नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

कर्जाच्या विळख्यातील शेती

ऍड. सुशांत बाराहाते's picture
लेखनविभाग: 
पद्यकविता

शीर्षक - कर्जाच्या विळख्यातील शेती

डोंगरावरून कर्जाचा दगड, पडता-पडत नाही
पडलेला दगड मात्र, चढता-चढत नाही
चढलेलं कर्ज काही, घटता-घटत नाही
कर्जाच्या विळख्यातील शेती, सुटता-सुटत नाही...

गरजा आमच्या आता, संपता-संपत नाही
संपतात दमड्या मात्र, पुरता-पुरत नाही
पुरतात कष्ट मोठे, पिकता-पिकत नाही
कर्जाच्या विळख्यातील शेती, सुटता-सुटत नाही...

निसर्गाचा कहर आता, बघता-बघत नाही
बघतात दृश्य डोळे, रडता-रडत नाही
रडतात मन माझे, मानता-मानत नाही
कर्जाच्या विळख्यातील शेती, सुटता-सुटत नाही...

हिम्मत असून बाजू, लढता-लढत नाही
लढतात देह आमचे, मरता-मरत नाही
मरतात स्वप्न भावी, जगता-जगत नाही
कर्जाच्या विळख्यातील शेती, सुटता-सुटत नाही...

कवी - ऍड. सुशांत ग. बाराहाते
प्रज्ञा नगर, नंदोरी रोड, संत तुकडोजी वार्ड,
हिंगणघाट.
मो. ९९६०५७७१३१.

Share

Comments

Layout Settings