नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पराक्रमी असा मी
माझ्या मनात नाही, कसलाच भेद येतो
पोटात भूक त्याच्या, जेवून मीच घेतो
ना लोभ, मोह, माया, नाहीच लालसाही
उष्टे, जुने-पुराणे वाटून दान देतो
प्रेमात सावलीच्या सूर्यास पारखा मी
अंधारही अताशा संगे मलाच नेतो
फिर्याद ही जरासी घेऊन आज येता
कैवार रक्षणाचा खुर्चीत का दडे तो?
उच्चांक गाठताना बेबंद धूर्ततेचा
उंटीणिला शिडीने चंगून चुंबते तो
ना साम्यवाद रुजला, नाही समाजवादी
बस धन्यवाद केवळ का अभय आवडे तो?
गंगाधर मुटे
………………………………………
चंगने = चढणे (वृत्त - आनंदकंद )
………………………………………
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
प्रतिक्रिया
फेसबुक लिंक
फेसबुक लिंक