Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***मा. शरद जोशींच्या नजरेतून साहित्यिक

लेखनविभाग: 
ललितलेख

मा. शरद जोशींच्या नजरेतून साहित्यिक

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी भूमीपूत्र मानला जातो. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी मानले जायचे. पण आता उत्तम नोकरी आणि कनिष्ठ शेती मानले जाते. एवढे स्थिंत्यतर का आणि कधी आले? 'शेतकरीराजा' मानला जाणारा हा भूमीपुत्र सुजलाम, सुफलाम होण्याऐवजी कर्जबाजारी होत गेला. त्यापायी गळफास लावून घेवू लागला. ‘काय होते आहे.’ ते सर्वांना दिसत होते. पण ‘का होते आहे.’ याचा विचार कोणी करतांना दिसत नव्हते...अगदी शेतकरी सुध्दा! Sad
पण एक व्यक्ति अशी होती जिला ही परिस्थिती बदलावी असे वाटू लागले, ते होते मा.शरद जोशी! सरकारी नोकरी सोडुन ते शेतीत शिरले. कुठलाही पिढीजात अनुभव गाठीशी नव्हता. शेती करतांना येणार्‍या अडचणी, पावसाचे बे-भरवशाचे वेळापत्रक, शेतीमालाला मिळणारा पडता भाव, दलालांची चालूगिरी या सर्व गोष्टी त्यांच्या लक्षात येवू लागल्या. हे सर्व बदलावे अशा विचारांने त्यांनी शेतकर्‍यांना जागे करायचा / एक करायचा प्रयत्न सुरु केला. पण हे तितके सोपे नव्हते. स्वतःच्या समस्याबाबत, शेतीच्या अर्थकारणाबाबत शेतकरी अतिशय उदासिन होता. Headack
आदीवासी, शेतमजूरांवर कलाकृती बनल्या. पुस्तके लिहीली गेली. पण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी बाजूला टाकला गेला. शेतकर्‍यांला जमिनीशी जखडून ठेवले गेले. त्याच्या आयुष्यात काही मसालेदार कहाण्या नव्हत्या. ग्रामिण साहित्यात बलुतेदारांच्या कथा आहेत, धरणग्रस्तांच्या समस्या लिहिल्या गेल्या. ग्रामिण स्त्रीच्या, भूताखेतांच्या सुरस कथा ही चवीने लिहील्या आणि वाचल्या गेल्या. पण शेतकर्‍यांच्या कथा फार तुरळक आढळतात. रोजचा गाडा ओढतांना पिचून गेलेल्या त्याच्यात कोणाला विकली जाणारी कथा दिसत नव्हती. त्याच्या गरीब संसारातील ओढग्रस्तीत कोणाला रस नव्हता.
जे वास्तव दिसते आहे तेच साहित्यात मांडावे हे मा. शरद जोशींचे साहित्यविषयक तत्व होते, जे लेखकांच्या पचनी पडत नव्हते. डाव्या आघाडीने जशी आपली विवंचना साहित्यात मांडली, तशी शेतकर्‍यांची व्यथा मांडणारे कोणी नव्हते. खुद्द शेतकरी ही वाचत, लिहीत नव्हता. जो स्वतःच्या बाबतीत इतका उदासीन होता, त्याला साहित्यिकांनी पण बाजूलाच ठेवले होते. त्यामुळे त्याच्या समस्या, विवंचना अव्यक्तच राहील्या. Sad
डाव्या विचारसरणीच्या लेखकांनी शेतकर्‍यांला खलनायक ठरवले तर शहरवासियांनी त्याला अल्पसंतुष्ट दाखवून उदो-उदो केला. शेतकरीण कायम नऊवारी लुगड्यात, चुलीपुढे भाकर्‍या थापतांना दाखवली गेली. ती फाटकं धडुतं नेसून शेतात राबतांना दिसली, कुठल्याही परिस्थितीत हसतमुख, त्यागमूर्ती अशी बिरुद लावून तिच्यातल्या माणसाची कायम गळचेपी केली. तिने कायम गरीबी पाहीली. काळ्या पोतींशिवाय दुसरा दागीना तिच्याकडे नसतो. प्रसंगी त्या पोतीतलं सोनं ही बियाणांसाठी विकायला लागते.
शेतकर्‍याच्या घरात एकाच भावाचा संसार नीट होतो. असे का? शेतीवर दोन संसार पोसले का जात नाहीत? हे साहित्यात उतरले नाही. शहरांत राहणारा, नोकरी करणारा भाऊ शेती करणार्‍या भावांला प्रसंगी मदत करतो. पण त्या बदल्यात तयार धान्याची पोती बेदिक्कतपणे उचलून ही नेतो. शेतकरी भावाला आणि त्याच्या कुंटुंबाला सगळे गृहीत धरतात. त्याला शुद्राप्रमाणे वागवले जाते. त्याचे घरदार दुसर्‍यांसाठी राबत रहाते. गरीब शेतकर्‍यांच्या मुली पैशाअभावी अविवाहीत राहतात. आई-बापाचा घोर कमी करण्यासाठी शहरात पळून जातात. तिथून त्या कुंटणखान्यात पोहोचतात. घर ते कुंटणखाना या दरम्यान त्यांचा प्रवास, त्यांची उलाघाल कोणी साहित्यात दाखवलेली नाही. शेतकर्‍याचे म्हातारे आई-वडील देह ठेवण्यासाठी एखादे तीर्थस्थळ का गाठतात? हि सर्व परिस्थिती साहित्यात अछूती का राहीली?
'शेतकर्‍यांच्या आत्महत्या' हा आजचा ज्वलंत विषय आहे. स्वतःचा जीव घ्यावा अशी परिस्थिती शेतकर्‍यावर येते, घरेच्या घरे उध्वस्त होतात, त्यामागे बरेच नाट्य, बराच संघर्ष असणार आहे. मग साहित्यिक अजूनही त्याबाबतीत उदासीन कसे राहू शकतात? 'शेतकर्‍याच्या आत्महत्या मागे नक्की शेतीचे कर्ज आहे की अजून काही कारण?' असे बरेचजण दबल्या स्वरात बोलतात. फार मोजक्या लेखकांनी या विषयाला हात घातला आहे. पण मुळापर्यत अजून फारसे कोणी गेलेले नाही.
अनेक शेतकर्‍यांची तरुण मुले संघटनेत आली, लढली आणि काही काळाने राजकारणात शिरली. हे विचार परिवर्तन का आणि कसे घडले? याविषयी कोणी 'ब्रऽ' काढत नाही. शेतकर्‍याच्या घरात सुबत्ता येते, ती इतर कारणाने, शेतीतून नाही. शेती हे तोट्याचे गणित का आहे? हे आधी शोधले पाहीले.
शेतकर्‍यांची मुले, जी शेती सांभाळू लागली, त्यांना लग्नासाठी मुली मिळणे दुरापास्त झाले. 'शेतकरी नवरा नको.' असा सूर मुलीच नाही, तर त्यांचे आईवडील पण आळवू लागले. साधा शिपाई चालेल, शहरात एका खोलीत रहायची तयारी आहे, पण नोकरीवालाच हवा अशी मनोवृत्ती बळावली. बागायतदार सुध्दा यातून सुटले नाही. या मनोवृत्तीमागे काय कारणे आहेत? याचा धांडोळा घेणे गरजेचे आहे.
ग्रामिण लेखन करणारे शेतीशी जोडलेले आहेत, पण शेतकरी नाहीत. अस्सल ग्रामिण साहित्य शेतकर्‍याने लिहीलेलेच नाही. साहित्यिकांनी रंगवलेला शेतकरी, पाटील/ जमिनदार असा मातब्बर आहे. तो रंगेल, जुलमी, मातलेला किंवा एकदम उलट कनवाळू, धार्मिक असा असतो. टोकाच्या भूमिका सोडून शेतकर्‍याला एक हाडां-मांसाचा माणूस म्हणून जेव्हा साहित्य पुढे आणेल तेव्हा तो त्याच्यासोबत न्याय होईल.
जेव्हा शेती स्वतःच्या मर्जीने केली जाईल, व्यवसाय म्हणून तिचा ताळेबंद ठेवला जाईल तेव्हा खरे शेती साहित्य निर्माण होईल. शेतकरी जेव्हा नांगराबरोबर लेखणी ही हातांत घेईल तेव्हा समाजपरिवर्तनास खरी सुरुवात होईल. मा. शरद जोशींचे हे स्वप्न कधी साकार होईल?

---- विनिता माने – पिसाळ
पुणे - ४११०४४

Share

प्रतिक्रिया