नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
#बाप आता शेतात येत नाही@
कधीकाळी शेतात फुलायचा
त्याच्या घामाचा मळा
तरारत डोलणार्या पिकांचा
दिसायचा रम्य सोहळा
बैलगाडी भरल्या पोत्यांची
घरात अडचण करायची थप्पी
धान्याची राशी आता घरात येत नाही
कारण , बाप! बाप आता शेतात येत नाही
त्याने जेव्हा शेताला ऊसाची गोडी लावली
चाडं, पेरणी अवजारं
कुजत गंजत छपरात पडली
जेव्हा गाव महापुरापासून वेढला
तेव्हा पासून गोठा मोकळा पडला
गावात पहिला वैरण बिंडा
आता त्याचा येत नाही
कारण, बाप ! बाप आता शेतात येत नाही
तो ऊस पिकवायचा खरा
पण शेजाराचा स्लिपबॉय
गहाळ करायचा नोंदी
बापानं कारखाना अॉफिसला
टाळंच ठोकल्याच आठवत
बघून त्याची अनागोंदी
एकदा कारखान्याचा सभेत
झेललीही त्यांन लाठी
तरी आवाज केला नाही
पण , बाप ! बाप आता शेतात येत नाही
तो वाचतो पेपरात बातम्या
कारखानदार साखर सम्राटांच्या
दळभद्री सरकारी कृषि धोरणांच्या
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या
सीमेवरील शहीद जवानांच्या
सरकारी वेतनवाढीव आयोगांच्या
अन् चार शिव्या हासडत म्हणतो
शेतकऱ्यांच्या घामाला दाम नाही
म्हणून, बाप! बाप आता शेतात येत नाही.
©संदीप नाझरे, आमणापूर, ता पलुस, जि.सांगली.
/९७६६६८९४३३
________
प्रतिक्रिया
मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
बाप आता शेतात येत नाही!
आशयगर्भ कविता!!
धन्यवाद
पाने