नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गतकाळ
त्राण होता अंगी तवा
म्हणुन दिनरात्र राबायचो,
फाटक घरदार दडवाया
धागा धागा जोडायचो.(1)
असायचा नीसर्गही संगे
ठरलेल्या असे सार्या वेळा,
एका रांगेत उभा असायचे
हिवाळा उन्हाळा नी पावसाळा.(2)
झगमगत्या जीवनाची कीड
पडली मानवी डोक्यात,
सलग कापुनी सारी झाडे
स्वत:चा जीव टाकला धोक्यात.(3)
आता जशी काळीमाय तसाच मी
माझ्या देहावर सुरकुत्या नी तीच्या भेगा,
थरथरनारे कर जोडुन मागतो
गतकाळ देवा आता परत देगा.(4)
प्रज्ञा आपेगांवकर..
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!