नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
सहकारापासून सावधान
सहकाराचे बीज रुजले या मातीत
सहकार अंकुरला या मातीत
सहकार बहरला या मातीत
सहकार फळला या मातीत
पण सहकार का झाला स्वाहाकार?
येथे जाणते नेते सहकाराचे
त्यांनी दिशा दिली कोणत्या समाजकारणा?
....... आज दिसते आहे
सामान्यांच्या अपेक्षांची उपेक्षा झालेली
स्वहित जपण्यासाठी त्याच नेत्यांनी
होळी केली समाजहिताची
मंदीर सहकाराचे थडगे झाले स्वाहाकाराचे
लोक म्हणतात तुम्ही तर म्हसनजोगी!!
छे s s छे, तुम्ही कसले म्हसनजोगी.... म्हसनजोगी?
तुम्हाला कसे म्हणावे म्हसनजोगी?
म्हसनजोगी ... आत्मक्लेष सहन करणारा
स्वतःचा चीड, संताप ... स्वअंगावर कडाक्याचे घाव घेऊन....
हसत.. नाचत.. गात सहन करणारा खराखुरा.... गांधीवादी
... आरे मुर्दाडांनो तुम्ही आहात
या समाज जीवनावर जडलेल्या
रक्तपिपासू जळवा!!!!!
जळवा म्हणजे आमच्याच
रक्तपेशी मधून निर्माण झालेलं उंवा सारखे सुक्ष्म कृमी!
जेथे निर्माण होतात तेथेच शोषण करून समृद्ध होतात
आणि आपली घाणेरडी पिलावळ जन्माला घालतात
पोशिंद्याचा मुडदा पाडण्यासाठी !!!
म्हणून मित्रांनो... सावधान.. सावधान...
सहकारात आपल्या घामातून आपल्याच श्रमातुन उपजलेल्या
या जळवापासून सावध रहा... सावध रहा... सावध रहा...
प्रशांत कराळे
----------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
या समाज जीवनावर
या समाज जीवनावर जडलेल्या
रक्तपिपासू जळवा!!!!!
जळवा म्हणजे आमच्याच
रक्तपेशी मधून निर्माण झालेलं उंवा सारखे सुक्ष्म कृमी!
जेथे निर्माण होतात तेथेच शोषण करून समृद्ध होतात
आणि आपली घाणेरडी पिलावळ जन्माला घालतात
पोशिंद्याचा मुडदा पाडण्यासाठी !!!
सुरेख.
शेतकरी तितुका एक एक!
..........आरे मुर्दाडांनो
..........आरे मुर्दाडांनो तुम्ही आहात
या समाज जीवनावर जडलेल्या
रक्तपिपासू जळवा!!!!!
...... आपला रोष अत्यंत सार्थ आहे आणि समर्पक शब्दात मांडला आहे. हा निखारा जपून ठेवा..!
Navnath Pawar
Aurangabad, Maharshtra
हा निखारा जपून ठेवा..! अगदी
हा निखारा जपून ठेवा..!
अगदी अगदी. मी पण तेच म्हणतो.
शेतकरी तितुका एक एक!