Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


अधिक माहितीसाठी 
http://yugatma.sharadjoshi.in/  
येथे भेट द्या.

none
धंदा

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
गीतरचना

*धंदा*

सा-यांचा लुटालुटीचा धंदा
येड लागेल बापाला यंदा

गावात आल नव तलाठी...
एका कागदासाठी दोनशे रुपये प्रत्येकी
सा-यांचा लुटालुटीचा धंदा
येड लागेल बापाला यंदा

पाऊस येतो जसा घोटाळा सुरू
कधी अंगठा तर कधी भुरभुरू
सा-यांचा लुटालुटीचा धंदा
येड लागेल बापाला यंदा

तश्यातच जसा सठ्ठा लावावा...
तसा खेळ बोगस बियाणांने करावा
सा-यांचा लुटालुटीचा धंदा
येड लागेल बापाला यंदा

जेमतेम बियाणं जमवलं जगवलं
कसतरी खुरपुन शेत फुलवलं
सा-यांचा लुटालुटीचा धंदा
येड लागेल बापाला यंदा

मग आली पाळी रासायनिक खत द्यायची...
जी हवी ती नाहीं, तरी तिनशे रुपये वर द्यायची
सा-यांचा लुटालुटीचा धंदा
येड लागेल बापाला यंदा

मजूर सार दोन रूपये वालं झालं
म्हणूनच कामाला कोणी नाहीं आलं
सा-यांचा लुटालुटीचा धंदा
येड लागेल बापाला यंदा

(ऐवढं सार होऊनं बाप मला काय म्हणतो माहित आहे का?...)
पोरा यंदा शिक्षण थांबव ना जरा...
फ्रि वाढलीया, थोडं शेतातच काम करा
सा-यांचा लुटालुटीचा धंदा
येड लागेल बापाला यंदा

कशी अन् काय बहिण वयात आली
हुंडा घेण्यासाठी रांग लागली ...
सा-यांचा लुटालुटीचा धंदा
येड लागेल बापाला यंदा

झालं गेलं सार काही आवरलं
शेतमाल घेऊन बाज़ार गाठलं
मग दलालाची पडली निच नजर
मनाचा भाव, हिसकावला भरभर
सा-यांचा लुटालुटीचा धंदा
येड लागेल बापाला यंदा

कशी खबर झायली सावकाराला
वासाचा कुत्रा जसा भाकरीला
चक्रवाढीवर मनचक्र फिरवला
होत नव्हतं सार पैकं नेऊन गेला
सा-यांचा लुटालुटीचा धंदा
येड लागेल बापाला यंदा

हुंड्यावालं धंद्यावालं फिर गरगर
बाप शरर्मल घेतलं बिष भरभर
सा-यांचा लुटालुटीचा धंदा
येड लागलं बापाला यंदा

(मायबाप ऐवढ्यावर थांबेल ती शेतक-याची व्यथा नाय पुढे ऐका)
पत्रकार आलं कॅमेरावालं आलं...
आपआपलं टि आर पी च धंदा केलं
सा-यांचा लुटालुटीचा धंदा
येड लागेल मला यंदा

खादी वाल्यानं ठोकलं मोठं भाषणं
पण कोणी पाहिलं ना घरचं राशन
सा-यांचा लुटालुटीचा धंदा
येड लागेल बापाला यंदा

येड लागून बाप पोरकं करून गेलं
डोक्यावर कर्जाचं माफ ठेवून मेलं
सा-यांनी ब्रॅण्ड म्हणून बापाला वापरलं
माझ्या नावाचं कोर पाकिट हो पाठवलं
सा-यांचा लुटालुटीचा धंदा
येड लागेल मला यंदा

ऐका माय बापा एकजुट धरा
एकमेकांस साह्य अवघे करा
आत्महत्या न करता...
चिमण्या पिल्यास घास भरा
जरी सा-यांचा लुटालुटीचा धंदा
चलढकल करून न्या हो यंदा
-महेश
8806646250.
Mdesale29999@gmail.com

Share

प्रतिक्रिया