नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
ऐकल होत,
दलालाचे हात कोळशान काळे,
पण आमच्या बाबतीत ,
आहे हे वेगळे .......
वर्षभर पिकवुन,
झालो मी हमाल,
मार्केटात पहिले विचारते,
सांगा कोण दलाल? .....
मार्केटात गेल्यावर ,
नाही मालकाच भान,
इथे मिळतो भाऊ,
दलालांनाच मान ........
वर्षभर कष्ट करून,
गोळा करतो एक एक दाणा,
त्याच दाण्याच्या ढिगावर,
सुरू असतो यांचा धिंगाणा .......
आमचाच माल,
आमचेच होतात हाल,
नुसती लुडबुड करून,
शेठ झालाय दलाल .......
आमच्या मालाचा कधीच,
भाव नसतो पक्का,
पण या दलालांचा,
ठरला असतो टक्का ........
श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी
प्रतिक्रिया
नेमके वास्तव!
आमचाच माल,
आमचेच होतात हाल,
नुसती लुडबुड करून,
शेठ झालाय दलाल .......
हेमंत साळुंके