नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
लिखाण अतिशय प्रामाणिक
“रानमेवा” या पहिल्या वहिल्या कविता संग्रहाला मनापासून शुभेच्छा !!
गंगाधर मुटे यांचे लिखाण अतिशय प्रामाणिक आहे आणि त्यामुळेच ते अगदी आतपर्यंत पोचतं. आपल्या आजुबाजूला घडणार्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कवितेतून अगदी लख्ख दिसतात. त्यांची वैदर्भीय बोली पण वाचतांना गोड वाटते. शेतावर जीव तोडून प्रेम करणारा शेतकरी त्यांच्या कवितेतून भेटतो. शेतकरी वर्गाची अगतिकता, मेहेनत, गरीबी, असहायपणा.... सगळं सगळं त्यांच्या शब्दातून फारच समर्थपणे व्यक्त होतं. कवितेचे विविध प्रकार त्यांनी अगदी सहजतेने हाताळले आहेत. त्यांचा हा काव्यप्रवास, असाच अखंड सुरु राहो !!
जयश्री अंबासकर, कुवैत
http://jayavi.wordpress.com