नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
झिम्माड बरसणाऱ्या त्या पावसासारखा ,
मित्र गर्द हिरवळीच्या दिवसासारखा .....
भिजल्या रानी शेतकऱ्याच्या नवसासारखा,
कोवळ्या दुधाच्या घट्ट खरवसासारखा.
ग्रीष्मातल्या उन्हात जणू मिरगासारखा
कधी रुसलेल्या कोरड्या ढगासारखा,
उंच आभाळात उडणाऱ्या खगासारखा
मित्र स्वतःच निरभ्र नितळ नभासारखा.
झाडापानावरुन ओघळणाऱ्या थेंबासारखा
मित्र नव्याने अंकुरणाऱ्या कोंबासारखा,
कधी दिसतो आपल्याच प्रतिबिंबासारखा
मित्र असतो जसा पूर्णत्वाच्या टिंबासारखा.
शेत गेले तरी उरलेल्या त्या महामार्गासारखा
गावठाणातील मंदिर न् पीराच्या दर्गासारखा,
मित्र गजबजलेल्या शाळेतील वर्गासारखा
मित्र गावरानाकडच्या निर्मळ निसर्गासारखा.
किरण शिवहर डोंगरदिवे, समता नगर, मेहकर ता मेहकर जि बुलढाणा पिन 443301, मोबा 7588565576
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!