नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
हे काळ्या आईच्या लाडक्या
का असा रुसलास तू
दुष्काळ पडला खूपच पडला
जळून गेलं नुकसान झालं म्हणून,
डोकं धरुन बसलास तू.
तुझं कोमल मन आज हळवं झालंय
मीठ नाही भाकरीच्या तुकड्यासोबत
तुझ विचारचक्र वाढत चाललंय,
वाढत जाणाऱ्या कर्जाच्या आकड्यासोबत.
झापड येऊन डोळ्यावरती ,
कधीच खाली पडलास
कोच पडली, अन भळभळ रक्त सांडलं
निसर्गाशी आज जणू ,तुझं मन भांडल.
बैल जोड गेली,शेळ्या गेल्या,
कुककुकनाऱ्या कोंबड्या गेल्या,
पण तुझा धीर जाऊ देऊ नकोस
जरी दिसत असला फास,
तरी गरबड तू करू नकोस .
बांधावरची बाभूळ पहा,
माथ्यावरचा आंबा पहा,
इवलसं बोरीच झुडूप पहा,
रानाचा कोपरा कोपरा पहा,
बघ सगळेच कसे झगडत आहेत.
निसर्गाशी दोन हात करत आहेत.
ते कधी रडले नाही,
शुष्क पडले पण, कुढले नाही
कारण,
त्यांना आशा आहे पुन्हा एकदा फुलण्याची
पाखरा संगे गाणे गात वाऱ्यासंगे झुलण्याची
तशीच तुझीही आशा पालवू दे
कळी तुझी हि एकदा खुलू दे
सोडत साऱ्या चिंता अन,
तुझ्या ही मनाचा माळ फुलू दे.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने