![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
माणसासाठी कणसात दाणा
खळ्यावरचे खळते जगणे
कागदावरच पडती राशी
माना फिरवती ऊखळी सांधे
नगरामधले गणित उपाशी...
आशयाचे काळीज ओझे
शब्द कुणबी मळतो खांदा
सालभराच्या सोसिक तोंडी
सण पोळ्याचा रसिक मांडा...
हात हिकमती ओरबाडणारे
नागडी होते सुपीक माती
पंगत एकच खाणारांची
राबणारांच्या हजार जाती...
मांडीवरती दुष्कळाच्या
हंबरणारे दुधाळ चेहरे
पट मांडता महागाईचा
बदली सोंगट्या आपली घरे...
बुरखा ओढून निजती नगरे
माणुसकीने टाकल्या माना
माती मात्र जपते अजून
माणसासाठी कणसात दाणा...
रावसाहेब जाधव ( चांदवड)
(9422321596)
७०, महालक्ष्मी नगर,
चांदवड, जि.नाशिक ४२३१०१
rkjadhav96@gmail.com
प्रतिक्रिया
माझी कविता
वाचावी अशी कविता
रावसाहेब जाधव (चांदवड)
सुंदर
सुंदर
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद!
धन्यवाद सर!
रावसाहेब जाधव (चांदवड)
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
मोबाईल अॅप