नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अशीही उत्तरे-भाग-३
.… थोडक्यात उत्तरे लिहा ….
प्रश्न – आपले नांव सांगा ?
उत्तर – चक्कु सुर्या खुपसणकर.
प्रश्न – पत्ता द्या ?
उत्तर – कोणता देवु. टोपाझ की इरास्मिक ?.
प्रश्न – अहो गावाचे नाव सांगा ?
उत्तर – भामटीपुरा.
प्रश्न – आवडता चित्रपट?
उत्तर- पॉकेटमार,हाथ की सफाई.
प्रश्न – आवडीचे स्थळ ?
उत्तर – बस स्टॅंड,रेल्वे स्टेशन,गर्दीचे ठिकान.
प्रश्न – मासिक मिळकत?
उत्तर – ते लोकांच्या खिशावर अवलंबुन असते.
…………………..
प्रश्न – अनुप्रास अलंकाराचे उदाहरण सांगा ?
उत्तर – चबुतर्यावरुन चालता चालता चपळाईने त्या चतुर चटकचांदणीने चार चढेल चावट चिडिमारांना चपला चपलांनी चेचुन चांगलेच चोपले.
….. अपूर्ण गाणी पूर्ण करा. ….
प्रश्न – जिंदगीभर नही भुलेगी वो बरसात की रात ……………
उत्तर – सर्दी,खांसी और जुकामने तंग किया था सारी रात.
प्रश्न – आप जैसा कोई मेरे जिंदगीमे आये …………
उत्तर – तो बाप बन जाये.
…………………………
प्रश्न- देव प्रसन्न होऊन वर मागा म्हटले तर काय मागाल ?
उत्तर- आमच्या ३ मागण्या आहेत.
१) एटीएम,बँका बंद करा,रोकड घरी किंवा खिशातच असली पाहीजे.
२) पोलीस लठ्ठ व्हावेत.वेगाने पळता यायला नको.
३) महिलांनी पैसे ठेवण्यासाठी हाती पर्स वापरावी.भलत्या-सलत्या ठीकाणी पैसे ठेवु नयेत.
गंगाधर मुटे
…………………………………………………………………….
नोंद :- या रचना माझ्या स्वरचित आहेत परन्तु या घडामोडी दैनंदिन जिवनचर्येशी संबधित असल्याने या तर्हेची विनोदनिर्मिती यापूर्वीही झाली असू शकते.
…………………………………………………………………….
प्रतिक्रिया
बरसातकी...
रात खास आहे.