नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पिकांचा भाव
रिचार्ज वाढले पेट्रोल वाढले वाढली महागाई
तरी पिकांचा भाव माह्या वाढलाच नाई ।।धृ।।
सोयाबीन कापूस पेरली तूर
झाला मोठा पाणी गेला एक पूर
तरी हिम्मतीन कशी लढली लढाई ।।१।।
भेटना मजूर फसवे व्यापारी
कृषीकेंद्राची जरी झाली उधारी
ज्याची त्याची मी चुकवली पाईपाई ।।२।।
अस्मानी सुल्तानी संकट कोपलं
सरकार आहे अजून गाढ झोपलं
पिकवीमा अनुदान भेटनं का काई ।।३।।
बळीराजाला राहीला ना मोल
घाव ऊरात जरी बसला खोल
सुखाचं गाणं सदा आनंदान गायी ।।४।।
मातीतलं लेकरू मातीत जगलो
काळ्या आईसाठी मातीत राबलो
उपकार तुहे कधी फिटनार नाई ।।५।।
- निलेश दिगंबर तुरके
मु आटमुर्डी पो वाढोणा बाजार
ता राळेगाव जी यवतमाळ
मोबाईल: ७७४१८७७१७४
प्रतिक्रिया
खरे आहे... वास्तव कथन
खरे आहे... वास्तव कथन
खूप छान!
खूप छान!
मुक्तविहारी
पाने