Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***६ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन

६ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन अलिबागला
दिनांक : ८ व ९ फेब्रुवारी २०२०       स्थळ : क्षात्रैक्य सभागृह, अलिबाग जि. रायगड 
भास्कर चंदनशिव संमेलनाध्यक्ष तर संजय राऊत उद्घाटनाला येणार
 
logo        कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला भेडसावणार्‍या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषिजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून दि. ८ व ९ फेब्रुवारी  २०२० रोजी क्षात्रैक्य समाज सभागृह, अलिबाग जि. रायगड येथे दोन दिवशीय ६ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
            संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शेतकरी साहित्यिक मा. भास्कर चंदनशिव यांची निवड करण्यात आली असून ज्येष्ठ पत्रकार मा. संजय राऊत संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. ८ फेब्रुवारीला उद्घाटन सत्रात मा. राजीव खांडेकर, संपादक, एबीपी माझा, मा. श्री. सुनील तटकरे खासदार, रायगड, मा. सरोजताई काशीकर, माजी आमदार, मा. ऍड सतीश बोरुळकर प्रमुख अतिथी म्हणून तर स्वागताध्यक्ष मा. ऍड प्रदीप पाटील, कार्याध्यक्ष मा. गंगाधर मुटे प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत.
          वरिष्ठ पत्रकार मा. आदिनाथ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पुरस्कार वितरण सत्राला मा. ना. कु.अदिती तटकरे, राज्यमंत्री, महाराष्ट्र शासन, आमदार मा. महेंद्र दळवी, नगराध्यक्ष मा. प्रशांत नाईक, कृषी अर्थतज्ज्ञ मा. संजय  पानसे, मा. कैलास तवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
          समारोपीय सत्र शेतकरी नेते ऍड वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. अनिल घनवट, वरिष्ट पत्रकार मा. राजेश राजोरे,  मा. गीता खांडेभराड, मा. बाबुभाई जैन, मा. नीलकंठराव घवघवे, श्री दिलीप भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल.
मागील काही वर्षापासून शेतकरी आत्महत्यांनी विक्राळरूप धारण केले आहे, “रोजचेच मढे, त्याला कोण रडे” अशा निर्विकारपणे शेतीव्यवसायाकडे बघण्याची शासकीय यंत्रणेची मानसिकता तयार झाली आहे. राज्यातील गेल्या काही वर्षापासून सततच्या नापिकीने शेतीव्यवसाय डबघाईस आला असतानाच बिगरशेती उत्पादनाचे बाजारभाव आकाशाला भिडत असून शेतीमालाचे भाव एकतर स्थिर आहेत किंवा नीचांक गाठत आहे. परंतू प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फ़ारसा उहापोह होतांना दिसत नाही. राजकीय आणि शासकीय आघाड्यावर उपाययोजना शोधण्याच्या संदर्भात तर सारा शुकशुकाट जाणवत आहे.
         समाजाचा आरसा समजल्या जाणाऱ्या साहित्यक्षेत्रात सुद्धा यापेक्षा वेगळी स्थिती नाही. शेतकऱ्याची मुले शिक्षण घेऊन अन्य व्यवसायात गेली, पोटापाण्याचा प्रश्न सुटल्याने लिहिती होऊन अभिव्यक्त व्हायला लागली पण त्यांनाही शेतीच्या वास्तवाकडे अभ्यासपूर्ण आपुलकीने पाहावेसे वाटत नाही, हे शेतीव्यावासायाचे फार मोठे शल्य आहे. गेल्या १५-२० वर्षांमध्ये देशात लक्षावधी  शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे का उमटत नाही? याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे. शेतकरी आत्महत्यांवर सर्वकष प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे, शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे आणि त्यावर आवश्यक उपाययोजनांची चाचपणी करून जाणिवा समृद्ध करणारे पुस्तक मराठी साहित्यविश्वात आजही उपलब्ध नसणे ही बाब मराठी साहित्यक्षेत्राचे खुजेपण दर्शविणारी आहे.
           साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपूर येथे, २०१७ मध्ये तिसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोली येथे, २०१८ मध्ये चवथे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई येथे तर २०१९ मध्ये ५ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण येथे आयोजित करून पिढ्यानपिढ्याच्या अबोलतेला बोलते व लिहिते करण्याच्या यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे.
            या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्‍या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि सशक्त लेखणीच्या माध्यमातून इंडियाच्या बरोबरीने भारतालाही समृद्ध व संपन्न करण्यासाठी हातात लेखणी घेऊन लढणाऱ्या लढवैया सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.
           दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात “हिरव्यागार शेतीला कार्बन क्रेडीटचा लाभ का नाही?”  “कांदे आणि अकलेचे कांदे” “खुली बाजारपेठ आणि वायदा बाजार” “खांद्यास चला खांदा भिडवूनी” अशा विविध विषयावरील परिसंवाद राहणार असून या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार असल्याने हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे.
               संमेलनात शेतकरी गझल मुशायरा, शेतकरी कवी संमेलन,शेतकरी कथाकथन व “ज्येष्ठ शेतकरी साहित्यिक मा. शेषराव मोहिते यांची प्रकट मुलाखत” असे स्वतंत्र सत्र ठेवण्यात आले असून या संमेलनात महाराष्ट्रासोबतच देश-विदेशातील १००० पेक्षा जास्त मराठी भाषिक प्रतिनिधी, नामवंत साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत सहभागी होतील, असा विश्वास आहे.
 
गंगाधर मुटे
कार्याध्यक्ष
* * *
शनी, 19/10/2019 :
प्रतिनिधी नोंदणीची प्रक्रिया लवकरच सुरु होत आहे.

* * *

अलिबाग एक सुंदर पर्यटन स्थळ 
 
           अलिबाग हे एक सुंदर पर्यटन स्थळ असून त्याला मिनी गोवा मानले जाते. संमेलनाला आलेले प्रतिनिधी संमेलन सोडून फिरायला जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आपल्या आजवरच्या शिस्तीला यावेळेस तडा जाण्याचा धोका आहे. संमेलनातील सोयीसुविधांचा लाभ घ्यायचा आणि संमेलनाऐवजी पर्यटन करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे प्रतिनिधींनी संमेलनाशी कटिबद्धता राखण्यासाठी दोन्ही दिवस  कार्यक्रमात उपस्थित राहून १ किंवा २ दिवस पर्यटनासाठी स्वतंत्र दिवस राखून ठेवावे आणि त्यादृष्टीने आपले नियोजन करावे, अशी आग्रहाची विनंती आहे.
          त्यासाठी प्रतिनिधींसाठी एक दिवस अतिरिक्त मुक्कामाची व्यवस्था करता येईल काय, याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात येत आहे. सबब प्रतिनिधींना विनंती कि त्यांनी अलिबागसाठी ३ किंवा ४ दिवसाचे नियोजन करावे.
 
अलिबाग एक पर्यटन स्थळ :  प्रतिनिधींना अधिक माहितीसाठी  >>>> http://www.baliraja.com/node/1907
------------
बुध, 30/10/2019

प्रतिनिधी सहभाग नोंदणीची पद्धत :
 

 • सभागृहाची आसन क्षमता, निवासाच्या सोयीसुविधा व भोजनाची व्यवस्था लक्षात घेता गैरसोय होऊ नये म्हणून अग्रिम प्रतिनिधी नोंदणी करणे आवश्यक आहे.
 • प्रतिनिधी सहभाग शुल्क म्हणून स्वेच्छेने यथाशक्ती शुल्काची रक्कम अदा करणे अनिवार्य आहे. भरलेल्या रकमेची रीतसर पावती संमेलनस्थळी किट मध्ये दिली जाईल.
 • एक ते पाच प्रतिनिधी सहभाग शुल्क सामूहिकपणे भरुन एकत्रितपणे नोंदणी करू शकतात. 
 • प्रतिनिधींना ३ वेळ भोजन, ४ वेळ चहा, अल्पोपहार, १ रात्र निवास व्यवस्था, माहिती किट आणि सहभाग प्रमाणपत्र मिळेल.
 • अग्रीम नोंदणी केल्यानंतर SMS द्वारे, व्हाटसपद्वारे, ईमेलद्वारे किंवा दूरध्वनीद्वारे प्रतिनिधीला नोंदणी क्रमांक कळवला जाईल.
 • पुरेशी नोंदणी झाल्याबरोबर कोणत्याही क्षणी नोंदणी बंद केली जाईल. पूर्वसूचना देणे शक्य होणार नाही.
 • झालेल्या नोंदणीमधूनच परिसंवादातील वक्ते, कवी आणि गझलकार निवडले जातील आणि त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण पाठवले जाईल.
 • नोंदणी झालेल्या सर्व वक्ते, कवी आणि गझलकार यांना व्यासपीठावर संधी मिळेलच असे नाही, याची नोंद घ्यावी.
 • कोणत्याही सबबीखाली नोंदणीची रक्कम परत मिळणार नाही.
अधिक माहिती >>>> http://www.baliraja.com/rep-regd येथे उपलब्ध आहे.
 
बुध, 18/12/2019 :
सूचना - प्रतिनिधी नोंदणी
 
 • ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरुन किंवा ईमेलने माहिती पाठवून *प्रतिनिधी नोंदणी* केलेली आहे त्या सर्वांना त्यांचा *नोंदणी क्रमांक* पाठवण्यात आलेला आहे.
 • ज्यांनी नोंदणी केली परंतु त्यांना *नोंदणी क्रमांक* अजून मिळाला नसेल त्यांनी तातडीने कळवावे.
 • पुरेशी नोंदणी झाल्याबरोबर कोणत्याही क्षणी नोंदणी बंद केली जाईल. पूर्वसूचना देणे शक्य होणार नाही.
 • झालेल्या नोंदणीमधूनच परिसंवादातील वक्ते, कवी आणि गझलकार निवडले जातील आणि त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण पाठवले जाईल.
 • दोन व्यक्तींनी खात्यावर रक्कम जमा केलेली आहे पण त्यांच्याकडून काही माहिती आलेली नसल्याने कुणी जमा केली हे कळायला मार्ग नाही. कारण आजकाल ऑनलाइन पद्धतीने रक्कम जमा केल्यास फक्त TXN नंबर येतो, नाव येत नाही. सबब संबंधितांनी माहिती पाठवली नाही, आणि त्यांची नोंदणी झाली नाही तर त्याचा दोष शेतकरी साहित्य चळवळ स्वीकारू शकणार नाही.
आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेत!

दिनांक : ०४/०२/२०२० - सुधारित कार्यक्रम पत्रिका 

कार्यक्रम पत्रिका

कार्यक्रम पत्रिका

कार्यक्रम पत्रिका

कार्यक्रम पत्रिका

Brochure

Brochure


Raigad Times
 

lokmat

Agrowon

शेतकरी साहित्य संमेलन

शेतकरी संमेलन

Lokshahi Warta

sakal

Tarun Bharat

Sakal

Bhaskar

Navbharat   शेतकरी साहित्य संमेलन 

शेतकरी साहित्य संमेलन

loksatta

krishival
lokmat 

शेतकरी साहित्य संमेलन
 

Share

प्रतिक्रिया

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  बुध, 09/10/2019 - 16:58. वाजता प्रकाशित केले.
  अत्यंत महत्वाचे निवेदन :
   
  १)  पूर्वानुभव असा आहे कि, अनेक स्पर्धाविजेते संमेलनाला येण्याचे कबुल करूनही प्रत्यक्षात येत नाहीत, त्यामुळे सन्मानचिन्ह (momento) वाया जातात. त्यावर केलेला खर्च व्यर्थ जातो. त्यामुळे सर्व विजेत्यांनी *दि. १२/०१/२०२०* पर्यंत आपली संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी करून घ्यावी. ज्यांनी नोंदणी केलेली असेल फक्त त्यांचे नावाचे सन्मानचिन्ह (momento) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती  http://www.baliraja.com/rep-regd  येथे उपलब्ध आहे. त्यांनतर कसलाही उजर ऐकला जाणार नाही.
   
  २) ज्यांनी नोंदणी केली आहे त्या सर्वांना त्यांचा नोंदणी क्रमांक कळवण्यात आलेला आहे. ज्यांना नोंदणी क्रमांक मिळालेला नसेल त्यांची नोंदणी झालेली नाही. चुकीने काही कारणामुळे असे होऊ शकते. तातडीने संपर्क करावा.
  ३) फक्त शुल्क भरल्याने नोंदणी होत नाही. कारण शुल्क भरणारा कोण याचा उलगडा होत नाही. माहिती पाठवणे अत्यंत आवश्यक आणि अनिवार्य आहे. त्याशिवाय नोंदणी होत नाही.
   
  ४) निधी गोळा करण्याच्या उद्देशाने आपण नोंदणी शुल्क अनिवार्य केलेले नाही. नोंदणी वगैरे मधून जी रक्कम जमा होते ती एकूण खर्चाच्या ३-४ टक्के सुद्धा नसते. नोंदणी शुल्काच्या माध्यमातून निधी गोळा करणे हा आपला उद्देश नसतो कारण काहीही केले तरी यातून जास्त काही निधी गोळा होणारच नसतो. आपले नोंदणी शुल्क सुद्धा ऐच्छिक असते. कुणी एक रुपया दिला तरी चालतो. शेवटी यातून आपण लोकांना दातृत्व गुण सक्तीने शिकवतो. दान हे दान असते. त्यात आकड्याला काहीही महत्व नसते. कुणी किती नोंदणी शुल्क दिले ते सुद्धा माझ्याशिवाय कुणालाच माहित नसते. आपण कधीच जाहीर करत नाहीत. नोंदणी फक्त सर्वांना शिस्त लागावी आणि नेमकेपणाने भोजन/निवास व्यवस्थेचे नियोजन करता यावे यासाठी असते.
  सहकार्याच्या अपेक्षेत!
   
                    गंगाधर मुटे
                       अध्यक्ष
  अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
  ----------------------

  शेतकरी तितुका एक एक!

 • Ravindra Kamthe's picture
  Ravindra Kamthe
  बुध, 09/10/2019 - 18:37. वाजता प्रकाशित केले.

  नमस्कार मुटे सर,
  सर्वप्रथम तुमचे हार्दिक अभिनंदन. सलग सह्याव्यांदा अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करुन तुंम्ही तुमच्या सचोटीची, जिद्दीची, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, व्यथांची, समस्यांची जाणिव असल्याची व त्यावर तोडगा काढण्याच्या ध्यासाची प्रचिती दिलीत.
  माझ्या खूप खूप शुभेच्छ्या.
  आपला शुभचिंतक
  रविंद्र कामठे

  आपला विश्वासू,
  रविंद्र कामठे
  पुणे
  भ्र. न. ९८२२४ ०४३३०
  इमेल – ravindrakamthe@gmail.com

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  बुध, 09/10/2019 - 16:58. वाजता प्रकाशित केले.

  संमेलन

  शेतकरी तितुका एक एक!

 • Dr. Ravipal Bharshankar's picture
  Dr. Ravipal Bha...
  बुध, 09/10/2019 - 17:06. वाजता प्रकाशित केले.

  खुपच छान सर Bouquet

  Dr. Ravipal Bharshankar

 • Dhirajkumar Taksande's picture
  Dhirajkumar Taksande
  शनी, 12/10/2019 - 09:38. वाजता प्रकाशित केले.

  खूप छान!
  खूप खूप शुभेच्छा Bouquet

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शनी, 19/10/2019 - 10:16. वाजता प्रकाशित केले.

  ६ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, अलिबाग
  दिनांक : ८ व ९ फेब्रुवारी, २०२०
  प्रतिनिधी नोंदणीची प्रक्रिया लवकरच सुरु होत आहे.

  अलिबाग हे एक सुंदर पर्यटन स्थळ असून त्याला मिनी गोवा मानले जाते. संमेलनाला आलेले प्रतिनिधी संमेलन सोडून फिरायला जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आपल्या आजवरच्या शिस्तीला यावेळेस तडा जाण्याचा धोका आहे. संमेलनातील सोयीसुविधांचा लाभ घ्यायचा आणि संमेलनाऐवजी पर्यटन करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे प्रतिनिधींनी संमेलनाशी कटिबद्धता राखण्यासाठी दोन्ही दिवस  कार्यक्रमात उपस्थित राहून १ किंवा २ दिवस पर्यटनासाठी स्वतंत्र दिवस राखून ठेवावे आणि त्यादृष्टीने आपले नियोजन करावे, अशी आग्रहाची विनंती आहे.

  त्यासाठी प्रतिनिधींसाठी एक दिवस अतिरिक्त मुक्कामाची व्यवस्था करता येईल काय, याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात येत आहे. सबब प्रतिनिधींना विनंती कि त्यांनी अलिबागसाठी ३ किंवा ४ दिवसाचे नियोजन करावे.

  अलिबाग एक पर्यटन स्थळ :  प्रतिनिधींना अधिक माहितीसाठी  >>>> http://www.baliraja.com/node/1907

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  बुध, 30/10/2019 - 16:29. वाजता प्रकाशित केले.
  प्रतिनिधी सहभाग नोंदणीची पद्धत :
  • सभागृहाची आसन क्षमता, निवासाच्या सोयीसुविधा व भोजनाची व्यवस्था लक्षात घेता गैरसोय होऊ नये म्हणून अग्रिम प्रतिनिधी नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • प्रतिनिधी सहभाग शुल्क म्हणून स्वेच्छेने यथाशक्ती शुल्काची रक्कम अदा करणे अनिवार्य आहे. भरलेल्या रकमेची रीतसर पावती संमेलनस्थळी किट मध्ये दिली जाईल.
  • एक ते पाच प्रतिनिधी सहभाग शुल्क सामूहिकपणे भरुन एकत्रितपणे नोंदणी करू शकतात. 
  • प्रतिनिधींना ३ वेळ भोजन, ४ वेळ चहा, अल्पोपहार, १ रात्र निवास व्यवस्था, माहिती किट आणि सहभाग प्रमाणपत्र मिळेल.
  • अग्रीम नोंदणी केल्यानंतर SMS द्वारे, व्हाटसपद्वारे, ईमेलद्वारे किंवा दूरध्वनीद्वारे प्रतिनिधीला नोंदणी क्रमांक कळवला जाईल.
  • पुरेशी नोंदणी झाल्याबरोबर कोणत्याही क्षणी नोंदणी बंद केली जाईल. पूर्वसूचना देणे शक्य होणार नाही.
  • झालेल्या नोंदणीमधूनच परिसंवादातील वक्ते, कवी आणि गझलकार निवडले जातील आणि त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण पाठवले जाईल.
  • नोंदणी झालेल्या सर्व वक्ते, कवी आणि गझलकार यांना व्यासपीठावर संधी मिळेलच असे नाही, याची नोंद घ्यावी.
  • कोणत्याही सबबीखाली नोंदणीची रक्कम परत मिळणार नाही.
  अधिक माहिती >>>> http://www.baliraja.com/rep-regd येथे उपलब्ध आहे.

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  बुध, 18/12/2019 - 18:09. वाजता प्रकाशित केले.

  सूचना - प्रतिनिधी नोंदणी

  ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरुन किंवा ईमेलने माहिती पाठवून *प्रतिनिधी नोंदणी* केलेली आहे त्या सर्वांना त्यांचा *नोंदणी क्रमांक* पाठवण्यात आलेला आहे.

  ज्यांनी नोंदणी केली परंतु त्यांना *नोंदणी क्रमांक* अजून मिळाला नसेल त्यांनी तातडीने कळवावे.

  पुरेशी नोंदणी झाल्याबरोबर कोणत्याही क्षणी नोंदणी बंद केली जाईल. पूर्वसूचना देणे शक्य होणार नाही.

  झालेल्या नोंदणीमधूनच परिसंवादातील वक्ते, कवी आणि गझलकार निवडले जातील आणि त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण पाठवले जाईल.

  दोन व्यक्तींनी खात्यावर रक्कम जमा केलेली आहे पण त्यांच्याकडून काही माहिती आलेली नसल्याने कुणी जमा केली हे कळायला मार्ग नाही. कारण आजकाल ऑनलाइन पद्धतीने रक्कम जमा केल्यास फक्त TXN नंबर येतो, नाव येत नाही. सबब संबंधितांनी माहिती पाठवली नाही, आणि त्यांची नोंदणी झाली नाही तर त्याचा दोष शेतकरी साहित्य चळवळ स्वीकारू शकणार नाही.

  आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेत!

  आपला स्नेहांकित
  गंगाधर मुटे
  कार्याध्यक्ष
  ६ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, अलिबाग

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  सोम, 06/01/2020 - 12:14. वाजता प्रकाशित केले.

  lokamat

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  मंगळ, 04/02/2020 - 22:09. वाजता प्रकाशित केले.
  अत्यंत महत्वाचे निवेदन
   
  स्व. अजित नरदे यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे सहाव्या अलिबाग साहित्य संमेलनातील काही कार्यक्रमाच्या वेळात बदल करण्यात येत आहेत.

  1. स्व. अजित नरदे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजित सत्राचा कांदे आणि अकलेचे कांदे हा विषय बदलण्यात आला असून सत्राचा विषय स्व. अजित नरदे एक समर्पित व्यक्तिमत्व असा करण्यात आला आहे. ज्यांना या विषयावर ३ ते ५ मिनिट विचार व्यक्त करायचे असेल त्यांनी माझेकडे आपले नाव नोंदवावे.
  2. शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२० रोजी नियोजित कथाकथन रात्री ८ वा. ऐवजी दुपारी ०२.३० वा. होईल.
  3. रविवार, ९ फेब्रुवारी २०२० रोजी नियोजित असलेले सर्वच सत्र (प्रकट मुलाखत, शेतकरी गझल मुशायरा, पुरस्कार वितरण व समारोप) नियोजित वेळेपेक्षा १.३० आधी सुरु होतील.
  सर्वांनी बदलाची काळजीपूर्वक नोंद घ्यावी. 
   
  आपला स्नेहांकित,
  गंगाधर मुटे
  दि. ०४/०२/२०२०

  शेतकरी तितुका एक एक!

 • Krushna Ashok Jawle's picture
  Krushna Ashok Jawle
  सोम, 10/02/2020 - 23:52. वाजता प्रकाशित केले.