नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
भारत व इंडियातील दरी
भारत व इंडियात
निर्माण झालीय दरी
माणसे येथे आहेत
गरीब-श्रीमंतात भेद करणारी ||१||
कुणाकडे असे
राहण्या काचेचा महाल
कुणाचे होत असे
जगण्याचे हाल ||२||
कुणाकडे असे
फिरण्या आलिशान गाडी
कुणी वापरात असे
रोज तीच जुनी, फाटकी साडी ||३||
कुणाच्या जगण्याची असे
राजेशाही ठेवण
कुणाला नशीब होत नसे
दोन वेळेचेही जेवण ||४||
कुणी घेतात
सोन्याचेही पीक
कुणी मागतात
पोट भरण्या दारोदारी भीक ||५||
कुणी कमवितो
पैसे कोटी अन कोटी
कुणी जगतो
दिवसेंदिवस उपाशी पोटी ||६||
कुणी खात असे
रोजच पुरणपोळी
कुणी वाहत असे
खांद्यावरी लाकडाची मोळी ||७||
कुणाच्या असे
घरावर माडी
कुणाला नसे
राहण्या साधी झोपडी ||८||
भ्रष्टाचार करूनही
कुणाच्या मुखावर असे हासू
कष्ट करूनही
कुणाच्या डोळ्यात सदा असे आसू ||९||
कवी:- विश्वजीत दीपक गुडधे
वर्ग:- १० वा
मणिबाई गुजराती हायस्कूल, अमरावती.
प्रतिक्रिया
भारत आणि इंडिया
कविता फ़ारच सुंदर झाली आहे.
भारत आणि इंडिया यांच्यातील दरीचे चित्रही छान उमटले आहे.
मात्र
माणसे येथे आहेत
गरीब-श्रीमंतात भेद करणारी
या दोन ओळीतून कवितेत व्यक्त झालाय त्या अनुरूप अर्थ व्यक्त होत नाही, असे जाणवते.
या दोन ओळी कवितेशी सुसंगत केल्यास कविता अधिक अर्थपूर्ण होईल असे वाटते.
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद
धन्यवाद
आपल्या सूचनांचे नेहमीच स्वागत आहे
पाने