Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***शेतकर्‍याचे नांगर दाबणारे हात मंत्र्यांचे गळे दाबतील

Krishijagat: 
चर्चा
शेतकर्‍याचे नांगर दाबणारे हात मंत्र्यांचे गळे दाबतील

           शेतकरी आत्महत्यांमागे नापिकी किंवा शेतमालाला मिळणारे अत्यल्प भाव हे कारण नसून व्यसनाधिनता, हुंडा. घरगुती भांडणे व अपुरा कर्जपुरवठा हेच प्रमुख कारण असल्याचा अशास्त्रीय व असंवेदनशील निष्कर्ष महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांमागील नेमकी कारणे शोधण्याची जबाबदारी सोपविलेल्या अकरा विभागाच्या प्रधान सचिवांनी काढला आहे.त्या पार्श्वभूमीवर......

        दिनांक ९ जून २००६ रोजी खानदेशातील दिनकर नारायण वराडे या शेतकर्‍याने आत्महत्येपूर्वी लिहिलेले पत्र सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरावे.

दिनकर नारायण वराडे या शेतकर्‍याने आत्महत्येपूर्वी लिहिलेले पत्र :

          नांगरटीखर्च ८०० रु. + टिलर ४०० + वखरणे + २०० काडी कचरा वेचणे २०० + पेरणी २०० + बिजवाई ज्वारी २५० (कपाशी ४५० पासून १५०० पर्यंत) + विरवणी १०० रु. + निंदणी २०० + कोळपणे १०० + खते ७०० + फवारणी ५०० + वेचणी १५००० ज्वारी ५० रु. पोते. वरील खर्च पाहता मिळणारे कर्ज शेतीसाठीच अपूर्ण पडते. त्यात घरखर्च, मुलांचे शिक्षण, पाहुणे, लग्न, नातलगाचे लग्न या करिता शेतकर्‍याला खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावेच लागते. हंगाम आल्या नंतर खाजगी कर्जाचे व्याज जास्त असल्यामुळे शेतकरी ते कर्ज अगोदर देतो कारण शेत मालाला योग्य भाव न मिळाल्या मुळे हातात पैसे फारच कमी येतात. खाजगी कर्ज दिल्यानंतर उरलेले पैसे जेमतेम एप्रिल पर्यंत पुरतात. सोसायटीचे कर्ज थकीत होते व पुढील हंगामाकरिता घरखर्चा करिता जास्त व्याज दराचे जास्त उचल घ्यावा लागतो. मागील वर्षाच्या तुलनेत पुढील वर्षी सर्व नागरटी टिलर (डिझेल वाढीमुळे) बियाणे, कीटक नाशके, खते व मजुरी सर्व वाढ झालेली असते व शेतीमालाच्या उत्पन्नात व भावात फारच कमतरता येते. घरातील सर्व ऊन, पाऊस, थंडी याची पर्वा न करता राब राब राबतात. शेवटी त्याच्या पदरी उरते निराशा. आपल्यापेक्षा न्हावी, धोबी, चांभार हे सावलीत बसून जास्त मेहनत न करता सुखाने जीवन जगताना दिसतात आणि शेतकर्‍याचा कष्ट करून भूतकाळ व वर्तमान व त्या पेक्षा त्याला भविष्यात आपल्याला फारच कठीण दिवस येतील असे दिसते व पुढील होणारा कर्जाच्या प्रचंड कर्जाच्या बोज्याने भरलेली संसाराची गाडी आपल्याने ओढली जाणार नाही व आपल्याने कर्जाची फेड होऊच शकणार नाही म्हणून तो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कर्ज मुक्तीसाठी व कुटुंबाच्या भल्यासाठी.

         मुख्यमंत्र्यांनी आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याकरिता हे पॅकेज जाहीर केले आहे, म्हणजे मच्छ पकडण्याकरिता गळाला लावलेले खोबरं. मच्छी खोबरं तर गिळतं पण जीव गमवून बसतं व गळ टाकणारा  मजेशीर मच्छीचे कालवण खातं. त्या प्रमाणे आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यासाठी हे एक खोबरं लावलेला 'गळ' गळफास आहे. हे सर्व आमच्या ढवळ्या पवळ्याला समजतं पण भारताचे कृषीतज्ञ म्हणवणारे कृषी मंत्री मा. शरद पवार यांना कळलेलं नाही. ते म्हणतात शेतकरी आत्महत्या का करतो याचे मूळ कारण शोधावे लागेल. विलासात वेळ घालवणारे विलासराव देशमुख म्हणतात शेतकरी दारू मुळे कर्जबाजारी झाला. त्यांना एकच म्हणावेसे वाटते शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो, हातात फक्त उरते निराशा. भविष्यात सुद्धा निराशा दिसते इ. व त्याला काय करावं सुचत नाही, त्याकरिता तो दारूकडे वळतो, मनाला थोडे शांत वाटावे म्हणून.

          आर. आर. पाटील म्हणतात शेतकर्‍याचे संतुलन गेलं. संतुलन का आणि केव्हा जातं हे यांना सुद्धा समजत नाही. यांना फक्त बिअर व डान्स बार बंद केले म्हणजे आपण खूप मोठं कार्य केले असे वाटते. तिथे कोण जात होते, दोन नंबरचे धंदे, काळे पैसे कमाविणारे व त्याची मुले. का, अनाथ, गरीब शेतकरी, व शेतमजूर जात होते? ते बंद करणे म्हणजे समुद्रात पाणी पाडण्यासारखे कार्य आहे. माझ्या मते गोरगरीब, अनाथ, रंजले गांजले शेतकरी, शेत मजूर यांच्या करिता केलेले कार्य हे सर्वात महान कार्य आहे असे मला वाटते आणि देशाच्या ज्या नेत्याने हे कार्य केले आहे ते आज गेल्यानंतर सुद्धा अमर झाले आहे. उदा. लाल बहादूर शास्त्री यांचे जगाच्या कोणत्याच बँकेत खाते नव्हते पण त्यांची आज कीर्ती आहे. त्यांना शेती आणि शेतकरी यांची कळकळ होती व त्यांचा नारा सुद्धा तोच होत. "जय जवान जय किसान". याला म्हणतात नेता आणि त्यांची नेतेगीरी. त्यांच्या मरणानंतर त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून कोणताही भारतीय वंदन करतो आणि त्यांना अंगरक्षकाची गरजच भासत नव्हती.

       आजचे पुढारी भ्रष्टाचारी दुराचारी आहेत. दिल्ली भ्रष्ट झाली म्हणून खेड्यातील गल्ली भ्रष्ट झाली. सरपंचापासून भ्रष्टाचार माजला. यांचे वर गोळ्या आणि कांदे फेक होणार नाही तर फुले फेक होणार? या पुढे या पेक्षाही वाईट दिवस पुढार्‍यांना पाहवे लागतील. शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार, विद्यार्थी आतंकवादी बनतील व शेतकर्‍याचे नांगर दाबण्याचे ताकतदार हात मंत्र्यांचे गळे दाबतील. त्या वेळेस तुमची झेडप्लस सुरक्षा सुद्धा कुचकामी ठरेल. तर वेळ गेलेली नाही, डोळे उघडा बेकारांना काम द्या, शेतीला प्राधान्य द्या. पूर्वी प्रमाणे उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी ही जी गंगा होती, ती तुम्ही उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती ही जी दिशा बदल केली आहेत. मुंबईचे जे नाले होते त्यांची जी पूर्वीची दिशा बदलवली गेली व त्याचा परिणाम काय झाला हे सर्व महाराष्ट्रीयन जाणून आहेत. गंगा ही राष्ट्रीय नदी आहे. तिची तुम्ही दिशा बदल केलेली आहे. त्याचा परिणाम सर्व देशाला व देशातील प्रमुखांना जरूर भोगावे लागेल, त्याकरिता शेतीला प्रथम प्राधान्य नंतर बाकी, तरच देशाचे खरे कल्याण होईल.

      मी सन २००४ साली ४३ आर शेत विकून २०८०० रु. ची ४१३४५ रु. सोसायटी भरली. तसेच सन १९९५ पासून विहीर धसल्यामुळे विजेचा वापर बंद असून सुद्धा मला वीज बिल भरावे लागले. विहीरीत संपूर्ण रिंगा पडल्या होत्या, त्यामुळे ६० फूट पासून १२३ फुटा पर्यंत खोदून संपूर्ण बांधकाम करावे लागले. शेत जाऊन सुद्धा मला ५१०००/- रु. सोसायटी कर्ज घ्यावे लागले. ते सुद्धा अपुरे पडले म्हणून मुलीकडून ३७०००/- रु. घ्यावे लागले. त्या नंतर कांदा लागवड केली. त्या खर्चा करिता गावातून कर्ज उचलले गेले. कांदा भावामुळे गावातील जास्त व्याजाचे पैसे द्यावे लागले. सोसायटीचे व्याज सुद्धा आजपर्यंत भरू शकलो नाही. घर खर्च व मुलाचे शिक्षण सुटू शकले नाही. या वर्षी तर कांदे पिका मुळे कर्जबाजारी झालो. मुलीला स्वतःच्या अंगावरील दागिने माझ्या घरी येऊन मोडावे लागले. ते पण पैसे मी तिला परत करू शकलो नाही, कारण तिच्या लहान मुलास कपडे घेण्यास सुद्धा माझ्या जवळ पैसे नव्हते.

      कर्जाचा बोजा डोक्यावर, जमीन पडलेली, पेरणीचे दिवस जवळ आलेले. घरखर्च आणि घरातील व्यक्तींच्या मूलभूत गरजा जर घरचालक पूर्ण करू शकला नाही तर, तो दिशाहीन बनतो आणि त्याला कोणताच मार्ग दिसत नाही आणि मरणच त्याला सर्व दु:खापासून मुक्त करू शकते. म्हणूनच तो आत्महत्या हा मार्ग पत्करतो. म्हणून मी सुद्धा आत्महत्या करीत आहे. मेल्या नंतर सर्व दु:खा पासून तर मला मुक्ती मिळेल परंतू ज्या नापिकी व ३०/- रु. गोणी मुळे (कांदे), कर्जामुळे मला हा मार्गक्रमण करावा लागला, तरी माझ्या मागे माझे कर्ज मुक्त करणे हे शासनाच्या हातात आहे. समजा शासनाने जरी माझे वरील कर्ज माफ केले तरी मेलेले शेतकरी राजे, बळी राजे परत येणार नाहीत.

        शासनाने शेतकर्‍यास कमी व्याजदरात जास्त कर्ज पुरवठा जरी केला तरी शेतकरी जास्त कर्जबाजारी होईल. कारण तो जमिनी करिता योग्य वेळी जास्त खर्च करेल व पीक उत्तम व भरपूर घेण्याचा प्रयत्न करेल, परंतू शेवटचे एक पाणी पडले नाही म्हणजे राजा झाला कर्जबाजारी आणि भिकारी. त्या करिता पीक विमा जरूरी आहे. शिवाय हंगाम भरपूर आल्यास त्या शेती मालास योग्य भाव मिळाला पाहिजे तरच शेतकरी सुधारू शकतो आणि ही जर उलटी गंगा वाहत राहिली आणि राजा भिकारी झाला तर प्रजा काय करणार? काय होणार हे आमच्या सारख्या मातीत राबणार्‍या शेतकर्‍याला समजते, आमच्या ढवळ्या पवळ्याला समजते पण आमच्या मंत्र्यांना समजत नाही, ही फार दुर्दैवी बाब व चिंतेची आहे. मला कर्जबाजारी करून आत्महत्या करण्यास भाग पाडणार्‍या शासनाचे मी आभार मानतो व माझी मी दु:खातून सुटका करून घेत आहे.

आपला कृपाभिलाषी
लाचार नम्र बळी भिकारी
दिनकर नारायण वराडे
किनगांव बु. || ता. यावल
जि. जळगाव
-----------------------------------------------------------------------------------------------------------

Share