नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बंद रस्त्यांतले, वेग मंद झाले
लढत्या राजांचे, श्वास थंड झाले
भविष्य भाकरीस, गोल रिंगण घाले
बारच्या वारीत, कुणी धुंद झाले
आश्वासने बघून, मन आनंदाने हासे
काही पाण्यात गेली, काहींंचे कंद झाले
व्यर्थ विकासाची,स्वार्थी शतकी खेळी
अन् त्याचे आता, मनात बंड झाले
शिवारात राबणारे हात, धरणीकंपासम कांपे
कहाणीचे त्याच्या, हजार खंड झाले
हिम्मतीने जिंकणारे, 'विजय' आज हारले
कारण बलदंड शत्रू , अधिकच चंड झाले
हाती घेऊनि बंदूका,उभे ठाकले हे
शोषितांस टिपण्याचे, साऱ्यांचेच छंद झाले
राजेश जौंजाळ पोहणा जि.वर्धा
********************
प्रतिक्रिया
छान
सूंदर
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद सर
धन्यवाद सर
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद मुटे सर
धन्यवाद मुटे सर
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
=-=-=-=-=
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 4 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
तुमचा बापही देऊ शकला नाही
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण