नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
माय बापाने पोटाला, दिला ला़ख वेळा पीळ .
तेव्हा कुठे कपड्याला , माझ्या माखायाची नीळ .
किती जिरवुन घाम , माती उजायची थोडी .
तेव्हा कुठे आयुष्याची ,पुढे दटायची गाडी .
बाप पेरी वावरात , बियाण्याचा थोडा घास .
तेंव्हा मनामध्ये त्याच्या, दिसे भलीमोठी रास .
पण काळेनिळे ढग , कुठे वाहुनिया जाई .
पेरलेलं सारं माती , तिच्या पोटामध्ये घेई .
असं एकदाच नाही , तर लाख वेळा घडे .
बाप मातीच्या नात्याला , जाई हळुवार तडे .
मग बाप वैतागुन , शिव्या विठ्ठ्लाला घाली .
सारे कोपले रे विठु , आता तुच आम्हा वाली .
बारा महिने दुष्काळ , सारा महिमा हा कसा .
थेंबभ्रर पाण्यासाठी , बाप़ झाला वेडापिसा
कोरड्याच विहीरीत , दिला बापानेही जीव .
फुटे पाझर रक्ताचा , आली दगडांना कीव .
कस अन सांगु किती , सारं दुखतंया जीनं
कुणब्याच्या आयुष्यात , कायमच रडगाणं .
प्रतिक्रिया
सागर जाधव
क्या बात है दिनेशभाऊ. सुंदर कविता...
सागर जाधव जोपुळकर
चांदवड
९४०४८०५०६८
मस्त
कोरड्याच विहीरीत , दिला बापानेही जीव .
फुटे पाझर रक्ताचा , आली दगडांना कीव .
अप्रतिम......
अभिनंदन.
अप्रतीम रचना. स्पर्धेतल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन. http://maymrathi.blogspot.com/