![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
none
आता तयार व्हावे लढण्यास लेखणीने
रक्षण अबोलतेचे करण्यास लेखणीने
अभ्यास चिंतनाला शास्त्रात घोळवावे
कसदार शब्दशेती फुलण्यास लेखणीने
लटकी-पुचाट वाणी शिरजोर होत आहे
यावे रणात गच्ची धरण्यास लेखणीने
भाकड-वृथा कथांच्या कक्षेपल्याड जावे
अभिजात सृजनाला पुजण्यास लेखणीने
वास्तव चितारण्याची अवगत कला करावी
भक्कम नवीन पाया रचण्यास लेखणीने
नवज्ञान निर्मितेला जेथे उभार तेथे
आशय हळूच न्यावा भिजण्यास लेखणीने
जेव्हा चहूदिशांनी वादळ विराट तेव्हा
द्यावे अभय दिव्याला जळण्यास लेखणीने
- गंगाधर मुटे 'अभय'
--------------------------------------------------
प्रतिक्रिया
सातवे अ. भा. मराठी शेतकरी
सातवे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, रावेरी
दिनांक : शनिवार, रविवार, २० व २१ मार्च २०२१
स्थळ : यु. जोशी विद्यापीठ, भूमीकन्या सीताकुटी, रावेरी ता. राळेगाव जि. यवतमाळ
शेतकरी तितुका एक एक!