट या साहित्य चळवळीकडे साहित्यिकांनी आपली आई म्हणून बघितले पाहिजे आणि साहित्यिकांनी या साहित्य चळवळीच्या पालखीचा भोई होण्यात धन्यता मानली पाहिजे. 
  3. शेतकरी साहित्य चळवळ ही साहित्यिकांची माता आहे. मातेकडून सन्मानाची अपेक्षा करायची कि मातेपुढे नतमस्तक व्हायचे याचा सारासार विचार करण्याची 'काही' साहित्यिकांना गरज आहे. साहित्यिकांना कॉमन सेन्स असूच नये, असे कुठल्याही साहित्यात नमूद केलेले नाही.
  4. शासकीय मदतीशिवाय वाटचाल करणार्‍या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीला लोकवर्गणीशिवाय अन्य आर्थिक स्रोत नसल्याने व गडचिरोलीसारखा आदिवासी बहुल भौगोलिक प्रदेश लक्षात घेता सहभागींना मानधन व प्रवासखर्च देणे शक्य होणार नाही, हे आम्ही प्रांजळपणे नमूद करू इच्छितो.
  5. ज्यांची निवड झाली त्यांना संमेलनाला पूर्वपरवानगीशिवाय अनुपस्थित राहता येणार नाही. नाव छापण्यापुरते नाव नोंदवायचे व नंतर खुशाल गैरहजर राहायचे, अशा स्वभावाच्या व्यक्तींनी कृपा करुन नोंदणी करु नये.
  6. सर्व जिल्ह्यांना/विभागांना तसेच महिलांना प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य संधी देण्याचा आमचा प्रयत्न असेल. सत्राची वेळ आणि सहभागी कलाकारांची संख्यामर्यादा लक्षात घेता नोंदणी केलेल्या सर्वांची निवड होणे अशक्य आहे. ज्यांची कवीसंमेलन/गझल मुशायरा यासाठी निवड झाली नाही त्यांनी रसिक म्हणून संमेलनाला उपस्थित असावे अशी आमची विनंती आहे. स्टेजवर संधी मिळणार असेल तरच मी येणार, रसिक म्हणून येणे माझे काम नव्हे, अशा स्वभावाच्या व्यक्तींनी सुद्धा कृपा करुन नोंदणी करु नये.
  7. कोणत्याही साहित्यिकाने निदान एक वर्ष तरी शेतकरी संमेलनाला एक रसिक म्हणून उपस्थित राहिले पाहिजे. दुसऱ्या वर्षी व्यासपीठावर संधी मिळण्याची अपेक्षा करावी. जो उत्तम रसिक असतो तोच उत्तम साहित्यिक असतो, असे शेतकरी साहित्य चळवळीचे मत आहे.
  8. अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ शेतीमातीशी बांधिलकी राखणार्‍यांची असावी, तिथे व्यक्तिगत अहंभावनेला थारा नसावा.
  9. अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे सर्व कामकाज पारदर्शीपणाने व्हावे, असा आमचा प्रयत्न असतो.
  10. आपली प्रतिनिधी नोंदणी प्रक्रिया किचकट आहे, असे अनेकांचे मत आहे आणि ते शतप्रतिशत खरेही आहे, हे मान्य आहे. पण गंमत अशी आहे कि नोंदणीची प्रक्रिया सुलभ आणि विनामूल्य असली कि धडाधड लोक बुकिंग करून टाकतात. सभागृहाची क्षमता १००० आसनांची असेल तर दोन दिवसात बुकिंग हाऊसफुल्ल होऊन जाते. मात्र कार्यक्रमाला फक्त २०० लोक येतात आणि ८०० खुर्च्या शिल्लकी राहतात. आम्ही अनेक कवी संमेलने पाहिली आहेत कि कार्यक्रमपत्रिकेत कवी म्हणून नावे असलेल्यापैकी २० टक्के कवी सुद्धा प्रत्यक्षात हजर राहत नाहीत. मग बिचारे आयोजक उपस्थितांपैकी कुणी कवी असेल तर त्यांनी चिठ्ठ्या पाठवाव्या असे आवाहन करून कविंना वेळेवर संधी देऊन कार्यक्रम साजरा करून घेतात. अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीच्या मते ही बेशिस्त सारस्वतांना शोभादायक नाही. इतरत्र जे घडत आले ते अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीच्या कार्यक्रमात घडू नये, अशी प्रामाणिक इच्छा असल्यानेच ३ ऱ्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनासाठी किचकट असली तरी शिस्त पाळली जाईल अशी आणि संमेलन यशस्वी होईल अशी कार्यपद्धती अंगिकारण्याचे निश्चित करण्यात झाले आहे. आपले सहकार्य मिळेलच याची खात्री आहे.
  11. शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवू पाहणाऱ्या हौशा-गौशा-नवश्यांचा जमाव एवढेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि यातून लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवी पिढी जन्माला यावी, अशी अपेक्षा आहे.
  12. कॉमन स्वरूपाची निवास व्यवस्था करण्यात येईल. जेवण, फराळ, चहाची व्यवस्था निशु:ल्क असेल.
  13. सहभागींना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह दिले जाईल.
  14. कवीसंमेलन किंवा गझल मुशायर्‍यात सहभागी होऊ इच्छीणार्‍या कवी आणि गझलकारांनी खालील लिंकवर क्लिक करुन आपली नोंदणी करावी. काही तांत्रिक अडचण आल्यास abmsss2015@gmail.com या विरोपाव्दारे (इमेल) किंवा बळीराजावरील व्यक्तिगत निरोपाच्या माध्यमातून आमचेशी संपर्क साधावा.

आपण सदस्य असल्यास लॉग इन करा. सदस्य नसल्यास सदस्यत्व घेऊन लॉग इन करा.
Ad  नंतरच खालील लिंकवर क्लिक कराAd

कवी आणि गझलकारांची नोंदणी

**********
आपली नोंदणी झाली की नाही याचा पडताळा करण्यासाठी http://www.baliraja.com/kavi-2017 या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला तुमची स्वतःची नोंद तिथे दिसली तर तुमची नोंदणी यशस्वीपणे पार पडली आहे, असे समजावे.
**********

Share

प्रतिक्रिया