Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




महाबळेश्वर संमेलन प्रतिनिधीसाठी महत्वाची माहिती आणि सूचना : बोधचिन्हाचे विमोचन

Logoमहाबळेश्वर संमेलन प्रतिनिधीसाठी महत्वाची माहिती आणि सूचना

14 वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन ऑनलाईन नियोजन सभा.
दिनांक 31 जानेवारी 2026 सभेचा वृत्तांत : जावळी परिसर ऐतिहासिक पार्श्वभूमी

14 वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन ही दिनांक 21 व 22 फेब्रुवारी 2026 रोजी महाबळेश्वर जवळील सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या जावळीच्या खोऱ्यात कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाभेमोहन या गावी होत आहे. या भागावर पूर्वी शिर्के सरदारांचे राज्य होते. १४–१५व्या शतकात शिर्के या स्थानिक सरदारांनी हा प्रदेश नियंत्रित केला होता. त्यानंतर चंद्रराव मोरे नावाच्या सरदाराला बीजापूरच्या सुलतानाने १२,००० हिंदू फौज दिली आणि त्यांनी शिर्के सरदारांना पराभूत केले.

शिवाजी महाराजांचा जावळीवरील प्रभाव
शिवाजी महाराजांनी या प्रदेशात सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी १६५६ मध्ये जावळीचा प्रदेश मोरेंकडून जिंकला. प्रतापगड या किल्ल्याची निर्मिती आणि त्या भागातील घटनांचे संबंधही येथे आहेत; प्रतापगड किल्ला शिवाजी महाराजांनी बनवलेला आणि संरक्षणासाठी महत्त्वाचा होता. जावळी खोरेचा भाग शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या कालखंडात अत्यंत महत्त्वाचा होता. येथे प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. आदिलशहाचा बलाढ्य सरदार अफझलखान यांचा वध ही प्रतापगडाच्या पायथ्याशी झाला आहे.

14 वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन:
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, प्रत्येक प्रांतातील शेतकऱ्यांच्या समस्या यांची माहिती होण्यासाठी अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी भरवले जाते. सह्याद्रीच्या कुशीतील शेतकरी जीवन समजण्यासाठी या वर्षीचे साहित्य संमेलन दाभेमोहन या अतिदुर्गम गावी दिनांक 21 व 22 फेब्रुवारी 2026 संपन्न होत आहे. या संमेलनानिमित्त येणाऱ्या अडचणीवर चर्चा करण्यासाठी व संमेलन बोधचिन्ह प्रकाशन सोहळा हा या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्री. ज्ञानदेवजी राऊत सर यांचे हस्ते करण्यासाठी दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी या संमेलनात सहभागी होणाऱ्या सर्व साहित्यिक व साहित्य रसिक समवेत रात्री 8 वाजता पहिली ऑनलाईन नियोजन सभा आयोजित करण्यात आली.

संमेलनात झालेली चर्चा खालीलप्रमाणे :-
1) या संमेलनाचे आयोजक श्री गंगाधर मुटे व ॲड. श्री. सतीश बोरुळकर यांनी सहभागी सर्व सदस्यांचे अभिनंदन करून दाभेमोहन परिसराविषयी माहिती दिली.
2) संमेलन बोधचिन्हांचे अनावरण :
आयोजक श्री. गंगाधर मुटे यांनी 14 वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक साहित्यिक डॉ.ज्ञानदेव राऊत यांना विनंती करून यावर्षीच्या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करावे अशी सूचना केली. त्यावर डॉ. राऊत सरांनी मोबाईल स्क्रीनवर बोधचिन्ह दाखवून अनावरण झाल्याचे घोषित केले. त्यानंतर बोधचिन्हावरील चित्राविषयी विवेचन केले. शेतकरी संमेलनाविषयी बोलतांना ते म्हणाले की या संमेलनातील दोन्ही परिसंवाद अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. शेतकरी कवी संमेलन व शेतकरी गझल मुशायरा याद्वारे शेतकऱ्यांच्या व्यथा, उपाययोजना मांडण्याचे महत्त्वपूर्ण काम घडेल. तसेच मा. सतीशजी बोरुळकर यांच्या संकल्पनेतून अक्षांशस्वर, दिव्यदृष्टी कलाकार, मुंबई प्रस्तुत “सह्याद्रीची शौर्यगाथा" कार्यक्रमही कार्यक्रमाची उंची वाढवेल. एकंदरीत हे संमेलन शेतकऱ्यांच्या व्यथावेदनावर बोट ठेवण्याचे काम करत आपण सर्व जन मिळून हे संमेलन यशस्वी करूया, अशी साद दिली.
3) संमेलनस्थळी येण्याचा मार्ग व वाहतूक व्यवस्था :-
अ ) विदर्भ, मराठवाडा, अहिल्यानगर, पुणे येथून या संमेलनास येणाऱ्या साहित्यिकांनी पुणे कोल्हापूर महामार्गाचा वापर करून बस अथवा खाजगी वाहनाने वाई, पाचगणी मार्गे महाबळेश्वर येथे येणे. महाबळेश्वर येथून दर अर्ध्या तासाला पोलादपूर बस जाते. त्या बसने जावळी फाट्यावर उतरणे. जावळी फाटा ते संमेलन स्थळ हे दाभेमोहन 20 कि.मी. अंतर आहे. जावळी फाट्यावर संमेलन स्थळी जाण्यासाठी खाजगी वाहनांची व्यवस्था संमेलनाच्या आदल्या दिवसापासून दिनांक 20 व 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत केली आहे. मात्र प्रवासभाडे ज्याचे त्याला द्यावे लागेल.
ब) मुंबईहून येणाऱ्या साहित्यिकांनी महाड येथून पोलादपूर घाटातून येणे. त्यांना महाबळेश्वर येथे येण्याची गरज नाही. पोलादपूर ते महाबळेश्वर रोडवरच जावळी फाटा आहे. तेथे उतरून आयोजकांनी व्यवस्था केलेल्या खाजगी वाहनांनी पैसे देऊन यावे. जर स्वतःच्या वाहनांनी येणार असेल तर जावळी फाट्यावरून जावळी गावात जावे. तेथून 1 किलोमीटरवर एक कमान आहे. तेथून पुढे चतुरबेट नावाचे गाव लागते. तेथून पुढे पुलावरून दाभेमोहन गावी जाणे. रस्त्याने मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे यांचे गाव असल्याने रस्ता सिंगल पण चांगला आहे. रस्ता वळणाचा व सिंगल असल्याने कमी अंतर पण वेळ जास्त लागतो.
4) जर आपणाला संमेलनस्थळी येण्यासाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जावळी फाटा येथे येणे शक्य नसेल तर महाबळेश्वर किंवा जावळी येथे मुक्काम करावा. व दुसऱ्या दिवशी सकाळी यावे. जावळी गावात मर्यादित स्वरूपात हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा उपलब्ध आहे.
5) फक्त आणि फक्त रजिस्ट्रेशन केलेल्या 100 व्यक्ती यांची राहण्याची, चहा, नाश्ता व जेवणाची सोय उपलब्ध आहे. प्रतिनिधी नोंदणी केली नसेल तर संमेलनास येऊच नये. अशी सक्त सूचना संयोजन मंडळाने केली आहे.
6) संमेलनास दिनांक 20 फेब्रुवारी रोजी येणाऱ्यांनी आयोजकांना माहिती देणे आवश्यक आहे.. त्यानुसार जेवण व राहण्याची व्यवस्था करण्यात येईल.
7) संमेलन ही दाभेमोहन येथील असलेल्या सभामंडपात होईल तर राहण्यासाठी फक्त 50 टेन्ट उपलब्ध आहे. प्रत्येक टेंटमध्ये 2 व्यक्ती राहतील. संमेलनस्थळी टॉयलेट व बाथरूमची व्यवस्था केली आहे. त्याचा वापर करावा. बाहेर उघड्यावर कोणीही अस्वच्छता करू नये. नियमांचे काटेकोर पालन करावे.
8) संमेलनस्थळी येण्यासाठी जावळी फाट्यापर्यंत सर्वच मोबाईल ऑपरेटरला रेंज / कव्हरेजआहे पण दाभेमोहन येथे फक्त BSNL ची रेंज आहे. मोबाईल चार्जिंग टिकण्यासाठी मोबाईलचा कमीतकमी वापर व्हावा. आपल्याकडे पॉवर बँक असेल तर सोबत असू द्यावा.
9) महाबळेश्वर परिसर ही थंड हवेचे ठिकाण असल्याने फेब्रुवारी महिन्यात थंडीची शक्यता असल्याने गरम कपडे, शाल, ब्लँकेट आणि बॅटरी सोबत आणावी.
10) दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सर्वांना संमेलनात सहभागी होता यावे म्हणून संमेलनाची ग्रंथदिंडी ही 11 ते 12 व उद्घाटन सत्र हे दुपारी 1 वाजता ठेवले आहे तर समारोप ही 22 डिसेंबर रोजी सर्वांना वेळेवर घरी जाता यावे म्हणून दुपारी 2 वाजेपर्यंत संपेल.
11) संमेलन संपल्यानंतर ज्यांच्याकडे खाजगी वाहन नाही त्यांच्यासाठी खाजगी वाहन उपलब्ध केलेले आहे. जावळी फाट्यापर्यंत सोडण्याची व्यवस्था होईल. तेथून महाबळेश्वर अथवा पोलादपूरकडे जाता येईल. मात्र याचा प्रवासखर्च त्या गाडीतील ड्रायव्हर यांना संबंधित व्यक्तीने द्यावा..

या संमेलनानिमित्त घेतलेल्या पहिल्या ऑनलाईन सभेस आयोजक श्री. गंगाधर मुटे, ॲड. श्री. सतीश बोरुळकर, संमेलनाध्यक्ष डॉ. ज्ञानदेवजी राऊत सर, श्री. राजेंद्र फंड, श्री. साईनाथ रहाटकर, श्री. बाळासाहेब गिरी, श्री. उपेंद्र महात्मे, श्री. कैलास इंगळे, श्री. लक्ष्मण शिंदे, श्री. रमेश खांडेभराड, श्रीमती रिता जाधव, श्री. सारंग दरणे, श्री. सु. पू. अढाऊकर, श्री. साहेबराव तायडे, श्री. सुनील बावणे, श्री. गोरख पालवे अशा 17 व्यक्तींची उपस्थिती होती.

चर्चेत श्री. गंगाधर मुटे, ॲड. श्री. सतीश बोरुळकर, संमेलनाध्यक्ष डॉ. ज्ञानदेवजी राऊत, श्री. राजेंद्र फंड, श्री. साईनाथ रहाटकर, श्री. बाळासाहेब गिरी, उपेंद्र महात्मे, श्रीमती रिता जाधव, श्री. सु. पू. अढाऊकर, श्री. सुनील बावणे, श्री. गोरख पालवे, कैलास इंगळे, रमेश खांडेभराड, लक्ष्मण शिंदे यांनी सहभाग घेतला. पुढच्या ऑनलाईन मीटिंगची तारीख व्हॉटस् ऍप ग्रुपवर कळविण्यात येईल. त्यामध्ये इतरही विषयावर चर्चा होईल. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही ऑनलाईन सभा संपन्न झाली.
 

वृत्तांत लेखन : राजेंद्र फंड, अहिल्यानगर 
=-=-=-==-=-=-==-=-=-==-=-=-=
Ad प्रतिनिधीसाठी महत्वाची माहिती आणि सूचना  Ad
https://www.baliraja.com/node/3351

Ad महाबळेश्वर संमेलनाला कसे पोचावे  Ad
https://www.baliraja.com/node/3292

Ad कार्यक्रमपत्रिका Ad
https://baliraja.com/kp14

Ad प्रतिनिधी नोंदणी पद्धत  Ad
https://baliraja.com/rep-regd

Ad  नियोजन  Ad
https://baliraja.com/14-Ni
=-=-=-=-=-=-=-=-=-=-=

Share