Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



अध्यक्षीय भाषण : ६ वे अ.भा.म.शे.सा.सं, अलिबाग

अध्यक्षीय भाषण : ६ वे अ.भा.म.शे.सा.सं, अलिबाग 
शेतकरी साहित्य स्वरूप दिशा 
-  भास्कर चंदनशिव
 
अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटक मा. ज्येष्ठ पत्रकार श्री.संजय राऊत प्रमुख पाहुणे आणि अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे प्रमुख कार्यवाह श्री.गंगाधरराव मुटे ,माजी संमेलनाध्यक्ष डॉ. शेषराव मोहिते इतर मान्यवर शेतकरी रसिक आणि भावा-बहिणींनो! या शेतकरी साहित्य चळवळीच्या अध्यक्ष,कार्याध्यक्ष आणि सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून माझी निवड करून सन्मानित केल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि आनंद व्यक्त करतो. 
 
रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणूनच प्रसिद्ध होती. कुळवाडी भूषण म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवरायांचा यथार्थ गौरव करून त्यांच्या कार्याचे पोवाडे गायलेले  होते. कुळवाड्यापुढे एक आदर्श राजा म्हणून त्यांना स्थान दिलेले होते . आज याच रायगड जिल्ह्यातील अलिबाग या तालुक्याच्या गावी हे कुळवाड्यांचे साहित्य संमेलन भरते आहे. काही रंजन-मनोरंजन करण्यासाठी हे संमेलन आयोजित केलेली नसून काहीएक कृतिशील भूमिका घेऊन ही लेखन विषयक चळवळ उभी ठाकलेली आहे. पिढ्यानपिढ्या कष्ट करून हातात रूमनं आणि नांगर धरण्या ऐवजी आता आम्ही एक कृतिशील भूमिका घेऊन लेखणी हाती धरणार आहोत. अशी धारणा मनात धरून ही चळवळ उभी वाहिलेली आहे.कष्टाला-परिश्रमाला ही त्याची त्याची एक लोक भाषा असते ,बोल भाषा असते . त्या भाषेला आणि लेखनाला प्रतिष्ठा मिळावी त्या अनुषंगाने चिंतन,वाचन,मनन आणि अभिव्यक्त कारणे घडावी. हे महत्त्वाची भूमिका या चळवळीने पत्करलेली आहे. राबत्या घरातून आलेल्याने हातात खुरपं धरण्या ऐवजी लेखणीचा सराव करावा आपण काहीतरी लिहू बघतो वाचू बोलू इच्छितो. काय बोलावं ? कसं बोलावं? काय लिहावं? कसं लिहावं? असे असंख्य आपलेच प्रश्न घेऊन इथं जमा झालो आहोत. खरंतर आपण कृषी जन संस्कृतीचे वारसदार आहोत. पण आज आपणच आपल्या पवित्र व्यवसायासह बेदखल का आणि कसे झालो? हा खरा प्रश्न आहे. 
 
१८८५ साली न्या. रानडे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना दुसऱ्या “ ग्रंथकार साहित्य संमेलनाचे निमंत्रण” पाठविले होते. पण सदरील संमेलनात आमचे काय असेल ? आमच्या जीवनावर आणि आम्ही लिहिलेल्या ग्रंथावर थोडीच चर्चा असेल.आम्ही आमचेच प्रश्न आणि आमचे ग्रंथ जेव्हा लिहिली जातील असे ...! असे स्वाभिमान पूर्वक सांगून सदरील साहित्य संमेलनाचे निमंत्रण नाकारले होते. हा सारा इतिहास आणि भूमिका घेऊन आपण आपले आपले कष्ट,आपले प्रश्न मांडू “ आम्ही लटके ना बोलू” ही भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.
 
२) “कृषीमुलही जीवनम" 
कृषीव्यवस्था हीच आपल्या जीवनाचे मूळ आहे “जीवन” याचा अर्थ पाणी असाही. होतो शेती-पाणी हे आपल्या जीवनाची मूलतत्त्व आहे.’कृष’ हा शब्द म्हणजे जमीन नांगरणे याअर्थी  लक्षात घेतला जातो. मध्ययुगीन समाजजीवन हे ग्रामकेंद्रित, कृषिकेंद्रित होतो. गाव गाडा हि त्याची खरी ओळख होती.गावगाड्याच्या चौकटीत राहून संतांनी समाज जीवन चित्रित केले. जे जे भोगले, ते ते मांडले “बरे झाले देवा, कुणबी केले ” या तुकोबाच्या विधानातील “बरे झाले” म्हणजे काय? आणि “बरे झाले देवा निघाले दिवाळे। बरी या दुष्काळी पिडा केली॥” या तुकोबाच्या दोन्ही बरे पण याचा काय अर्थ घ्यायचा? एक शेतकरी असण्यातील बरे पण तर दुसरे दुष्काळातील शेतीचे अनुभवात आलेले नैराश्य पूर्ण बरे पण कोणत्या अन्वयार्थातून आलेले आहे? त्यातील सारा त्यातील सारा सारा इतिहास आपणापुढे उलगडून जातो... यातील संभ्रमावस्थेची सोडवणूक त्यांच्याच “आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करू॥ या आशियातून दिलेली आहेत, सोडवलेली आहेत.. कोणत्याही संभ्रमावस्थेला शब्दातून मांडलेली मूल्यव्यवस्थाच मुक्त करू शकते.त्यासाठी शब्दाची चळवळ कृतीच्या पाठ बळातून साकारावी लागते. लोकसाहित्य मध्ययुगीन साहित्य,आधुनिक साहित्य,नवसाहित्य,समकालीन साहित्य हे अंतिमतः कृषिप्रधानच राहिलेले आहे.असे असूनही त्या त्या काळातील साहित्य व्यवहाराने मात्र कुळवाड्यांना अविद्यमान म्हणून बेदखल केलेले आहे. यातील वास्तव मात्र महात्मा ज्योतिराव यांच्या विचारसरणीतून तपासल्यास ते आग्रहाने शेतकऱ्याचा आसूड च्या उपोद्घातात म्हणतात. विद्येविना मती। गेली मतीविना नीती गेली। नीती विना गती गेली। गतीविना चित्त गेले वित्ताविना विना दारिद्र्य आले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥। या त्यांच्या अनुमानासह शेती,शेतकरी काळ गतीनुसार समजावून घेतला पाहिजे, “रात्रंदिन आम्हा,युद्धाचा प्रसंग” म्हणणारे तुकोबा नाही खरे शेतीचे अर्थशास्त्र कळलेले होते. शिवबा, तुकोबा आणि ज्योतिबा यांच्या विचाराचा अन्वयार्थच आज आपल्याला काही एक वास्तव दिशा दाखविणारे ठरणारे आहेत. मात्र ते आजच्या परिभाषेतूनच समजावून घेतले पाहिजेत हे मात्र खरे! कै. शरद जोशी यांना “शेतकऱ्याचा राजा शिवाजी या ग्रंथातून” “शेतकऱ्याचा आसूड-शतकाचा मुजरा” या  पुस्तकातून आणि तुकोबाच्या कृषी निष्ठेतून दाखवून दिलेला आहे... याच धारणेतून मध्ययुगीन काळातील वारकरी चळवळ, महानुभाव कळवळ, बसव चळवळ इत्यादी पायाच मुळी कृषीनिष्ठेतेचा होता. सारेच संत आणि महानुभाव हे कृषी व्यवस्थेतून गाव गाड्यातूनच अनुभव घेतलेले होते. आमची संस्कृती आमचे साहित्य आमचा इतिहास काय सांगत होता?
 
३) आजची संभ्रमावस्था
मित्र हो! आजचा काळ हा फारच संभ्रमावस्थेचा आणि कमालीचा अविश्वासाचा बनत चाललेला आहे, माणसाने माणुसकी पासूनच फारकत घेतल्याची चित्र आज दिसत आहे. माणसा-माणसातील “संवाद” च संपलेला आहे. संवाद अभावी आलेली मुके पण अतिशय घातक असते. आमच्या साऱ्या सामाजिक संस्थाच पॅरेलाइज(लकवा) झालेल्या दिसतात. माणसाची आरोग्य असा जेव्हा आपण शब्द वापरतो, तेव्हा त्यात त्याची अस्थिसंस्था,रक्ताभिसरण संस्था, मज्जासंस्था पचन संस्था आणि त्याची संस्थात्मक कार्य तपासित तशीच आपण आपले सामाजिक आरोग्य जेव्हा म्हणतो तेव्हा त्यात शिक्षण संस्था ,धर्मसंस्था, राज्यसंस्था, अर्थकारण, समाजकारण, नैतिकता कुटुंब संस्था इत्यादी सामाजिक साऱ्याच अंगाचा आपण मूल्यात्मक पातळीवरून विचार करीत असतो. माणूस आजारी पडला तर डॉक्टर तपासणी करून काहीएक निदान करतो. त्यानुसार दवापाणी सांगतो, पण समाजच असा पॅरालाईज झाला, त्या त्या मूल्य व्यवस्थेपासून ढळला तर, त्याला काय आणि कोणते औषध पाणी द्यावे. आमच्या आजच्या या शिक्षणाची काय व्यवस्था आहे व आमचे धर्मकारण म्हणजे काय?  समाजकारण कसले? राजकारणाची काय तत्वनिष्ठा? आमचे अर्थकारण कोणत्या अवस्थेला पोचले, आमच्या कुटुंबव्यवस्थेची ची काय अवस्था आहे. 
 
खरंतर हा संभ्रम आजच निर्माण झाला असेही नाही. तर हरएक काळात असे अनेक संभ्रम निर्माण झालेले. आहेत पण त्या काळातील संभ्रमाला मूल्यात्मक शब्द रचनेनेच मार्ग दाखविला हेही तितकेच खरे आहे. आज महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील काही महत्त्वाचे संभ्रमित कालखंड अधोरेखित करता येणारे आहेत. त्यातील प्रमुख कालखंड म्हणजे तेराव्या शतकातील यादव काळाची उदाहरण देता येणारे आहेत. सम्राट रामदेवराव यादवांचा काळ तथाकथित सुवर्णकाळ म्हणून मानला जातो. पण याच साम्राज्यावर अल्लाउद्दीन खीलजी याने मोजक्या सैन्यानिशी हल्ला करून या सम्राटाचा पराभव केला. अलोट संपत्तीची लूट केली. याच काळात दुर्गा देवीचा तमाम सतत बारा वर्षाचा भीषण दुष्काळ पडलेला होता. सामान्यांच्या अस्वस्थमनाला शब्द त्याचा प्रयत्न करून एक प्रभावी चळवळ उभी केली. महात्मा चक्रधरांची महानुभाव चळवळ संत नामदेव- ज्ञानदेवाची वारकरी चळवळ, महात्मा बसवेश्वरांची बसण चळवळ इत्यादी चळवळीतून माणूस जागा करण्याचा-उभा करण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या वाङ्गमयीन कृतीतून माणसात माणूसपण बहाल करण्याचा प्रयत्न झाला. या संभ्रमाचा आणि यादवांच्या पराभवाचा, चळवळीच्या उदयाचा आणि दुष्काळीशी बदलण्याचा काय आणि कसा अन्वयार्थ लावायचा.यात काव्य आणि कथा या साहित्य प्रकाराचे अतिशय महत्त्व मला वाटते. अभंग आणि  टिळा यातून काहीही एक कांती प्रवण साहित्य चळवळ उभी राहिली. माणसाची जगण्याची मूल्यात्मकता सजग बनविली. याचे उदाहरण म्हणून महात्मा चक्रधरांची एकच टिळा उदाहरण म्हणून पाहण्यासारखी आहे. “धांदुलमोक्षकथन” यात धांदुल म्हणजे शेतकरी, कवणे एक गावी धांदुल असे तो इंद्रा घरी जाय म्हणजे कोण एक फाटका शेतकरी इंद्राच्या दरबारात आपली गा-हाने घेऊन जातो. आधी इंद्राच्या दरबारात छाती काढून बोलतो तुझ्या म्हसरूने  माझे सोन्यासारखे कापसाचे शेत खाल्ले त्याची तू भरपाई दे! इंद्र त्याची भरपाई देऊन पृथ्वीतलावर पाठवितो ही झाली कथा, पण मला एकच गोष्ट अधोरेखित करावी वाटते, की आमचा फटका शेतकरी इंद्राच्या दरबारी कसा धिटाईने जातो. इंद्राच्या ऐरावताला ’म्हसर’ म्हणून हिणवून बोलतो. आणि आपली नुकसानभरपाई मागतो यातून चक्रधरांनी धांदुलाचा स्वाभिमान आत्मविश्वास कसा अधोरेखित केलेला आहे. आज आपल्याला असे चित्र तहसील कार्यालय दिसते का? आत्मविश्वास आणि स्वाभिमान मारण्याचे काम कोणी केली? या साऱ्या तेराव्या शतकातील घटित याचा काय अर्थ लावायचा मूठभर सैन्यापुढे आमचा सम्राट का पराभूत झाला? मानवी मूल्यांना अर्थ देणाऱ्या सामान्याच्या भक्तिमार्गी दिसणाऱ्या चळवळी कशा आणि का निर्माण झाल्या? याचा अर्थ एवढाच की, राजा कोणीही असो तो आपणाला लुटणारच हा सामान्याला वाटणारा विश्वास येणार अनुभव सम्राटाच्या पराभवाला कारण झाला. रयतेचा म्हणजे शेतकऱ्याचा कुणालाच पाठवलं मिळत नव्हते. राजवटी विषयी असता असणाऱ्या शेतकऱ्यांचाच हा पहिला पराभव तेराव्या शतकात घडल्याचे दिसून येते. यातून काही अंशी वारकरी महानुभाव चळवळीतील  साहित्याने संभ्रमातून समाजाला बाहेर काढण्याची त्याला आत्मा बळ देण्याचे कार्य केलेली होते. कारण साहित्य हे मूल्य व्यवस्थेला समोर जात असते. मूल्य राखणे, नव्या मूल्यांना जन्म देणे किंवा कालबाह्य मूल्यांचा त्याग करून सतत नवतेचा आणि परिवर्तनाचा ध्यास घेणे साहित्याला महत्त्वाचे वाटत असते.
 
४) छत्रपती शिवरायांचे “आज्ञापत्र”आणि संत तुकोबाचे तत्त्वज्ञानं :
सोळावे शतक ही तितक्याच संभ्रमाला कारण ठरत होते. याची खरी साक्ष आमचा दुष्काळाच्या इतिहासातून लक्षात येते. १६३० ते १७०३ या दरम्यानच्या काळात महाराष्ट्र देशी कुठे दुष्काळ पडल्याची नोंद नाही. पुढे मात्र शिव काळात शेतीसुधारणेस सुरुवात केल्यापासून दुष्काळाने महाराष्ट्रातून जे कार्य केले ते तत्कालीन जगातील सर्वात श्रेष्ठ सम्राट आपल्या सर्व शक्ती एकवटून महाराष्ट्रात धुडगूस घालत असतानाही महाराष्ट्रात पाऊल टाकण्याची छाती दुष्काळाची झाली नाही. पुढे इंग्रज- मराठ्यांच्या युद्धात दारुगोळ्याच्या पोत्याच्या जागी धान्याची पोती निघून मराठ्यांची राज्य लयास गेले व इंग्रजी राज्याबरोबर दुष्काळाचेही आगमन झाले. हे इतिहास गत सत्य श्री चा.अ.दाभोळकर मांडतात. म्हणजे दुष्काळाच्या इतिहासात केवळ शिवकाळ का आणि कसा अपवाद राहिला कूळ वाड्यांना भूषण वाटणारा हा शेतकऱ्याचा राजा त्याच वास्तवापासून समजून घ्यावा लागतो शेतकऱ्याचा राजा शिवाजी हा लक्षावधी जनतेला ईश्वरी अवतार का वाटावा? यासंबंधीचे रहस्य मंडित असताना प्रसिद्ध विचारवंत नरहर कुरुंदकर म्हणतात. राजकारणाच्या पटावर औरंगजेबाविरुद्ध ते एक होते तरी त्यांनी औरंगजेबाला त्याचे पण पण जे अकबर बादशहा यांच्या थोरवीची आठवण करून दिली आहे. कुतूबशाहीशी त्यांचे संबंध प्राय:प्रेमाचे आणि मित्रत्वाचे होते. त्यांना आयुष्यभर ज्या वतनदारा विरुद्ध लढावे लागले, ती नुसती त्यांच्या धर्माची माणसे नव्हती तर त्यांच्या सोयर संबंधातील माणसे होती. घोरपडे,जाधव, निंबाळकर, सावंत,सुर्वे असे वतनदार नेहमीच त्यांच्याविरुद्ध राहिले. शिवाजी महाराजांचे विरुद्ध त्यांच्याच धर्मातील वतनदार का राहिले? या प्रश्नाचे उत्तर आणि लक्षवेधी जनतेची त्यांना ईश्वरी अवतार म्हणून का पहिले? या प्रश्नाचे उत्तर एकच आहे. रयतांना कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि ग्रामइलाक्यातील सामान्यांना जाच आणि भय होते, ते वतनदार, जागीरदार, दरकदारांचे अशा वतनदाराचा बीमोड करणारा राजा जसा भेटवा. तसा त्यांच्या पोटातील भूक ओळखणारा कष्टाला, श्रमाला स्वाभिमानाची जोड देणारा तारणहार ही भेटला संत तुकारामा सारख्या कुणबी पणाचा अभिमान बाळगणाऱ्या संताने तत्कालीन दुष्काळाचे, शेतकऱ्याच्या दैनेचे त्याच्या अपार कष्टाचे त्याच्या एकूण शेती विषय अर्थशास्त्राचे वास्तविक निरुपम आपल्या अभंगातून केलेले आहे. काव्य, तत्त्वज्ञानं आणि जीवनाचे कठोर वास्तव तुकारामा इतके परखडपणे कोणीही केल्याचे दिसत नाही. आणि यास साऱ्या वस्तुस्थितीवर मात करणारा राजा भेटला याचे समाधानही तुकारामाने व्यक्त केले आहे. महात्मा ज्योतिराव यांनी म्हणूनच दोघांचेही कौतुक केलेले आहे. कुणब्यातील साधू तुकाराम तर कोळीवाड्यांना भूषण असणारा राजा शिवाजी मराठी मानाची हे दोन प्रतीक महात्मा ज्योतिरावांनी ऊर्जा स्थानी ही स्वीकारलेली होती. तुकारामाची गाथा म्हणजे तुकोबाच्या आत्मचरित्र जसे ठरते तसे ते तत्कालीन समाजमनाचे चरित्रही ठरते. इतके ते समाजजीवनाशी, लोकजीवनाशी एक रूप झालेले होते तसेच राज्यकर्ता आणि साहित्यिक कलावंताचे संबंधही आजच्या वर्तमान घडीला लक्षात घेण्यासारखे आहेत. छत्रपती शिवरायांच्या भेटीचे निमंत्रण नम्रतापूर्वक नाकारणारे तुकोबा म्हणतात.
 
तुम्हा पाशी आम्ही येऊनिया काय।
वृथा सीन आहे चालण्याचा॥
मागावे हे अन्न तरी भिक्षा थोर।
वरणासी हे धार चिंध्या बिदी॥
निद्रेशी आसन, उत्तम पाषाण।
वरी आवरण आकाशाचे॥
 
ही तुकारामांची भावना काय दर्शविते? शिवरायाच्या एकूणच कृतीवर आणि उक्तीवर तुकोबाच्या विचाराचा फार मोठा प्रभाव होता हे अभ्यासकाचे मत हे त्यांच्या आज्ञापत्राततील अज्ञानातून स्पष्टपणे जाणवते. रयतेची तसंनस न हलू द्यावी, भाजीच्या देठालाही हात लावू नका, “रयतांना झाडे लेकरा ऐशी वाढविली असे” शेतकऱ्याचा शेतसारा माफ करावा. बौ. बारदाण्यासाठी तगाई द्यावी इत्यादी संदर्भ लक्षात घेतल्यास आजही आपण लोकशाहीच्या काळात या राजेशाहीचा गौरव का करतो हे लक्षात येते. बळीराजा, शिवराजा आणि शाहू राजा या राजाचे स्मरण करण्यात रयतेला कोणती प्रेरणा मिळते?
 
रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणणाऱ्या आपल्या कुणबी कुळाला सार्थ अभिमान बाळगणारा तुकोबा आजच्या आत्महत्या करणाऱ्या कुणब्याच्या वंशजांनी पुन्हा एकदा नव्याने समजावून घेतला पाहिजे. एक विद्रोही विचार-कृतीचा संत कवी म्हणून त्याची ओळख महत्त्वाची आहे. कठीण वज्रासही भेदण्याचे बळ आणि ऊर्जा बाळगणारा नाठाळाच्या माथी काठी मारण्याची धमक आजच्या शेतकरी कुणब्यांनी समजून घेतली पाहिजे. “आत्महत्या” हा भ्याड पणाचा, संघर्षापासून पळून जाण्याचा मार्ग आहे. आपले जीवन संपविणे म्हणजे जीवनाची मोल आणि मूल्य न समजण्याचेच द्योतक आहे. 
 
अस्सल मराठीपणाचे भान असणाऱ्या तुकोबांना राष्ट्राचे मूळ सामर्थ्य कळलेले होते. शब्द, भाषा, जीवन, माणूसपण याचा फार मोठा संबंध त्याच्या-त्याच्या मूल्य-भावासह तुकोबांना समजून आलेला होता. “आम्हा घरी धन, शब्दाचीच रत्ने। शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू॥ शब्द चि जीवाचे जीवन। शब्दे वाटू धन जन लोका॥“ ना वाटून टाकू त्यांची प्रतिज्ञा म्हणजे, सामान्यांना बोलकं करणं, त्याला त्याची-त्याची वाचा देऊन व्यक्त होण्याचा मार्ग सुकर करणे त्यांना अतिशय महत्त्वाची वाटत होते. वैदिक  काळात शूद्रातिशूद्रांना संस्कृत वाणी उच्चारण्याचा शिकण्याचा अधिकार नाकारण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांनी स्वतः व्यक्त होऊ नये. भाषा आहे व्यक्त होण्याचे प्रभावी प्रमुख कारण आहे. भाषा, बोली, पण त्यातही शुद्ध-अशुद्धतेच्या परिमाण टाकून शूद्रतिशूद्रांना उच्चार आणि विचार स्वातंत्र्यापासून दूर ठेवले गेले. वाणी वर्चस्वाने सामान्याचे काही शोषित झालेल्या समाजाची अवस्था तुकोबांना प्रकर्षाने जाणवलेली होती.  म्हणूनच शब्दाचे शस्त्र लोकात वाटून टाकण्याचे क्रांतिकारक भाषा करतात. म्हणूनच अनेक कवींना, संत, महंतांना शब्दाचा सारा वागव्यवहार आणि त्याचे शास्त्र सारखे बळ समाजाच्या साऱ्या चळवळ  कर्त्यांना जाणवलेले होते. म्हणूनच महात्मा चक्रधर संत नामदेव,ज्ञानदेव, बसवेश्वर,संत कबीर इत्यादी सर्वोच्च पंथीयांनी लोकभाषेचा आवर्जून वापर केला. अनुयायी यांना तसा दंडक घालून दिला. त्याच लोकभाषेतून ग्रंथाची निर्मिती केली तुमचे अस्मात -कस्मात मी  नेने गा। मज चक्रधर निरूपत्री काय लयाची पुसा॥ हा भाषिक आग्रह महत्त्वाचा आहे. जे त्यांची भाषा आणि जी त्यांची भाषा असा असा फरक शोषण व्यवस्थेच्या सोयीने करून घेतलेला होता. आजही “भारत” इंडियाची याची भाषा काळापरत्वे बदल असतील तरी वृत्ती-प्रवृत्ती भाषिक पातळीवरही कायम आहे.
 
५) आजही ही शेतकऱ्याच्या आसुडाचे आहे आणि ग्रामरचना आहे 
पेशवाईच्या अस्तानंतर इंग्रजी राजवट आणि या राजवटीचेही अनेकांनी स्वागत केले वर्ण वर्चस्वाला. पुरोहित शाहीला खतपाणी  घातले. उत्तर पेशवाईतील सारे सामाजिक, आर्थिक, धार्मिक तपशील पाहू जाता बरे झाले इंग्रजांचे राज्य आले नसता आमचे काय झाले असते? लोकहितवादी सारख्या त्या काळातील जाण त्यांच्या प्रतिक्रिया या साऱ्या पेशवाईच्याच धांडोळा घेणाऱ्या होत्या. त्यातूनच इंग्रजी राजवट स्थिरावत गेली. प्रशासन व्यवस्था, न्यायदान व्यवस्था, शिक्षणाच्या सार्वत्रिकता, जमीन सुधारणा कायदे, अमानुष रूढी-परंपराच्या विरोधातील कायदे-कानून यामुळे ही राजवट म्हणजे प्रबोधन युगाची सुरुवात म्हणूनच ओळखली जाते. संत-महंतांच्या युगानंतरचे हे दुसरे प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्य, समता, मानवता आणि विज्ञान यातूनच या या काळाने मानवतेचा मार्ग पत्करल्याचे दिसते. साहित्य आणि संस्कृतीवर प्रभाव टाकून नव्या आधुनिकतेला कारण ठरत गेले. इंग्रजी शिक्षण इंग्रजी विचारसरणीचा साहित्य तत्त्वज्ञानाचा प्रभाव आणि स्वीकार या काळातील भारतीय नवशिक्षित यांच्या विचारसरणीला प्रेरक आणि कारक ठरत गेला.निबंध माला, राजपत्रे, दर्पण महात्मा फुले यांची सत्यशोधक समाज आणि इतर समाज संस्थाच्या  माध्यमातून मन्वंतर घडत होते. कुणबी कुळाचा अभिमान सांगणारा महात्मा ज्योतिबा आपला सारा सामाजिक इतिहासातील लूटमारीच्या टप्प्यांचा धांडोळा घेत होता. त्या-त्या काळातील भीषण दुष्काळाच्या परिणामाचे संदर्भ तपासीत होता. त्याचे सप्रमाण विश्लेषण करीत होता. त्यादृष्टीने “शेतकऱ्याचा आसूड” नावाचा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. रानटी काळातील लुटालूट टोळ्यांची आक्रमण टोळ्यांतून उदयास आलेली राज पद्धती राज्याची रयातावर लादलेली करसारा पद्धती” त्यातून आलेली गुलामगिरी, वेठबिगारी कमी दाम देऊन अधिक कष्ट लुटणारी प्रवृत्ती आणि अखेरी शेतीमालाच्या भावातून होणारी लूट महात्मा ज्योतिराव यांनी मांडलेली आहे. तर याच काळात “शतपत्रे” लिहून शिक्षणाचा आग्रह धरून कठोर भाषेत व्यवस्थेला खडसावणाऱ्या जनहिवाद्यानि “ग्रामरचना” नावाच्या निबंध पुस्तिकेतून मांडलेली ढळढळीत वास्तव लक्षात घेण्यासारखे आहे, ते लिहितात 
 
एक बिघा ऊस, एक बिघा हळद आणि एक बिघा लसूण याचा प्रत्यक्ष उत्पादन खर्च काढून त्यातून निघणाऱ्या मालाची बाजारपेठेतील विक्री किंमत काढून दाखविलेली आहे. त्यात उसासाठी रुपये 268 हळदीसाठी रुपये 187 आणि लसूण साठी रुपये ६० इतका खर्च असून त्यातून निघणाऱ्या उत्पादित मालाला बाजारात मिळणारी किंमत अनुक्रमे रुपये 130 रुपये रु १०० आणि रुपये 25 म्हणजे या साऱ्या रोजगारात शेतकऱ्याच्या हाती धोंगडी आणि लंगोटी शिवाय आशा नाही हा नेहमीचा तोटा भरण्यास सावकार पाहिजे. याशिवाय त्याची गत नाही.... तर महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा आसूड मधून एक माळवीवाल्या शेतकऱ्यांची कथाही मोठी हृदयस्पर्शी शोषणावर झगझगीत प्रकाश टाकणारी आहे.
 
बाबा पद्मनजी यांची “यमुनापर्यटन” नावाची धर्मांतर आणि हिंदू स्त्रियांचे अनेक पदरी दुःख मांडणारी कादंबरी “बळीबा पाटील” ही  सत्यशोधक समाजाचे कृष्णराव भालेकर यांची शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारी कादंबरी हरीभाऊंची “काळ तर मोठा कठीण आला” नावाची दुष्काळाचे विदारक सत्य मांडून शेतकऱ्यांची दैना विचित्र करणारी कथा महात्मा फुले यांची “अखण्ड” आदी काव्यरचना आणि “तृतीय रत्न” नावाचे शेतकऱ्यांची लूटमार चित्रित करणारे नाटक केशवसुतांनी "गोष्टी घराकडील वदता गड्या रे" नावाची गावची आठव नोंदवणारी कविता  लो.टिळक-आगरकर यांनी वृत्रपत्रातून सामाजिक आणि राजकीय जागृतीचे केलेले कार्य १८७७ चा दुष्काळ, प्लेगाची साथ ,खज फाडी चे बंड, सावकारा विरुद्ध चे उठा, कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे यांच्या शेतकरी आणि कामगारांच्या चळवळी तर दुसरीकडे स्वातंत्र्याच्या चळवळीची बांधाबांधी होत होती. सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याची मागणी होत होती. म.ज्योतिराव फुले यांनी स्थापना केलेल्या 'सत्यशोधक समाजाची’ चळवळी प्रामुख्याने दोन दिशांनी प्रवाही होताना दिसते. या दोन्ही चळवळीच्या दिशा कधी परस्पर पूरक तर कधी परस्परविरोधी कार्य करीत होत्या. या दोन्ही प्रवाहांच्या परस्पर संघर्षातून व भिन्न स्वरूपाच्या भूमिकेतून देशाच्या स्वातंत्र्याच्या मागणीला व त्याच्या स्वरूपाला खरा अर्थ प्राप्त होत होता या दोन्ही चळवळीच्या प्रमुखांनी आपल्याला कर्तृत्वाने उभ्या भारत खंडात क्रांती युग निर्माण केले होते. यात डॉ बाबासाहेब आंबेडकर युगाने भगवान बुद्ध, संत कबीर आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या समग्र तत्त्वज्ञानाला नवविज्ञानवादी आशय होऊन सर्व हारा समाजाच्या उत्थानाचा मार्ग दाखविला. हजारो वर्षाच्या अनेक विविध पातळीवरील गुलामगिरीच्या शृंखला तोडल्या तर याच काळात “म.गांधी युगाने” आपल्या कर्तृत्वाने भारतीय जनसामान्यांची मने आपल्या कडे आकर्षित करून घेतले. सत्य अहिंसा सत्याग्रहासारखी हत्यारे वापरून सत्य शोधकी वारसा सरमिसळून “गांधीवाद” कार्यरत बनवला राजकीय आणि सामाजिक सुधारणा वादाची भूमिका एकवटून आंदोलन उभे केले समाजकारण, धर्मकारण, राजकारण अर्थकारण, नैतिकता इत्यादी घटकांना आपल्या विचारात एकत्र घेऊन म.गांधी भारतीय राजकारणात उतरले. देश आणि देशातील दारिद्र्य पाहिले. अज्ञान, दारिद्र्य, जातीयता, धर्म वाद प्रचंड दुष्काळ इंग्रजी लुटारू वृत्ती, शेतकऱ्यांची दैना आणि उपासमार यांच्या दृष्टीतून सुटली नाही. या साऱ्याचा परिणाम त्यांच्या कृतीयुक्तीत सामावला. पंचापरिधान करून सामान्यांचे जीवन पत्करले. झोपडीत राहणे, ग्रामसफाई, संडाससफाई, प्रार्थना, भजन, साधा फलाहार, शेळीचे दूध सात्त्विक दिनचर्या सामान्यांना आपलं करण्यास कारण ठरली. “रयतेची बापूजी” बनलेल्या गांधीजींनी कांदा आंदोलनातूनच राजकारणातून शिरकाव केला.बिहारमधील चंपारण्याचे आंदोलन शेतकऱ्यांना संघटित करून लढा केला खेड तालुका मधील कांदा आंदोलन शेतकऱ्यांचा आत्मविश्वास जागा करण्यास कारण ठरले शेतकरी कष्टकऱ्यांमध्ये गांधीजी विषयी आदरभाव निर्माण झाला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलन केली. हा विचार सारा देश भर पसरला. उत्तरेकडे चरणसिंग सारखे नेते याच विचारातून प्रेरित झाले. वाढीव सारा, कर्जमुक्ती इत्यादी प्रश्नातून बंगाल, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मद्रास इत्यादी ठिकाणी शेतकऱ्यांचे उठाव होत होते. कोंकणातील भोपल्यांचे बंड खोतीच्या वादातून निर्माण झालेले होते. हिंदू-मुसलमान असा तेढीचा रंग देऊन शेतकऱ्यांचे आंदोलने चिरडली जात होती. फोडा-झोडा नीतीला यश येत होते. 
 
१९४८ च्या दरम्यान महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात आदिवासी वारल्याची चळवळ गोदावरी परुळेकरांनी उभी केली. कम्युनिस्टांच्या या चळवळीने किसान सभेची स्थापना करून जमीनदारा विरुद्ध कुळांचा आवाज उठविला. जमिनीचे फेरवाटप, कुळांना संरक्षण यात क्रांतिसिंह नाना पाटील, दत्ता देशमुख, माधवराव गायकवाड इत्यादी नेते कार्यरत होते. शेतीमालाचा भाव, सावकारी दडपशाही नष्ट करणे, कामगारांची किमान वेतन इत्यादी प्रश्न हाती घेऊन “लाल निशाण” गटाची स्थापना करून आंदोलन केली.... तसेच राम मनोहर यांच्या समाजवादी गटाने “भूमी सेना” स्थापन करून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर जमीन बळकाव आंदोलने केली. “चौ खांबी” योजना मांडून शेती विकासाबरोरच शेतकऱ्यांच्या उत्थानाची भूमिका मांडली. त्याचबरोबर “सत्यशोधकी” भूमिका घेऊन विठ्ठल रामजी शिंदे यांनी शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन लढे उभी केले, परिषदा भरवून आंदोलने केली. याच दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकरी तितुका एक ही भूमिका घेऊन मोर्चे काढली, आंदोलन करून कष्टकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले... वऱ्हाड आणि विदर्भामध्ये “भारत कृषक समाज” स्थापन करून डॉक्टर पंजाबराव देशमुख शेतसारा विरोधात भूमिका घेऊन लोक जागर केला. कर्जबाजारीपणा, शेतीमालाचा भाव, शेतमजुरांचे किमान वेतनासाठी आंदोलनं केली....  “सत्यशोधक समाजाचा” वारसा सांगत ब्राह्मणोत्तर पक्षाच्या नेत्यांनी शेतकरी आणि कामगाराचे प्रश्न हाती घेऊन सरकार विरोधात आंदोलने केली. जेधे बंधू, जवळकर शंकरराव मोरे, तुळशीदास जाधव, उद्धवराव पाटील इत्यादी मंडळींनी “शिका पक्षाची” स्थापना करून शेतकरीविरोधी धोरणाला कडाडून विरोध केला....  मध्यंतरी महाराष्ट्रात सर्व विरोधी पक्षांच्या शेतकरी दिंड्यांचा मोर्चा विधानसभेवर नेऊन देशपातळीवरील नेत्यांनी स्वतःला अटक करून घेतली होती.
 
ऐंशीच्या दशकात शरद जोशींच्या “शेतकरी संघटनेने” अनेकांचे  लक्ष वेधून घेतले. ही संघटना केवळ पारंपरिक पद्धतींनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत नव्हती, तर संपूर्ण व्यवस्था बदलण्याची भाषा करीत होती. एक स्वतंत्र अशी अधिवेशन पद्धतीची मांडणी करून विचार आणि प्रतिभावान आंदोलने करीत होती. “विचार आणि कार्यपद्धती” ही नवी मांडणी अनेकांना बुचकळ्यात टाकणारी होती. शेतीमालाच्या उत्पादनखर्चावर आधारी किफायतशीर भाव, भीक “नको हवे घामाचे दाम”, भारत आणि इंडिया तील संघर्ष रेखा आखून इतिहासागत  लुटीची मांडणी सामान्याच्या चटकन लक्षात येत होती. भारतीय समाजाचा इतिहास हा शेतीच्या लूटमारीचा इतिहास आहे. “शेतकरी संघटना” ही एक स्वतंत्र विचार पद्धती आहे. केवळ काही मागण्यासाठी निर्माण झालेली युनियन नाही. समाज एका दोषास्पद अवस्थेतून दुसऱ्या दोषास्पद अवस्थेत जात असतो, तेव्हा स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावणे हाच मार्ग योग्य होय. विचारांनी वस्तुस्थिती बदलत नाही, तर वस्तुस्थिती ने विचार बदलतो. विचारवंत केवळ “शब्द” देत असतात इत्यादी विचार आणि कार्यपद्धती तून अनेक आंदोलने यशस्वी केली. हा विचार सार्वत्रिक करून एक प्रबळ वातावरण तयार केले.... 
 
कांदा आंदोलन, ऊस आंदोलन, तंबाखू आंदोलन, दूध-भात आंदोलन, कापूस आंदोलन, रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, पान-फुल आंदोलन, चांदवडचे महिला अधिवेशन, आंबेठाण येथील अभ्यास शिबिरे, महिलांच्या मुक्तीची नवी मांडणी (चांदवडची शिदोरी) इत्यादी साऱ्या विचार आंदोलनाचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मराठी साहित्यावर झाल्याचे लक्षात येते. ७०,८० च्या दशकातील “ग्रामीण” या विशेषणाने लिहिल्या गेलेल्या साहित्यातून या विचारसरणीचा निश्चित प्रत्यय येतो. आज लिहिल्या जाणाऱ्या कविता, कथा, कादंबऱ्या माझ्या म्हणण्याची निश्चित साक्ष देतील....  या एका विचारसरणीने एक नवा आत्मविश्वास दिला. खेड्यातून, शेतीतून येणाऱ्या नवागताला आपण बोलू शकतो, विचार करू शकतो, आपण आपल्या अनुभवासह प्रकट करू शकतो हा आत्मविश्वास येऊ लागला. नव्वदी- दोन हजार नंतरचे मराठी साहित्य म्हणजे कृषी, साहित्य कृषी जन संस्कृतीचेच साहित्य आहे. बाकी मराठी साहित्य म्हणजे मराठी लिपीत लिहिलेले, उसने आणि आणि भोगवादी मराठमोळीतीलच साहित्य दिसते.
 
६) साहित्य : 
काय म्हणजे साहित्य? ते का आणि कशासाठी निर्माण होते? इत्यादी प्रश्न सामान्य माणसाला आणि जाणत्या माणसालाही पडू शकतात, पडतात. पण अशा प्रश्नांची उत्तरे गणिती पद्धतीने देता येणारी नसतात. साहित्याची तशी व्याख्याही करता येत नाही. असे असूनही ही प्राचीन, आधुनिक अभ्यासक विचारवंतांनी आपापल्यापरीने काही एक व्याख्येच्या स्वरूपातून मांडणी केलेली दिसते. पण तो कधीही ही अंतिम आणि निर्णायक असत नाही. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या वैशिष्ट्यावर, लक्षणावर कमी-अधिक भर देऊन बोलत असतो. तसेच साहित्य का आणि कशी निर्माण होते? या प्रश्नासंबंधी ही तीच अवस्था असते. का लिहितो? का वाचतो? हे सारे प्रश्न, प्रश्न म्हणूनच उरत असतात. मनोरंजनासाठी, प्रबोधनासाठी, प्रचारासाठी, माहिती आणि ज्ञान प्राप्तीसाठी इत्यादी देता येऊ शकणारे उत्तरे दिली जातात. पण यातून काही गोष्टी आपण जरूर लक्षात घेतल्या पाहिजेत की, साहित्य हे माणसाची असते, माणसासाठी असते. माणुसकी संवर्धन करीत असते. मुख्य व्यवस्थेशी निगडित असते. माणूस पणाच्या मूल्यांची जपणूक, संवर्धन, संरक्षण आणि निर्माण करणे किंवा वेळ प्रसंग जुनाट मूल्यांचा निषेध करणं हे साहित्याचं कर्तव्यच मानलं जातं. स-हितता शिकविते, ते साहित्य म्हणूनच माणसाला साहित्याची फार जरुरी असते. जगण्याचा एक समर्थ आधार असतो. साहित्य म्हणजे जीवन भाष्य असते. जीवनाचा आणि जगण्याचा अन्वयार्थ साहित्य लावीत असते. साहित्य आणि समाजाचे परस्पर संबंधही सांगितली जातात, तर कधी साहित्याचा समाजाशी काय संबंध आहे? असा नकारार्थी सवालही उपस्थित केला जातो काय? ही एक स्वतंत्र आणि स्वायत्त असते. ती केवळ स्वानासुखाय असते. अशी मांडणी केली जाते. संस्कृतीचे संवर्धन, रक्षण आणि पोषण करण्याची जबाबदारी साहित्याचीच असते असे सांगितले जाते. साहित्यिक कलावंत अखेरी एक  माणूसच असतो. समाजाचा, कुटुंबाचा एक जबाबदार घटक असतो. देशाचा एक जबाबदार नागरिक असतो. लौकिक सुखदुःखाचा तोही एक धनी असतो. अवंतीभोवतीच्या घटकांचा परिणाम त्याच्याही मनावर, विचारावर होत असतो. त्याच्याही संवेदना, जाणिवा सजग होतात. भूगोल, इतिहास, भाषा, समाज यासंबंधीच्या घटनात्मक उलथा-पालथी च्या परिणामाचा तोही एक साक्षीदार असते.... पण असे असूनही समकालिनातील वास्तवाचा वेध घेताना त्याचा साहित्य संवाद होईलच असे नाही. कारण दोघांचे दृष्टिकोन भिन्न असू शकतात. विचारसरणी परस्पर विरोधी असू शकतो. यात कुणाला आपल्या परंपरांचा, गतइतीहासाचा अभिमान वाटत असतो. तर कुणाला गतइतिहासाने समाजमनावर अन्याय केल्याची भावना तीव्रपणाने जाणवत असते. महात्मा फुले, विष्णुशास्त्री चिपळूणकर, टिळक, आगरकर, फडके, खांडेकर अशी काही वानगी दाखल नावे सांगता येईल. तर कधी समान विचाराने, समान जीवन विषयक दृष्टिकोनाने, पण स्वतंत्र अशा आपल्या शैलीने लेखन करणारे ही असतात. चळवळीच्या साहित्या मध्ये ऊर्जा स्रोतांचा समान धर्म राखून आपले सत्त्व-तत्त्व राखणारे लेखनही होत असते. सांप्रदायिकता किंवा समान विचार धर्म जागविणाऱ्या लेखका मध्ये ही भावना दिसून येते. साठोतर मराठी साहित्याच्या प्रवाहातील विचार संदर्भ बऱ्याचदा समान असल्याचे भावते. तरीही त्यांचे त्यांचे निराळेपण व्यक्तीसापेक्षीच असते ही ध्यानी घेतली पाहिजे.
 
-  भास्कर चंदनशिव
 
Share