पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
रंग सुगीचा छळतो आहे वसंतही हळहळतो आहे
गारपिटीचे गुलाबजामुन डोळ्यामध्ये तळतो आहे
मावळतीचा तवा तांबडा भातुकलीला जळतो आहे
पडतो आहे, झडतो आहे तरी न मी ढासळतो आहे !
भोळसटांच्या वस्तीमध्ये घाम फुकाचा गळतो आहे
बेरंगाच्या रंगामध्ये रंग आणखी मळतो आहे
ऐलथडीच्या सुप्तभयाने पैलथडीने पळतो आहे
'अभय'पणाचा वाण तरी पण; पाय बावळा वळतो आहे
- गंगाधर मुटे ==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0==
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.