नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
धोरण....
बाप द्यायचा दाखला
धोरणी माणसांचा
जेव्हा काकर सोडून चालायचा
माझ्यातला बैल....
नाहीच आला काबूत... तर
टोचायचा पुरानीनं
अन आणायचा वठणीवर
ठरलेलं विश्वासाचं सुत्र
परंपरेनं आलेलं ....
कोरडवाहूच्या वहीवाटेनं चालताना
पुरता गेलायं उन्मळून
खुपदा थांबतो झाडापाशी रात्री... अपरात्री
पुर्ण तयारीनीशी!
अगतिकतेतही दिसतो त्याला
माझ्यातल्या आशेचा अंकूर ....
दूर ठेवू लागलायं वावरापासून
जपतोयं मला.......नासवणाऱ्या तणापासून
धास्तावूनचं विचारतोयं
माझ्या डोळ्यातीलं त्याच्या स्वप्नाविषयी...
आता देत नाही कुठलाचं दाखला
अन धजावतही नाही
पुरानी टोचायला...
मनोमन जाणून घेतलीयं त्यानं
बदललेल्या धोरणातली जीवघेणी फसगत
रवींद्र अंबादास दळवी नाशिक
२०२ श्री. वल्लभ अपार्टमेंट
विधाते नगर ,पखाल रोड
वडाळा शिवार .नाशिक 422006
9423622615
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने