पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
-- पंचनामा
मिळते न त्यास भाकर जो पोसतो जगाला शोकांतिका म्हणावी की शाप जीवनाला
शेतात थेंब माझ्या पडतो कधीतरी पण.. डोळ्यात आसवांच्या धारा क्षणाक्षणाला
होते शिवार हिरवे जे काल मेघराजा झाले तुझ्या कृपेने ते आज झाडपाला
करता कशास आता साहेब पंचनामा गेलाय बाप माझा भेटायला ढगाला
केले प्रयत्न लाखो हाती तरी निराशा ना पीक वाचले ना मालास भाव आला
- सागरराजे निंबाळकर, कल्याण संपर्क :- ८८७९८९७७९७
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.