नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
दिसरात राबुनी सोसल्या खुप कळा,
कर्जाच्या विळख्यात शेतीचा घोटतोय गळा
सरकारचा जाब आणि निसर्गाचा कोप,
कर्जाचा बोजा डोक्यावर उडाली बळीराजाची झोप
बळीराजाच्या शेतीची बसत नाही आर्थिक घडी,
देशाच्या आर्थव्यावस्थेची त्यामुळे खाली उडी
सलागणीस पैशापाई, बँकाच्या दारावर,
कर्जाचा फास हळुहळु ओढतोय गळ्यावर
सत्ताधाऱ्यांची मेगाभरती कर्जबाजारी शेतकरी वाऱ्यावर्ती,
सत्तेची तुम्हाला का मस्ती, का वाटते हो स्वाभिमानी आयोगाची धास्ती
आलटुन पालटून सरकारच हिटलरवादी,
कर्जाचा बोजा उतरवणार आता कोणी ?
खुप झाला आण्याय आता कुठवर आम्ही सहन करू,
कर्जाच्या विळख्यातुन मुक्तीसाठी रस्तावर आम्ही उतरु.
गणेश गंगाधर वरपे ( ता. जि. जालना ) ७३८५८५१६५०
प्रतिक्रिया
पद्याकविता एल्गार बळीराजाचा !!
एल्गार बळीराजाचा !!
Ganesh
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद सर
धन्यवाद सर
Ganesh