नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बाप वावरं पेरते
(वऱ्हाडी अष्टाक्षरी)
पाई पाई जमवून
बाप वावरं पेरते
काया काया मातीतुन
दाना दाना अंकुरते
डवरुन निंदुनीया
तन दुर ते सारते
पिक वाढते जोमानं
बाप वावरं पेरते
खेप वरीस भराची
पोट आमचे भरते
लेकी बाईले दिवाई
बाप वावरं पेरते
ऐन हंगामात राज्या
च्याट पावुस मारते
घोर हा जीवाले तरी
बाप वावरं पेरते
रोज आस पावसाची
ढग पाह्याले झुरते
माय देतसे हिम्मत
बाप वावरं पेरते
राख सारी सपनाची
मन दुखात शिरते
आस सुखाची मनात
बाप वावरं पेरते
कसं हुइल मनुन
उरी धडकी भरते
बाकी लगनं पोरीचं
बाप वावरं पेरते
कसबसं पिक येते
मंग बेपारी घेरते
माती मोल भाव जरी
बाप वावरं पेरते
लागवनीचा आकळा
खोटा हिसाब ठरते
देने अजूनही बाकी
बाप वावरं पेरते
रोज उगवे दिवस
वाटे दुख हे सरते
सारा अंधार फिटन्या
बाप वावरं पेरते
बाप वावरं पेरते ....
बाप वावरं पेरते ....
बाप वावरं पेरते .
श्याम ठक
बार्शीटाकळी जि . अकोला
९९७५७९२५२०
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
बाप वावर पेरते
जबरदस्त आशावादी रचना
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने