Ramram नमस्कार !  Ramram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




रानामधले शेर...!

Comments

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Fri, 10/11/2017 - 07:15. वाजता प्रकाशित केले.

    ।।रानातला शेर-१।।

    मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
    भैरू अजून खातो कांदा नि भाकरी

    © गंगाधर मुटे ''अभय"

    https://www.facebook.com/gangadharmute/posts/3342772035747461
    http://www.baliraja.com/node/77

    शेतकरी तितुका एक एक!

  • मुक्तविहारी's picture
    मुक्तविहारी
    Mon, 13/11/2017 - 18:01. वाजता प्रकाशित केले.

    सर्वच शेर जबरदस्त आहेत सर !

    मुक्तविहारी

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Tue, 03/03/2020 - 11:32. वाजता प्रकाशित केले.

    चाकू - सुऱ्या प्रमाणे, हातात पेन त्यांच्या
    जितके लुटायचे ते, लुटतात कायद्याने

    © गंगाधर मुटे ''अभय"
    http://www.baliraja.com/node/782

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Tue, 03/03/2020 - 11:34. वाजता प्रकाशित केले.

    'अभय' देईना पोशिंद्यास; वाचू कशाला सांग?
    तुझे प्रबंध तुपात घोळून चुलीमध्ये तू घाल

    © गंगाधर मुटे 'अभय'
    http://www.baliraja.com/node/859
    https://www.facebook.com/gangadharmute/posts/3126698790688121

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Wed, 04/03/2020 - 22:48. वाजता प्रकाशित केले.

    खेड्याकडून जावे शहराकडे जसे
    आकार घटत चोळी, जाते सरासरी

    © गंगाधर मुटे 'अभय'
    https://www.facebook.com/gangadharmute/posts/3130000063691327

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Sun, 25/02/2024 - 12:41. वाजता प्रकाशित केले.
    कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे
    नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे

    © गंगाधर मुटे 'अभय'

     
     

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Sun, 25/02/2024 - 12:43. वाजता प्रकाशित केले.
    अन्नदाता या युगाचा जाहला उद्ध्वस्त आहे
    (फक्त कारण एवढे की अन्नधान्ये स्वस्त आहे)

    © गंगाधर मुटे 'अभय'

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Sat, 05/07/2025 - 20:18. वाजता प्रकाशित केले.

    आयुष्य म्हणजे पेंडूलम, दोलायमानी मॅच असते
    कधी मीलरचा सिक्सर तर, कधी सूर्याची कॅच असते

    #गंगाधर_मुटे #रानातला_शेर

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Wed, 09/07/2025 - 19:15. वाजता प्रकाशित केले.

    आयुष्याच्या वळणावरती
    जेव्हा पुरता दमून गेलो
    पोट बांधले पायाशी अन्
    हात हवेचा धरून गेलो

    #रानातला_शेर #गंगाधर_मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Wed, 16/07/2025 - 21:43. वाजता प्रकाशित केले.

    तुझी सांग येथे दखल कोण घेतो?
    कशाला घशाला उगा त्रास देतो?

    #गंगाधर_मुटे #रानातला_शेर
    http://www.baliraja.com/node/215

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Thu, 17/07/2025 - 20:05. वाजता प्रकाशित केले.

    तू कोसळ मुसळधार, जशी हवी तशी, कुठेही, कशीही
    मी ओढ्याच्या रुपात, सावरेन तुला, बाहूत घेऊन

    © गंगाधर मुटे १७/०७/१९ #थेट_बांधावरून

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Sun, 10/08/2025 - 23:11. वाजता प्रकाशित केले.
    तुलाच दिसतो तुझ्यात भारी, अस्सल गाढा थोर समीक्षक
    परी स्वतःला तपासले का? ठेऊन कुल्हा थंड तव्यावर
     
     #गंगाधर_मुटे #गझलेचा_शेर #आर्वीकर
    १०/०८/२०२१  ०५:३८

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Tue, 28/10/2025 - 20:37. वाजता प्रकाशित केले.

    मोह-मायेला कवटाळून बघावं म्हणतो
    आता थोडंस स्वतःसाठी जगावं म्हणतो

    - गंगाधर मुटे #शेर #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Tue, 11/11/2025 - 22:15. वाजता प्रकाशित केले.

    हमीभावाचा फासा टाकून पाडणार भाव
    शेतीही बुडणार अन् कर्जही बुडणार तोपर्यंत

    शेतमालास रास्त भाव नाही मिळणार तोपर्यंत
    कर्जमुक्ती एकमेव पर्याय उरणार तोपर्यंत

    कर्ज पेरले, कर्ज उगवले तर कर्जच पिकणार ना?
    घाट्याच्या धंद्यात काय दुसरे पिकणार तोपर्यंत

    - गंगाधर मुटे #शुभरात्री_लोक्सहो

    - गंगाधर मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Sun, 11/01/2026 - 21:18. वाजता प्रकाशित केले.

    अवकाळी पावसाच्या, गीत अंगाई गाण्याने
    तरु वल्ली पिकासवे, शेत झोपले उताणे

    नीत एकुलता एक, बैल हुंगतो तबेला
    गारा वादळानं त्याचा, साथी जोडीदार नेला

    © गंगाधर मुटे
    --------------------

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Sun, 18/01/2026 - 16:42. वाजता प्रकाशित केले.

    मी दगडाला पूजत नाही, घाव घणाचे त्यासी देतो
    आधी त्याचा देव बनवतो, नंतर त्याला पुजेस घेतो

    - गंगाधर मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • Pages