पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
सर्व शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त निरामय आरोग्याच्या हार्दिक शुभेच्छा (शेतमालाचा उत्पादन खर्च आणि हमीभाव लक्षात घेता शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी, ऐश्वर्य, धनसंपदा येऊच शकत नाही. मी मूर्ख नसल्याने तशा शुभेच्छा देण्याचा महा मूर्खपणा मी करणार नाही. )
शेतकरी तितुका एक एक!
#कर्जमुक्तीvsकर्जमाफी
कर्जमाफी या शब्दात काहीच गैर नाही असे तुम्हाला वाटत असेल किंवा सहज म्हणून तुम्ही कर्जमाफी असा शब्द वापरत असाल तर तुम्ही पिढीजात, वडिलोपार्जित, जन्मजात लाचार आहात, हे मी जीवशास्त्राच्या आधारे सिद्ध करून दाखवू शकतो.
डॉ. आंबेडकरांनी दलितांना आणि यु. जोशींनी शेतकऱ्यांना लाचारीचा त्याग करून हक्कासाठी मूठ आवळून स्वाभिमानाने लढण्याचा व जगण्याचा मंत्र दिला.
हक्क मिळवायची भाषा मर्द लढवैय्यांची आणि माफी मिळवायची भाषा नामर्द, याचक, लाचार व गुन्हेगारांची असते.
कर्जमुक्ती हा शब्द शरद जोशींचा पेटंट आहे असे लोकांना वाटत असल्याने क्रेडिट युगात्मा शरद जोशींना जाईल अशी त्यांना भीती वाटते. युगात्मा शरद जोशींविषयी असलेल्या आकसापोटी ही मंडळी कर्जमुक्ती ऐवजी कर्जमाफी शब्द वापरतात आणि स्वतःची लाचारी अधोरेखित करून शेतकऱ्यांनाही लाचार असल्याचे अधिकृत प्रमाणपत्र देऊन टाकतात. ही सर्व जन्मजात लाचार असल्याची लक्षणे आहेत.
लाचारीचा उगम गरिबीतून होतो, त्यासाठी गरिबी संपवणे आवश्यक आणि अनिवार्य ठरते पण गरिबी संपली म्हणजे लाचारी आपोआप संपते असेही नसते. मानवी आयुष्याच्या शेकडो वर्षाच्या उत्क्रांतीत निर्माण झालेली लाचारीची जनुके सहजासहजी स्वाभिमानामध्ये रूपांतरित किंवा परावर्तित होईल अशीही अजिबात शक्यता नसते.
ज्यांना अजूनही स्वतःची लाचारी संपवावी असे वाटत नाही त्यांच्याविषयी मला काही म्हणायचे नाही. संपत्ती, धनद्रव्य, हातात अमाप पैसा प्राप्त झाला म्हणजे लाचारी संपते असे अजिबात नाही. गर्भश्रीमंत किंवा अतिश्रीमंत सुद्धा लाचार असू शकतो. पण ज्यांना निदान पुढील आयुष्य आणि आपल्या पुढील पिढ्या लाचारीचे जिने संपवून सुखाने, समाधानाने व स्वाभिमानाने जगावे असे वाटत असेल तर त्यांनी आता तरी योग्य दिशेने वाटचाल करायला हवी. तरच कालांतराने मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात अंतर्गत शारीरिक जनुकीय रचनेमध्ये बदल होऊन स्वाभिमानाच्या दिशेने वाटचाल होऊ शकेल.
नाहीतर लाचारीत जन्मने, लाचारीत जगणे आणि लाचारित मरणे ही काळ्या दगडावरची रेघ आहे हे लक्षात ठेवा.
आयुष्य तुमचे निर्णयही तुमचाच!
© गंगाधर मुटे #जौद्या_आप्ल्याले_काक्रा_लाग्ते
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
सर्व शेतकऱ्यांना
सर्व शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त निरामय आरोग्याच्या हार्दिक शुभेच्छा
)
(शेतमालाचा उत्पादन खर्च आणि हमीभाव लक्षात घेता शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी, ऐश्वर्य, धनसंपदा येऊच शकत नाही. मी मूर्ख नसल्याने तशा शुभेच्छा देण्याचा महा मूर्खपणा मी करणार नाही.
शेतकरी तितुका एक एक!
कर्जमाफी या शब्दात काहीच गैर
#कर्जमुक्तीvsकर्जमाफी
कर्जमाफी या शब्दात काहीच गैर नाही असे तुम्हाला वाटत असेल किंवा सहज म्हणून तुम्ही कर्जमाफी असा शब्द वापरत असाल तर तुम्ही पिढीजात, वडिलोपार्जित, जन्मजात लाचार आहात, हे मी जीवशास्त्राच्या आधारे सिद्ध करून दाखवू शकतो.
डॉ. आंबेडकरांनी दलितांना आणि यु. जोशींनी शेतकऱ्यांना लाचारीचा त्याग करून हक्कासाठी मूठ आवळून स्वाभिमानाने लढण्याचा व जगण्याचा मंत्र दिला.
हक्क मिळवायची भाषा मर्द लढवैय्यांची आणि माफी मिळवायची भाषा नामर्द, याचक, लाचार व गुन्हेगारांची असते.
कर्जमुक्ती हा शब्द शरद जोशींचा पेटंट आहे असे लोकांना वाटत असल्याने क्रेडिट युगात्मा शरद जोशींना जाईल अशी त्यांना भीती वाटते. युगात्मा शरद जोशींविषयी असलेल्या आकसापोटी ही मंडळी कर्जमुक्ती ऐवजी कर्जमाफी शब्द वापरतात आणि स्वतःची लाचारी अधोरेखित करून शेतकऱ्यांनाही लाचार असल्याचे अधिकृत प्रमाणपत्र देऊन टाकतात. ही सर्व जन्मजात लाचार असल्याची लक्षणे आहेत.
लाचारीचा उगम गरिबीतून होतो, त्यासाठी गरिबी संपवणे आवश्यक आणि अनिवार्य ठरते पण गरिबी संपली म्हणजे लाचारी आपोआप संपते असेही नसते. मानवी आयुष्याच्या शेकडो वर्षाच्या उत्क्रांतीत निर्माण झालेली लाचारीची जनुके सहजासहजी स्वाभिमानामध्ये रूपांतरित किंवा परावर्तित होईल अशीही अजिबात शक्यता नसते.
ज्यांना अजूनही स्वतःची लाचारी संपवावी असे वाटत नाही त्यांच्याविषयी मला काही म्हणायचे नाही. संपत्ती, धनद्रव्य, हातात अमाप पैसा प्राप्त झाला म्हणजे लाचारी संपते असे अजिबात नाही. गर्भश्रीमंत किंवा अतिश्रीमंत सुद्धा लाचार असू शकतो.
पण
ज्यांना निदान पुढील आयुष्य आणि आपल्या पुढील पिढ्या लाचारीचे जिने संपवून सुखाने, समाधानाने व स्वाभिमानाने जगावे असे वाटत असेल तर त्यांनी आता तरी योग्य दिशेने वाटचाल करायला हवी.
तरच
कालांतराने मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात अंतर्गत शारीरिक जनुकीय रचनेमध्ये बदल होऊन स्वाभिमानाच्या दिशेने वाटचाल होऊ शकेल.
नाहीतर लाचारीत जन्मने, लाचारीत जगणे आणि लाचारित मरणे ही काळ्या दगडावरची रेघ आहे हे लक्षात ठेवा.
आयुष्य तुमचे निर्णयही तुमचाच!
© गंगाधर मुटे
#जौद्या_आप्ल्याले_काक्रा_लाग्ते
शेतकरी तितुका एक एक!
पाने