राळेगण सिद्धी : तिर्थक्षेत्र की शासकीयग्राम?
दोन वर्षापूर्वी राळेगण सिद्धीला भेट दिली. महाराष्ट्रामध्ये अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीला आणि पोपट पवारांच्या हिवरा गावाला वेगळे महत्व दिले जाते.
गावाची दशा आणि दिशा बदलण्यासाठी अनेक मान्यवरांकडून या गावाचा आदर्श घ्यावा, असा गवगवा केला जातो.
प्रत्यक्षात तिथे जे पाहायला मिळाले ते आश्चर्यकारक आहे. सामुहीक प्रयत्नाने हे गाव समृद्ध झाल्याची कुठलीही खूण मला आढळली नाही.
थोडाफ़ार झगमगाट व RCC चे सुबक बांधकाम बघायला मिळाले ते सुद्धा शासकीय तिजोरीतून निधी लाटल्याने झाले आहे, याचीही प्रचिती आली.
गावाच्या स्वयंपूर्णतेतून अथवा सामुहिक प्रयत्नातून सामान्य नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढल्याची कुठलीच शक्यता आढळून आली नाही.
***********

राळेगण सिद्धी हे गाव तिर्थक्षेत्र आहे काय? शासकीय खर्चाने भक्तनिवास? शासकीय तिजोरीतून गावाला निधी मिळत नाही म्हणून हा नियमाला झुकविण्याचा प्रकार वाटला.
************
तिर्थक्षेत्र विकास या योजनेअंतर्गत गावात इमारत बांधकाम करण्यात आले.
************
नवीन
कोणत्या देवाचे भक्त राहतात बरे?
************

बांधकामाचे अवलोकन करण्यात मी सुद्धा सामील झालो.
************
येथे
अण्णा हजारे समवेत.
************

अण्णा हजारे समवेत.
************
इथे देणग्या स्विकारल्या जातात.
************

स्वच्छतेचा दर्जा!
************

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाच्या निधीतून ही इमारत उभी झाली.
************

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाच्या निधीतून ही इमारत उभी झाली.
************

पद्मावती देवस्थान
राळेगण सिद्धीला आदर्श गाव म्हणावे की तिर्थक्षेत्र?
************