नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

साक्षात पावसाला...

शिवम् पिंपळे's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखनस्पर्धा-२०१४
लेखनविभाग: 
गझल

खेचा कुणीतरी ह्या कोर्टात पावसाला
अडवा अनेक वेळा चक्रात पावसाला

तो शिस्तभंगण्याचा ठेवाच एक ठपका...
शिक्षाच यायची द्या वेळात पावसाला...

जोवर जमेल तोवर, डांबून ठेवुया अन्
शेतात पाडुया मग जोरात पावसाला...

जामीन द्यायला हो येईल शेतबंधू...
जपतोय जो कधीचा फोडात पावसाला...

तू कीव ठेव थोडी शेतातल्या श्रमांची
छोटीच ही विनंती साक्षात पावसाला...

~~ शिवम् :)

Share

Comments

Layout Settings